Wednesday, 2 December 2020

ईच्छा

 # एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला...


दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत

तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो.

काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण.

परतताना मनात विचार येतो

‘तो ड्रेस घ्यायला हवा होता''...

सिग्नलला गाडी थांबते,

चिमुरडी काच ठोठावते.

गोड हसते, पण भिक मागत आहे

हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे

फार लक्ष देत नाही आपण.

२-३ रुपये द्यावे असे मनात येते.

रेंगाळत सुटे शोधता शोधता

‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो.

तेवढ्यात सिग्नल सुटतो,

गाडी पुढे घ्यायची वेळ येते.

थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते,

‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला'

जेवणाच्या सुट्टीत  मित्र

त्याच्या घरातला त्रास फार विश्वासाने सांगतो,

त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात.

वाईट वाटते खूप, नशीब आपण त्या परिस्थितीत

नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळेहोतो.

‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही

आपण गप्प राहतो."

जेवणाची सुट्टी संपते.

तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो.

क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही'

निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

असेच होते नेहमी,

छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात

खरं तर या छोट्या गोष्टीच

जगण्याचे कारण असतात.


जगण्याची साधने जमवताना

जगणेच राहून जात नाहीयेना

ते ‘चेक’ करा.

                               "आनंद झाला तर हसा,

                            वाईट वाटले तर डोळ्यांना

                                 बांध घालू नका"

                          चांगल्या गोष्टीची दाद द्या,

                              आवडले नाही तर सांगा,

                                    घुसमटू नका."


त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा.

नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,


आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली

तर ‘लाईफ’ कसले?

आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले

तर ‘लाईफ’ कसले?

मित्रांच्या फालतू विनोदांवर

पोट दुखेस्तोवर हसलो नाही

तर ‘लाईफ’ कसले?

आनंदात आनंद आणि

दु:खात दु:ख नाही जाणवले

तर ‘लाईफ’ कसले!!???? 


बघा जमलं  तर ....

माणसं

 माणसं....


मला माणसांना भेटायला फार आवडतं. लहानपणापासून. माणसं आवडतात मला. अनोळखी माणसांना भेटण्यात, जाणून घेण्यांत त्यांना एक अनोखी मजा असते. त्यांच्याकडून बरंच काही मग कळतं जातं आपलं आपल्याला. टिपतं राहतंच आपलं मन. नकळतपणे आपल्याच. एखाद्या टिपकागदासारखं. माणूस बदलला समोरचा की हा कागद बदलून टाकला जातो. तो सुद्धा नकळतपणे आपल्याच. म्हणून मला वाटतं की आपलं मन हे एखाद्या टिपकागदासारखं असावं. पण काही काही जणांचं असं नसतं, त्यांची मनं कार्बन पेपर सारखी असतात. म्हणजे जाणारी माणसं गेलीच निघून आयुष्यातून त्यांच्या तरी ते आपले ठसे उमटवून जातात. आणि मग त्या खुणा जन्मखुणांसारख्या बाळगत अशी माणसं जगतं राहतात. माझ्या मते असं जगणं खूप त्रासदायक आहे. आणि नव्याने येणाऱ्या माणसांवर अन्यायकारक सुद्धा आहेच. येणारा नवीन माणूस जुन्या सारखा कसा असेल? रोजचं साधं ऊन घ्या. ते सुद्धा नसतंच रोज तसंच आणि सारखं. हिवाळी दिवसांत कलेकलेने त्यातला उबदारपणा कमी होतं जातो. आणि उन्हाळी दिवसांत तो त्याचं कलेकलेने वाढतं नाही का जातं? आणि पावसाळ्यातलं जांभळं ऊन, कलणाऱ्या दिवसाच्या खांदयावर बसून ते जेव्हा परतीच्या प्रवासाला निघतं तेव्हा ते अनुपम सुंदर दिसतं.....


