Wednesday, 7 October 2020

*_कोणाचं घरटं मोडू नका_* ."

            🔶सत्य घटनेवर आधारीत🔷

*टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्ंच्या जीवनात घडलेला प्रसंग !*

*एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते.उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक ,सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.*

*जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं .त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल.त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.*

*गाड्या थांबल्या.त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले.तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता.त्याला बोलावलं.तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय ,हे त्यानी ओळखलंच.त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं.त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली.* *"दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे."*

*यावर तो मुलगा म्हणाला ,"सरजी,पैशाचा सवालच नाहीए .कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही."*

*"का रे बाबा?"*

*"त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत.सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल,ते माझ्याच्यानं पाहवणार नाही.कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी."*

*हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.*

*शेषन् म्हणाले ,"कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं.माझं पद ,माझी पदवी ,उच्च शिक्षण सार्‍या सार्‍याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला.जे शिक्षण , संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत.ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.".*



चार मेणबत्त्या

 *🕯️.🕯️.चार मेणबत्त्या.🕯️.🕯️*

एका छोट्या शहरातील गोष्ट.दिव्याच्या झगमगाट असलेल्या शहरात अचानक आठवडाभर वीज गेली.घरामध्ये खूप अंधार पसरला.उजेडासाठी एका छोट्या मुलाने घराच्या चार कोपऱ्यात एक एक अशा चार मेणबत्त्या लावल्या.खोली प्रकाशमान झाली.मुलगा झोपी गेला.

अचानक एक आश्चर्य घडलं.मेणबत्त्या चक्क बोलू लागल्या.एकमेकांशी बोलता बोलता त्या अर्ध्या जळून गेल्या होत्या. 

पहिली मेणबत्ती म्हणाली " माझं नाव *शांती.* आयुष्यभर जग शांत आणि आनंदी राहावं म्हणून मी पेटत राहली. पण आता माणसं बदलली आहेत. सर्वत्र द्वेष ,भांडण आणि राग पसरला आहे.आता माझी गरज संपली आहे." असे म्हणत ती विझून गेली. 

ते पाहून बाकी तीन मेणबत्त्या विचारात पडल्या.दुसरी मेणबत्ती बोलली."माझे ही हाल असेच झाले आहेत. माझं नाव *विश्वास.* लोकांची नाती मजबूत करण्यासाठी मी आयुष्यभर तेवत राहिले पण या कलियुगात माझी अवस्था बिकट आहे. फसवणूक आणि लबाडी वाढली आहे. माझी ही गरज संपली आहे."असे म्हणून त्या मेणबत्तीनेही निरोप घेतला. आणि अर्ध्या खोलीत अंधार झाला.

तिसरी मेणबत्ती मोठ्या आकाराची होती. खोलीच्या महत्वाच्या भागात लावली होती. ती चौथ्या मेणबत्तीला दु:खात  म्हणाली, " ह्या दोन्ही मेणबत्त्या बोलतात ते बरोबर आहे.जग खूप निष्ठुर झालं आहे. माझं नाव *प्रेम.* माझं महत्वंच लोक विसरून गेले आहेत.आपल्या जवळच्या लोकांशी,नातेवाईकांशी आजकाल कोणी प्रेमाने बोलत नाही माझं ही पेटणं आता निरर्थक झालं आहे.आता तू तुझा विचार कर". तिसरी मेणबत्ती ही वाऱ्याने विझली.खोली एक छोटासा कोपरा सोडला तर अंधारून गेली. 

छोटा मुलगा अचानक झोपेतून उठला.अचानक झालेला अंधार पाहून घाबरला व रडायला लागला.त्याने लावलेल्या तीन मेणबत्त्या विझल्या होत्या.एका निरुपयोगी कोपऱ्यात लावलेली सर्वात छोटी मेणबत्ती मात्र पेटत होती.तो रडत रडत बोलला.

" तू तरी कशाला पेटत राहलीस.तुझा काय उपयोग? बघ जवळपास पूर्ण खोलीत अंधार झाला आहे.तू पण जा आता विझून.आता सगळं संपलं आहे." आणि तो रडायला लागला.

त्याला रडताना पाहून चौथी मेणबत्ती बोलली. " अरे मी छोटी आहे.दुर्लक्षित आहे पण मी विझू शकत नाही.माझं नाव आहे *आशा.* खोलीत सर्वत्र अंधार आहे,मी जास्त प्रकाश देऊ शकत नाही पण मी खोली प्रकाशित करू शकते. माझी पेटणारी वात घेऊन तू ह्या विझलेल्या तिनी मेणबत्त्या पेटव आणि त्या अशाच तेवत राहतील याची काळजी घे"

हे ऐकून त्या मुलाला खुप आनंद झाला. त्याने आशेची मेणबत्ती घेऊन 'शांती,विश्वास आणि प्रेम' ह्या तिन्ही मेणबत्त्या पेटवल्या आणि पूर्ण घर पुन्हा प्रकाशमान झालं. 

