कवितांची मेजवानी


खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य असे, की प्रत्येक वेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात..!


ही आहे मराठी भाषेची श्रीमंती..!


'पाणी' शब्द हा असे प्रवाही, वळवू तिकडे वळतो हा.. जशी भावना मनात असते, रूप बदलते कसे पहा   ..!


           *रंग पाण्याचे*


नयनामध्ये येता  'पाणी'

अश्रू तयाला म्हणती,

कधी सुखाचे, कधी दुःखाचे,

अशी तयांची महती..!


      चटकदार तो पदार्थ दिसता,

      तोंडाला या 'पाणी' सुटते,

      खाता खाता ठसका लागून

      डोळ्यांतून मग 'पाणी' येते..!


धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,

म्हणती अविरत भरते  'पाणी'..

ताकदीहूनी वित्त खर्चिता

डोक्यावरूनी जाते  'पाणी' ..!


    "वळणाचे 'पाणी' वळणावरती"

     म्हण मराठी एक असे,

     "बारा गांवचे 'पाणी' प्यालाय"

     चतुराई यातुनी दिसे..!


लाथ मारूनी 'पाणी' काढणे, 

लक्षण हे तर कर्तृत्वाचे,

मेहनतीवर 'पाणी' पडणे

चीज न होणे कष्टाचे..!


     उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,

     'पाण्या'त पाहणे गुण खोटा..   

     'पाणी'दार ते नेत्र सांगती,

     विद्वत्तेचा गुण मोठा..!


शिवरायांनी कितीक वेळा,

शत्रूला त्या 'पाणी' पाजले..

नामोहरम करून, अपुले

मराठमोळे 'पाणी'दाविले..!


     टपोर मोती दवबिंदूचे

     चमचम 'पाणी' पानावरती,

     क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,

     अळवावरचे अलगद 'पाणी'..!


कळी कोवळी कुणी कुस्करी,

काळजाचे त्या 'पाणी' होते..

ओंजळीतूनी 'पाणी' सुटता,

कन्यादानाचे पुण्य लाभते..!


     मायबाप हे आम्हां घडविती,

     रक्ताचे ते 'पाणी' करूनी..

     विनम्र होऊन त्यांच्या ठायी

     नकळत दोन्ही जुळती 'पाणि'


आभाळातून पडता 'पाणी'

तुडुंब, दुथडी नद्या वाहती,

दुष्काळाचे सावट पडतां

सारे 'पाणी पाणी' करती..!


      अंतीम समयी मुखात 'पाणी'

      वेळ जाणवे निघण्याची..

      पितरांना मग 'पाणी' देऊनी,

      स्मृती जागते आप्तांची..!


मनामनांतील भावनांचे,

'पाण्या' मध्ये मिसळा रंग..

प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,

चेहऱ्यावरती उठे तरंग..!!


कसं आहे ना? 

एक कागदाचं

पान असतं...!!


'श्री' लिहलं, की 

पूजलं जातं ...


प्रेमाचे चार शब्द 

लिहले, की

जपलं जातं...


काही चुकीचं 

आढळलं, की 

फाडलं जातं...


एक कागदाचं 

पान असतं...!!


कधी त्याला 

विमान बनवून 

भिरकावलं जातं...


कधी होडी बनवून 

पाण्यात सोडलं जातं...


कधी भिरभिरं बनवून 

वाऱ्यावर फिरवलं जातं...


आणि कधी तर 

निरुपयोगी म्हणून 

चुरगाळलंही जातं...


एक कागदाचं

पान असतं....!!


जे लेखकाच्या 

लेखणीला हात देतं...


जे चित्रकाराच्या 

चित्राला साथ देतं...


जे व्यापाऱ्याच्या 

हिशोबाला ज्ञात ठेवतं...


आणि हो, 

वकीलासोबत कोर्टात गेलं, 

की साक्षही देतं...


एक कागदाचं

पान असतं.....!!


पेपरवेट ठेवला, की 

एकदम गप्प बसतं...


काढून घेतला, की 

स्वच्छंदी फिरतं आणि 

कशांत अडकलं, तर

फडफडायला लागतं...


एक कागदाचं

पान असतं.....!!


ज्यावर बातम्या छापल्या, 

की वर्तमानपत्र बनतं...


प्रश्न छापले, की 

प्रश्नपत्रिका बनतं...


विवाहाचं निमंत्रण छापलं, 

की लग्नपत्रिका बनतं...


तर कधी आदेश~संदेश

लिहले, की तेच टपालही 

बनतं...


एक कागदाचं

पान असतं....!!


माणसाच्या जीवनांत

आणि त्यांत खूप

साम्य असतं...!!