काही माणसांची तर अजूनच गंमत असते. म्हणजे त्यांनी असा 'निज शैशवास जपावे' असा वसाचं घेतलेला असतो जणू. ती मग वाढतंच नाहीत. वयानं वाढली तरी. अशा माणसांच्यात एकाच वेळी बरंच काही सापडतं बघा मग. म्हणजे ती माणसं सतत काही तरी करत असतात. हसतात, रडतात, बोलतात. सगळंच. आणि बेलगाम. चांगलं का वाईट हे ठरवणारे आपण कोण? पण ह्यांचे राग, लोभ फार तीव्र असतात. त्यांच्या मधला मी पण खूप मोठा असतो. त्यांच्या सावलीपेक्षा सुद्धा लांब. आणि अनेकदा अशी माणसं फक्त स्वतःबद्दल बोलत असतात. आणि ते फार कंटाळवाणं जातं होऊन. म्हणजे सापडलाच आहे समोरचा तावडीत छान तर ऐकवा त्याला असा एकूण रोख आणि होरा असतो ह्यांचा. अशा माणसांना भेटून, बोलून त्यांच्याशी काही लागत नाही मग हाती. माझ्या ओळखीच्या एका बाई आहेत. त्या ‘मीभक्त’ आहेत. एकच गोष्ट इतक्यांदा आणि परत परत त्याचं उत्साहानं त्या सांगतं असतात. जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा गुदमरल्यासारखं होतं मग. म्हणजे बाई हुशार आहेत, चटपटीत, कामसू गुण आहेतच अनेक. पण त्या ते इतक्यांदा उगाळून सांगतात की ते स्वस्तुतीचे थाळाभर गंध मग संपता संपत नाही.


काही काही वेळा तर माणसं हातालाच लागतं नाहीत. इतकी ती खोटी, तकलादू आणि वरवरची असतात. कचकड्याची. त्यांच्याबद्दल लिहिलं तरी ते तकलादू होईल इतकी. म्हणून त्यांच्याबद्दल इतकंच. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलंच आहे, आणि असतंच ते तसं. आपण कसे दिसतं असू समोरच्याला? कसे वाटतं असू? आणि जसे दिसतं असू तसेच आहोत का नक्की आपण? असे सुद्धा प्रश्न मग मनात येऊनच जातात. आणि व्यक्त होणाऱ्या माणसांना, विचार करणाऱ्या माणसांना ते जास्त तीव्रतेने पडतात. कधी कधी आपल्यालाच आपली नवीन ओळख पटत जाते. जगण्यातले प्रश्न कधी कधी इतके गुंतागुंतीचे आणि तीव्र असतात की आपला अभिमन्यू आणि युधिष्टिर दोन्हीही होऊन जातो. एकाच वेळी परत. म्हणजे आपला प्रश्न म्हणून आपण त्यात अडकलेले राहतो. कधी नकळतपणे आपल्या समोरच्याचा प्रश्न आपला होऊन जातो. इतके आपण जोडलेले असतो. अशावेळी ना ते सहन करता येतं ना त्यातून सुटका मिळते. म्हणून म्हटलं आपला अभिमन्यू होतो. आणि युधिष्टिर का? तर अनेकदा आपल्याला ‘सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्, न ब्रूयात् सत्यम् अप्रियम्’ असं वागावं लागतं.  आणि हे सगळं आपण आपल्या मायेच्या माणसांसाठी करत असतो. इतकी ती महत्वाची असतात. असतातच. कारण अनेकदा प्रश्नांना उत्तरंच नसतात. किंवा येणारा काळ हेच एक उत्तर. मग अशा वेळी काय करायचं असतं? अशावेळी माणसं काय करतात? जी आपल्या आधी जगून गेलेली असतात. माझ्या मते ती पुस्तकं वाचतात.