.....सध्याचे दिवस ही असेच काळेकुट्ट आहेत.मनाच्या खोलीत उदासीचा आणि चिंतेचा अंधार पसरला आहे.सर्वत्र अशांती पसरली आहे.अनेकांचे जीव वाचवण्याऱ्या डॉक्टरांवरही लोकांचा विश्वास राहिला नाही.सच्च्या प्रेमापेक्षा त्याचा दिखावा आणि स्वार्थ सर्वत्र दिसत आहे.प्रेमाचे मुखवटे घातलेल्या लोकांचे खरे चेहरे लक्षात आले आहेत. 'आता सर्व संपले आहे आणि कुणीही आपली मदत करू शकणार नाही' अशा विचारांमुळे काही जणांनी अगदी आत्महत्येच्या ही विचार केला आहे.पण एक दिवा ह्या भयाच्या अंधारातून मनाला बाहेर काढणार आहे तो म्हणजे 'आशा (HOPE). *'हे ही दिवस जातील आणि चांगले दिवस येतील'* हा आशादायी विचार आणि भावना. 

चला मग स्वतःच्या मनाला बदलू.मग जग आपोआप बदलेल.आशेचा दिवा पुन्हा पेटवू आणि काळोखाशी लढत राहू.

म्हणूनच आजपासून  "दिल हे छोटासा, छोटीशी आशा,दु:ख भरे मन की भोलीशी आशा" ......मग 

*"फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश,दरी खोऱ्यातुन वाहे एक प्रकाश प्रकाश..."*

Thursday, 14 May 2020

।। शेती आणि शेतकरी ।।
।। शेती आणि शेतकरी ।। 
★★★★★ 

 1 Minutes   7.4K     
पोटच्या जीवा परी, शेतावरी केली माया।
कधी पिकलं शेतात, मूठ भर पीक खाया।।

मेघ पाहून आकाशी, काय शेतात पेरावं।
भेगाळल्या शेतास बांधावरून पहावं।।

रानंमाळ शेती सारी, उन्हानं करपली।
गुरढोर माणसांची, तोंड उन्हान सुकली।।

वाट पिकाची लागली, शेती गेली सारी वाया।
एक थेंब पावसाचा, नाही तोंडात टाकाया।।

विहिरी तलाव तळी, सारी उताणी पडली।
तरी दया कशी नाही, आता पावसास आली।।

आस वाटते मनाला, मेघ येईल धावत।
आता येईल पाऊस, सोनं पिकलं शेतात।।

Wednesday, 19 February 2020

शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले .... लढाई सुरू झाली... एक  छोटीशी घडी... मावळे लढतायेत...पण गढी काही मिळेना... एक दिवस गेला ...आठ दिवस गेले ... पंधरा दिवस....तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला... आणि जिंकली.... कोण होते त्या गढीत... कोण लढल एवढे चिवटपणे..... ती होती साविञी देसाई ....
ही लढवत होती ती गढी....
गढी ताब्यात आली... सावित्री कैद झाली .... राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले... आणि सावित्रीला समोर आणले गेले ... ती घाबरलेली.. गांगरलेली...आता माझ कस होणार .... तिला एक लहान मुल होत . त्याची काळजी लागली. मला शिवाजी मारणार . माझ बाळ अनाथ होणार . आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली ...
महाराज मला मारा ...
ठार मारा... पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .
हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला... तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली ... बाळ आणले ... राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते .. आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार .. काय करावे.
तेवढयात राजांनी आज्ञा दिली. सावित्री ला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका........

आणि या शञूच्या बाईसाठी..
शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.
ताई.............
ताई  ... कोण म्हटले मी तुम्हाला मारणार ... या बाळाला मारणार ... मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला. 
आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय... काही तरी दिले पाहिजे ना...

ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय... आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..
अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.
राजा.. मी तुला शञू समजले..
मी वैरी समजले..
पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला...
धन्य शिवाजी राजा..
धन्य त्याचे माता पिता..

ही कथा इथच संपत नाही
शिवाजी निघुन गेले. पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले.
यात गादीवर शिवाजी बसले आहेत..लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अस शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते.

हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे...

किती महान माझा शिवाजी राजा होता हो..

शिवरायांना सख्खी बहिण नव्हती
पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .
आणि तुम्हाला सांगायची गरज नाही
काय नात आहे हे भाऊ बहिणीचे...
आणि काय नात आहे शिवाजी राजाच.
माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .

किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर...
वादाच्या पलिकडले शिवाजी ...
बहिणीचा भाऊ शिवाजी ...

माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर ...
कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .
निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .
कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .

मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल
कारण तिला विश्वास असेल
हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.
शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.
माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे

प्रत्येक भावाने प्रत्येक गृपवर पाठवावा
हि विनंती ..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Tuesday, 28 January 2020

मृत्यू - एक अटळ सत्य

मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं.

कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा (mask) घालत असे.

त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत.

त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे.

त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे.

मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्‍या आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं ते ही गोर्‍या मुलींबरोबर.

दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील.