एक कागदाचं

पान असतं...!!👍🏻

उरात माझ्या ईश्वर जागा-


मला न पटल्या तिरुपतिच्या

बालाजीच्या अफाट रांगा


मला खटकली काशीमधल्या

पुण्यभूमीतील गटारगंगा


मिटल्या माझ्या नेत्रपाकळ्या

शिर्डीमधली बजबज पाहून


भावभक्तीची उसन उधारी

पंढरपूरच्या बाजारातून


मला न रुचली दक्षिणेतली

गगनचुंबिती उंच गोपुरे


पुन्हा पुन्हा मन मला म्हणाले

गड्या यातुनी देव नाही रे


देवाचा त्या शोध सरे ना

फिरुन आलो दिशा दहाही


मनास तगमग उरात लगबग

देव दिसेना मला जराही


आणि अचानक एके दिवशी

शेतावरती हलता डुलता


मला गवसला तो रस्त्यावर

उन्हात जळत्या खडी फोडता


माथाड्याच्या माथ्यावरती

घामामधुनी टपटपताना


ट्कमक डोळे बालक होऊन

भिकारणीचे स्तन लुचताना


मूल होऊनी देव रांगतो

फूल होऊनी गंध वाटतो


भर माध्यान्ही दारी येऊन

घोट जलाचा देव मागतो


मला समजले देव नसावा

अशी एकही नसते जागा


तेव्हापासून सदैव असतो

उरात माझ्या ईश्वर जागा


@-प्रसाद कुलकर्णी

मराठी भाषा पंधरवडा निमित्त       🙏वंदन मायबोलीला🙏

मायबोली माझी मराठी 

करतो तिजला वंदन

तिच्याचमुळे फुलले

माझ्या जीवनाचे नंदनवन 


कधी न फिटती उपकार 

माझ्या मायबोलीचे

मायबोलीने घडविले 

दर्शन थोर विचारांचे 

लावते अम्रुत ओठी 

माय मराठी 

आठवती नित्य 

सानेगुरुजींच्या गोष्टी 


विश्वात्मकतेचा नंदादीप 

पेटविला संत ज्ञानेश्वरांनी 

भक्तीच्या मंदिरावर कळस बांधला 

महाराष्ट्र संत तुकोबा रायांनी 


दासबोध करुणाष्टके मनाचे श्लोक 

आरत्या,श्री हनुमंताची देवळे 

साकारणार्या समर्थ रामदासांनी 

राष्ट्रभक्तीचेही धडे दिले


पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे 

बालकवी,राजकवी,बा.भ.बोरकर  

यांच्यासह दुर्गाबाई,इरावती कर्वे 

शांता शेळकेंनी फुलवला बहर


खांडेकर,कुसुमाग्रज, विंदा,नेमाडे 

हे सारस्वत ज्ञानपीठाचे मानकरी 

जनाई,मुक्ताई,बहिणाईचे वाङमय 

हे तर सुवर्ण लेणे साक्षात् ईश्वरी 


फादर दिब्रिटोंसह सर्व अध्यक्षांनी 

वाढविली मायबोलीची श्रीमंती 

कधी न फिटती उपकार जिचे 

त्या माय मराठीची गाऊ आरती


राजेंद्र र.वाणी

दहिसर मुंबई🙏🌷

शिक्षणाची मशाल पेटवून
केली भारतभर क्रांती
त्या क्रांतीज्योती सावित्रीदेवीच्या
कर्त्रुत्वाची गातो प्रेमे आरती
पती महात्मा जोतिबांकडून
घेतले शिक्षणाचे धडे
अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीत
केली वाटचाल ध्येयाकडे
मुलगी शिकली प्रगती झाली
हे आज पटतय
पण त्या बुरसटलेल्या काळात
सावित्रीबाईंनी खूप सोसलय
पुण्याच्या भिडे वाड्यात झाली
मुलींची पहिली शाळा सुरू
समाजातील नतद्रष्ट लोक लागले
सावित्रीबाईला दगड मारू
अंगावर फेकायचे सावित्रीच्या
अंडी टोमॅटो चिखल
सारं काही सहन केल या देवीने
त्यामुळे फुललं ज्ञानाचं कमळ
केवढा मोठा हा त्याग
जरासुद्धा धरला नाही राग
हळूहळू प्रज्वलित होत गेला
स्त्री शिक्षणाचा दैदिप्यमान चिराग
बघता बघता घेतली स्त्रियांनी
गगन भरारी सर्व क्षेत्रात
भारतीय स्त्री च्या यशाचं मूळ
आहे फुले दाम्पत्याच्या कष्टात
अनाथ अस्प्रुश्य सर्वांनाच कवटाळलं मायेने ऊराशी
सर्वांचं केलं शिक्षण संगोपन
फुलवल्या ज्ञानाच्या राशी
कधी न विसरू तयांचे
उपकार थोर
आदरभावे करू नमस्कार
दगडांचे झाले पुष्पहार
जिच्या हाती होते फक्त चूल मूल
अन् पाळण्याची दोरी
एके काळची अबला नारी घेतेय आज उत्तुंग भरारी
सर्वस्वी हे श्रेय आहे
देवी सावित्री तुला
तुझ्या जयंतीदिनी घेतो शपथ
वाचवू,शिकवू प्रत्येक लेकीला
राजेंद्र र.वाणी
दहिसर मुंबई🙏🌷