इतक्या वेगवेगळ्या माणसांना भेटून, बोलून काय मिळतं? आणि अजूनही का भेटतो आपण त्यांना? ह्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा किती अस्पष्ट, किती धूसर. आपल्या मनांत संदिग्धता नाही हे कितीही आवर्जून आणि ठासून सांगितलं आपण तरी काही क्षण चकवूनच जातात. मला तर हे सगळं असं टेकडी चढण्यासारखं वाटतं. म्हणजे माथा दिसतं असतो. अंतर माहित असतं. आपली कुवत सुद्धा असतेच माहित. बरं वर जाऊन तिथे काही लागेलंच हाती हे नसतं माहित. आणि दिसेल ते हवंच होतं का हे सुद्धा कुठं असतं माहित चढतांना टेकडी. पण तरीही आपण ती टेकडी चढतो. माणसांचं असंच आहे. किती भेटतात. हजार अनुभव देऊन जातात. काही परत तेच नव्याने.  कधी अगदी नवे, कोरे. कधी इतके जुने की जाळीदार पिंपळाचे पान. पण तरीही आपण भेटतोच त्यांना. न जाणो कोणत्या असोशीने... आणि राहूच भेटत, हे सुद्धा खरंय.  


© प्राची बापट

अज्ञानात सुख

 रस्त्यावर कचरा गॊळा करणाऱ्या एका गावंढळ जोडप्यात कडाक्याचॆ भांडण झालॆ. नवऱ्यानॆ बायकॊला यथेच्य चोप दिला आणि निघुन गेला तिने त्याला आरडाओरड करुन शिव्या दिल्या. ती जरा वेळ रडली आणि पुन्हा कामाला लागली. थोड्या वेळाने तो पुन्हा आला आणि काय आश्चर्य तॆ दॊघॆ पुन्हा एकत्र कामाला लागले आणि सोबत घरी गेलेसुद्धा. मुक्तपिठ मध्ये हि गोष्ट काहीदिवसापुर्वी आली. विचार कॆला कि, ह्याचजागी जर एखादे शहरी-शिकलेले जोडपे असते तर ? कदाचीत त्यांच्यामध्ये "You are encroaching my personal space, You are humiliating me, I deserve self-respect, Where is my self-identity" असा काहिसा संवाद झाला असता कदाचित काडिमोड पर्यंत गोष्ट गेली असती. शिव्या दॆणॆ हा आपला प्रतिकार असॆ त्या गावंढळ स्रीला आणि मार दॆणॆ हा आपला अधिकार असॆ त्या गावंढळ पुरुषाला वाटत असावॆ. किंबहुना आयुष्य असॆच असतॆ हॆ त्यांनी स्विकारलॆलॆ असावॆ. कायदा काय म्हणतॊ, तॊ कुणाच्या बाजुला आहॆ, मानवी हक्क(Human-Rights), नैसर्गिक न्याय-हक्क असे काही असते हॆ त्यांना माहितही नसावे. या अज्ञानामुळॆतर त्यांचॆ वैवाहिक जीवन चालले नसावे ना?



असॆ म्हटलॆ जातॆ कि 'अज्ञानात सुख असतं' (Ignorance is BLISS). कधीकधी जास्त खॊल विचार न करता घेतलेले निर्णयच योग्य ठरतात. जितकॆ विचार खॊल तितकी ध्येयशक्ती क्षीण. 'गहरी सोच इरादोंको कमजोर बना देती है'. याचा प्रत्ययसुद्धा आपणास यॆतच असतॊ. उदा. एखाद्याला 'अर्थविषयक' गुंतवणुकीत गती असेल तर स्वत:चे अर्थविषयक निर्णय घेतांना तो हजारवेळा विचार करेल. माझी गुंतवणुक कुठल्या 'Financial Instrument' मध्ये जास्त सुरक्षित असेल. मला परतावा(Returns) जास्त आणि धोका कमी असणारे पर्याय काय? या Scrip चॆ Fundamental & Technical Analysis काय सांगतॆ? या कंपनीचा CashFlow कसा आहॆ, OrderBook कसॆ आहॆ? आता Stock Market पडणार तर नाही ना? मी फसवला तर जाणार नाही ना? वगैरॆ वगैरॆ... जितकॆ जास्त Parameters तितका जास्त गॊंधळ आणि निर्णय घ्यायला तितकाच उशीर.