त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि २५ जून २००९ या दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी १२ डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही.

त्याने २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते. प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज antibiotics ची अनेक injections घ्यावी लागत असे.

मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे.

मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच २५ जून २००९ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं instant messenger हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं.

मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो, त्यांना मृत्यूच चकवतो, हेच खरं.

चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज.. कशाला तो ! स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच असणार आहे. हे कधी समजणार लोकांना ! कदाचित कधीच नाही.

Thursday, 23 January 2020

🔸🔸🔸🔸🔸🔹🔸🔸🔸🔸🔸
*रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते टर्मिनल ?*

*जर कुठल्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल लिहिले असेल तर त्याचा अर्थ तिथून पुढे ट्रॅक नाही. म्हणजे रेल्वे ज्या दिशेने आली त्याच दिशेने परत जाणार. टर्मिनसला टर्मिनल पण म्हटले जाते. म्हणजे असे स्टेशन जिथून रेल्वे पुढे न जाता आली त्याच दिशेने परत जाते. आपल्या माहितीसाठी देशात सध्या 27 स्टेशनवर टर्मिनल लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस हे देशातील सगळ्यात मोठे टर्मिनल आहेत.*

 *चला तर तुम्हाला सांगतो की, रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते सेंट्रल ?*

*स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असले तर त्या शहरात एक पेक्षा अधिक स्टेशन आहेत. ज्या रेल्वे% स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असते ते त्या शहरातील सगळ्यात जुने स्टेशन असते. रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेलं असण्याचा दुसरा अर्थ असा की ते त्या शहरातील सगळ्यात व्यस्त राहणारे स्टेशन आहे. तुमच्या माहितीसाठी सध्या भारतात मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, त्रिवेंद्रम सेंट्रल, मंगलोर सेंट्रल, कानपुर सेंट्रल हे प्रमुख सेंट्रल स्टेशन आहेत.*

 *रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते जंक्शन ?*

*कुठल्याही स्टेशनच्या नावाच्या शेवटी जंक्शन लिहिलेले असणे म्हणजे त्या स्टेशनवर येण्या जाण्यासाठी ३ पेक्षा अधिक मार्ग आहेत. म्हणजे ट्रेन एका मार्गाने येऊन त्या स्टेशन वरून इतर दोन मार्गावरून जाऊ शकते. त्यामुळे स्टेशनच्या नावाच्या शेवटी जंक्शन लिहिलेले असते. सध्या देशात मथुरा जंक्शन (७ रुट्स), सालेम जंक्शन (६ रुट्स), विजयवाड़ा जंक्शन (५ रुट्स ), बरैली जंक्शन (५ रुट्स) हे जंक्शन स्टेशन आहेत.*
🔸🔸🔸🔸🔸🔹🔸🔸🔸🔸🔸
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
            *मतदानाच्या शाईची कथा.*

*मतदाराने मतदान केल्याची खूण म्हणून बोटावर जी शाई लावली जाते, ती गेली ५६ वर्षे मैसूर येथे बनविली जात आहे याची अनेकांना माहिती नसेल. हि शाई सर्वप्रथम मैसूरचे महाराज कृष्णराज वाडियार यांनी १९३७ मध्ये स्थापन केलेल्या मैसूर इंक लॅक अँड पेंट लिमिटेड या कारखान्यात बनविली गेली. मात्र तिचा प्रथम वापर १९६२ मध्ये केला गेला. पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना या शाईची संकल्पना सुचली.*

*त्याआधी बोटाला डाय लावला जायचा. त्यानंतर आजतागायत हीच शाई निवडणूक प्रक्रियेत वापरली जात आहे.*

*मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमीटेड या कंपनी मार्फत या शाईचे उत्पादन होते. हि शाई येथून मालदीव, अफगाणिस्थान, कंबोडिया, मलेशिया, इजिप्त, द.आफ्रिका या देशात निर्यात केली जाते. या शाईसाठी विशेष फॉर्म्युला वापरला जातो.*

*या शाईत २५ टक्क्यांपर्यंत सिल्वर नायट्रेट असतं. हे खूप महागडं रसायन असतं हे जांभळ्या रंगाचे विशेष रसायन सूर्यप्रकाशात रंग बदलते आणि सहजी ते घालविता येत नाही.*

*भारतात हाताच्या नखाखाली हि शाई मतदान केल्यावर लावली जाते, तर मालदीव कंबोडियात बोट या शाईत बुडविले जाते. बुरांडी, बुर्कीनो फासो येथे ती ब्रशने लावली जाते तर इजिप्त मध्ये त्यासाठी पेन वापरले जाते.*

*निवडणुकीसाठी पुरविण्यात येणाऱ्या शाईची खूप दक्षता घेतली जाते, आणि तिचा चोख हिशोब ठेवला जातो. या शाईच्या एका बाटलीतून ७०० ते ८०० मतदारांच्या बोटावर खूण करता येते. उरलेली शाई निवडणूक कार्यालयात जमा केली जाते आणि नंतर ती नष्ट केली जाते.*

🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