आपला नोकरीदाता(Employer) आपल्यावर १००% Margin ठॆवुन आपल्याला पिळत असतॊ हॆ आपणास माहित नसतॆ आणि त्यातच आपण आपली रोजी रोटी कमवत असतो.



'मालगुडी-डेज'या मालिकेत एकदा एका सामान्य पण सुखी माणसाला एक 'अंतरंगात डोकावणारा' चश्मा मिळतो. हौसेखातर तो चश्मा घालुन आपल्या नजिकच्या लोकांत जातॊ आणि यांच्या अंतरंगात डोकावतो. दुखावतो कि तोंडावर गोड बोलणारी मंडळी त्याच्या 'मरणावर' टपुन बसली आहेत. तॊ चश्मा नदित फॆकुन दॆतॊ आणि म्हणतॊ कि, हा चश्मा नव्हता तेंव्हा मी खरोखरच यापेक्षा जास्त सुख़ी होतो.



उद्यमशिलता(Enterpreneurship) तपासतांना काही साहसवित्तवाले(Venture Capitalists) हॆच बघतात कि, एखाद्या गोष्टीत अपयश येइल हे तुम्हाला कितपत माहित नाही?(They look for your Risk-Apetite). जितके तुम्ही अननुभवी तितके चांगले कारण कि यात अपयश यॆतॆ हॆ तुम्हाला माहित नसते आणि तुम्ही ती गोष्ट यशस्वी करुनही टाकता (Its better to have no experience than gathering large irrelevant experience).



वसतीगृहात रहात असतांना एक सदा नापास होणारे व्यक्तिमत्व होते. तो म्हणायचा 'More Information...More Confusion, Less Information...Less Confusion and No Information...No Confusion'.



खरोखरच 'अज्ञानात जग जगतं'. म्हणुनच परमेश्वराने जन्माला घालतांना आपल्याला आपल्या मागच्या अनॆक जन्मांविषयी 'अज्ञात' ठॆवलं असावं.

आयुष्याचा भेळ

 🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀

               *🔸आयुष्याची भेळ.🔸*


*तिने घरात आल्याबरोबर लगेच बॅग सोफ्यावर फेकून दिली. तिचं ते रुप त्यानं बघितलं आणि त्याला कळून चुकलं की आज काहीतरी बिनसलेलं दिसतंय.*


*"काय झालं, कुणाशी वाद वगैरे झाला का?"अगदी सौम्य भाषेत त्याने विचारलं.*


*"हो, मला काय येतं दुसरं वादाशिवाय, मीच भांडत असते ना सगळ्यांशी".*


*"अगं, मी वाद म्हंटलंं भांडण नाही".*


*"उगाच शब्द नको फिरवुस, वाद आणि भांडण फार वेगळं नाही".*


*"बरं !".*


*"हे बरं आहे मी काही बोलली की नुसतं 'बरं !' म्हणायचं आणि शांत बसायचं".*


*ती बाथरूम मध्ये गेली फ्रेश झाली , आतून आवाज आला "ह्या फेसवॉशला सुद्धा आताच संपायचं होतं. लिस्ट मध्ये होतं ना ! पण ह्या घरात मी पुढे पुढे केल्याशिवाय काहीच नीट नसते".*


*"अगंं ह्यावेळी तूच गेली होतीस सामान आणायला".*


*"हो का?, ते बरंं लक्षात राहीलंं".*


*"बरं !".*


*"सर्वात आधी हे बरं ! बरं ! , बंद कर तुझं".*


*"बरं ....सॉरी ....हम्मम्म्म".*


*"सगळी विचित्र माणसं माझ्याच आयुष्यात आहेत".*


*"तुला भूक लागली का, मी भेळ चा प्लान केलाय मस्त".*


*"मी खादाडच आहे ना ! भूक लागली की चिडचिड करते नाही का?".*


*"मी असंं काही म्हणालो नाही".*


*"उद्देश तर तोच होता".*


*"अस नाहीं गंं राणी काही".*


*"जाऊ दे , तू मला कधीच समजून नाही घेतलंस".*


*"बरं!".*


*ती सरळ बेडरूम मध्ये निघून गेली आणि उशीत तोंड खुपसून रडू लागली. ह्याने तिला थोडा वेळ रडू दिलं तोवर त्याने छान भेळ तयार केली. नंतर 2 प्लेट छान सजवल्या आणि बेडरूम मध्ये घेऊन गेला.*


*"ऊठा राणी साहेब, ही बघा स्वादिष्ट भेळ तयार आहे".*


*"मला नको".*


*"हे चालणार नाही".*


*"नको म्हंटलंं ना !".*


*"जाऊ दे मग मी सुद्धा नाही खात".*


*"अरे तू खा, मला भूक नाही".*


*"बरं!, ही भेळ मी तुला समजावून सांगतो. आपलं आयुष्य आहे ना हे त्या शुभ्र कुरमुऱ्यां सारखं असतं, हळू हळू त्यात थोडे बालपणीचे शेव, चिवडा पडतो मग, थोडं वेगळं वाटायला लागतं, त्यात आपण थोडा त्याचे मित्र मैत्रिणी घालतो उदाहरणार्थ कांदा, उकडलेला बटाटा, खारे शेंगदाणे, मग आहों मिरची किंवा चटणी घालतो, हे म्हणजे त्या माणसांसारखंं असते जे सदैव आपल्या आयुष्यात काहीतरी नकारात्मक घेऊन येत असतात. पण त्यांना आपण टाळू शकत नाही, त्यांचा एखादा विचार पटत नाही याचा अर्थ असा नाही की आपण त्यात अजून तिखटाची भर घालावी, थोडं आपल्या विचारांचं मीठ घातलं की भेळ चवदार होते. तरीही जर का तिखटच वाटत असेल तर थोडं आपल्या स्वभावातील लिंबू पिळावं म्हणजे तिखटपणा राहत नाही समोरच्याच्या मनात सुध्दा नाही आणि आपल्या जिभेवर सुद्धा नाही. त्यावर मस्त पैकी आपल्या सुसंस्काराची कोथिंबीर भुरभुरावी मग कशी भेळ आणि जीवन दोन्ही चटकदार होते"*


*ती हसत ऊठली त्याला बिलगली आणि पुन्हा रडली, "नको ती माणसे का येतात समोर?".*


*"आपण आपल्या मनाला इतकं का कमकुवत करायचं की कुणी एखादी व्यक्ती समोर आली तर असं हतबल होऊन जायचं...?*


*"भेळीत काय रोल असेल मग याचा"*


*"सिम्पल आहे हे माणसं एकेकाळी आपलीच असतात, उदाहरण लिंबू पण ते पिळताना त्याची बी सुद्दा पडतेच भेळीत , मग ती जर का दिसली भेळ खातांना तर अलगद तिला बाजूला करायचं आणि भेळ खात बसायचं".*


*"सो स्वीट....  आयुष्याची भेळ."*

🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀

Outlet

 *Outlet*

...............................

*भय्यूजी महाराजांनी* आत्महत्या केल्या नंतर

 *ABP माझा चँनल* ने एक परिचर्चा घडवून आणली होती .त्यात बोलताना भय्यूजी महारांजाचे मित्र - *अशोक वानखेडे* यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक *"अध्यात्मीक" गूरू होते  , परंतू ते एक व्यक्ती पण होते , आपल्या मनातील "स्ट्रेस" बाहेर काढायला त्याच्या जवळ "outlet" नव्हता*

आज परत डॉ. शितल आमटे 

(बाबा आमटे यांची नात त्याचं ही अगदी भैयु महाराज सारखं झाले)


*ईतकं महत्वाचं असतं का हे outlet ?*


 होय !

कोट्यावधी रूपये खर्च करून  *धरण*

बांधले .आणि समजा त्याला outlet च दिले नाही

तर काय झाले असते ? अक्षरशः धरण फूटले असते..इतकं महत्वाचं असते

हे 

मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं

एक *धरणच* जणु ! या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे धरण फूटेल की राहील ?

  म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा .आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या आई - पत्नीजवळ सांगा ...आपल्या अंतर्मनाचं outlet Open करण्यासाठी *विपश्यना , ध्यान साधनेचा अवलंब* करा... आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात

मोठं outlet म्हणजे आपले डोळे....उघडा , फुटून जाऊ

द्या *अश्रूचा बांध*...वाहून जाऊद्या स्ट्रेस , दूःख , उपेक्षा...

पिस्तौल च्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.... 

हे केव्हाही सोप्प...नाही का ?

*बेस्ट आउटलेट मित्र आणि मैत्रिणी*🤘❣️💃💃💃

*हसा ! बोला !रडा !भांडा!*

*व्यक्त व्हा!! मुक्त व्हा..!!*

Die empty

 *रिक्त मरण (Die Empty)*


वाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तकं आहेत त्यातलंच एक सर्वोत्तम पुस्तक म्हणजे टॉड हेनरी यांचे "Die Empty"


हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटींग मध्ये मिळाली.


मिटींगमध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की "जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे?"


प्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : "तेलाने समृद्ध गल्फ राज्ये." 


तर दूसर्‍याने उत्तर दिले : "आफ्रिकेतील डायमंड खाणी."


त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाले : नाही, जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी. कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत ज्यांच्याजवळ अनेक मौल्यवान कल्पना होत्या पण त्या कधीच प्रकाशात येऊ शकल्या नाहीत आणि इतरांना त्याचा काहीच फायदा सुध्दा झाला नाही. त्यांच्या या सर्व मौल्यवान कल्पना त्यांच्याबरोबर या दफनभूमीत पुरण्यात आल्या आहेत. 


याच उत्तराने प्रेरीत होऊन लेखक टॉड हेनरी यांनी "Die Empty" हे पुस्तक लिहले.


सर्वात सुंदर जर त्यांनी काही या पुस्तकात म्हटलं असेल तर ते म्हणजे " तुमच्या आतमध्ये जे सर्वात बेस्ट आहे जे तुम्ही करु शकता ते आतमध्येच ठेवुन मरु नका. निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे नेहमी रिक्त मरण निवडा.


रिक्त मरण किंवा Die Empty या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये जो काही चांगुलपणा आहे, जे काही चांगले तुम्ही या जगाला देऊ शकता ते सर्व मरण्यापूर्वी या जगाला देऊन जा.


जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती सादर करा.


जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते इतरांना द्या.


जर तुमच्याकडे एखादे ध्येय असेल तर ते साध्य करा.


तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा, इतरांचा सांगा आणि इतरांमध्ये वाटा आतमध्येच दडवून ठेवू नका.


चला तर मग, द्यायला सुरुवात करुया. आपल्यामध्ये जे काही चांगले आणि आपण जे काही चांगले या जगाला देऊ शकतो ते सर्व  आपल्यामधून काढून या जगामध्ये पसरवा.


शर्यत सुरु झाली आहे.

    चला, हे जग सोडण्याआधी रिक्त होऊया.

Wednesday, 7 October 2020

*_कोणाचं घरटं मोडू नका_* ."

            🔶सत्य घटनेवर आधारीत🔷

*टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्ंच्या जीवनात घडलेला प्रसंग !*

*एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते.उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक ,सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.*

*जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं .त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल.त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.*

*गाड्या थांबल्या.त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले.तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता.त्याला बोलावलं.तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय ,हे त्यानी ओळखलंच.त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं.त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली.* *"दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे."*

*यावर तो मुलगा म्हणाला ,"सरजी,पैशाचा सवालच नाहीए .कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही."*

*"का रे बाबा?"*

*"त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत.सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल,ते माझ्याच्यानं पाहवणार नाही.कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी."*

*हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.*

*शेषन् म्हणाले ,"कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं.माझं पद ,माझी पदवी ,उच्च शिक्षण सार्‍या सार्‍याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला.जे शिक्षण , संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत.ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.".*