आई बदलतेय 


आई आता दिसत नाही सतत
कळकट मळकट धुडक्यात
दिवसभर कामाच्या रगाड्यात
आई आता मस्त जीन्स टॉप घालतेय
आई आता स्वतःसाठी सुद्धा वेळ काढतेय
कारण आई आता बदलतेय ।

आई आता बसत नाही चुलीपुढे
लाकडं फुंकून फुंकून डोळे लाल करत
आई आता स्मार्ट किचन मध्ये
नवं नव्या रेसिपी बनवते
कंटाळा आला तर चक्क स्विगीचे
पार्सल मागवतेय
खरचं आई आता बदलतेय ।

आई आता पसरत नाही बाबांकडे हात छोट्या छोट्या गरजांसाठी
आणि खात नाही सासूचा आणि नवऱ्याचा मार
उलट आई आता बाबांच्या खांद्याला खांदा लावून कमावतेय
हो खरंच आई आता बदलतेय ।

आई आता रडत नाही जुन्या दिवसांचे गाऱ्हाणे
सासवा नणंदा जावांचे ते घेत नाही उखाणे
ती आता म्हणत नाही बाईचा जन्म खोटा
उलट मुलाला पराठे अणि मुलीला कराटे शिकवतेय
हो खरचच आई आता बदलतेय ।

आई आता हसतेय , नाचतेय ,
मनासारखे जगतेय , काळाप्रमाणे बदलतेय , आवडेल तसंच वागतेय 

पण.....
बाळाचं रडणं ऐकू येताच
तीचे पाऊल मात्र थबकतेय
खरंच का आई अगदी पुर्णपणे बदलतेय ?

सौ तनुजा सुरेश मुळे .

मला शाळेत बसू दे*

*हात जोडतो साहेब तुम्हा*

*मला शाळेत बसू दे*

*देवासारखा गुरुजी मला*

*रोज शाळेत दिसू दे...*


*पाटी दिली, पेन्सिल दिली*

*शब्द गिरवणार सांग कोण*

*डोसक्यात आमच्या बाराखडी*

*खोकून शिरवणार सांग कोण*

*चुकेल जेव्हा शब्द माझा*

*त्याला मजवर रुसू दे*

*देवासारखा गुरुजी मला...*


*वाट बघतोय फळा त्यांची*

*त्याला रंगवणार सांग कोण*

*भिंती झाल्यात अबोल इथल्या*

*शांती भंगवणार सांग कोण*

*गुणवत्ता जर खरंच हवी तर*

*त्याला कंबर कसू दे*

*देवासारखा गुरुजी मला...*


*नागरिक आम्ही भविष्यातले*

*आम्हा घडवणार सांग कोण*

*समोर ठाकल्या शत्रूंसमोर*

*आम्हा नडवणार सांग कोण*

*शिकवू दे त्याला मनाजोगे*

*इतर कामचं नसू दे*

*देवासारखे गुरुजी आम्हा...*


*कारकून केलाय गुरुजीस माझ्या*

*त्याला समजून घेणार कोण*

*तोच आमचा परीस आहे*

*त्याला उमजून घेणार कोण*

*तरीही कधीही रडला नाही*

*त्याला आमच्यात हसू दे*

*देवासारखा गुरुजी मला...*


           *कवी-प्रसाद फर्डे*

            *शहापूर,ठाणे*

         *मो.७२७६४२४०९८*

 दिवाळी 

तो म्हणाला दिवाळी आली की 

हल्ली धड धड होतं 

जुनं सारं वैभव आठवून 

रडकुंडीला येतं 


चार दिवसाच्या सुट्टीत आता 

कसं होईल माझं 

एवढ्या मोठ्या वेळेचं 

उचलेल का ओझं ? 

 

मी म्हटलं अरे वेड्या 

असं काय म्हणतोस 

सलग सुट्टी मिळून सुद्धा 

का बरं कण्हतोस ?


काय सांगू मित्रा आम्ही 

चौघ बहीण भाऊ 

कुणीच कुणाला बोलत नाही 

मी कुठे जाऊ?


आता कुणी कुणाकडे 

जात येत नाही 

आम्हालाही दोन दिवस  

कुणीच बोलावीत नाही 


चार दिवस कसे जातील

मलाच प्रश्न पडतो 

लहानपणीचे फोटो पाहून 

मी एकटाच रडतो 


पूर्वीच्या काळी नातेवाईक 

बरेच गरीब होते 

तरीही ते एकमेकाकडे 

जात येत होते 


कुणाकडे गेल्या नंतर 

आतून स्वागत व्हायचं 

सारं काम साऱ्यानी 

मिळून मिसळून करायचं 


सुबत्ता फार नव्हती 

पण वृत्ती चांगली होती 

गरिबी असून सुद्धा 

खूप मजा होती 


मुरमुऱ्याच्या चिवड्या मधे

एखादाच शेंगदाणा भेटायचा 

त्याप्रसंगी आनंद मात्र 

आभाळा एवढा असायचा 


लाल,हिरव्या रंगाचे 

वासाचे तेल असायचे 

अर्ध्या वाटी खोबर्याच्या तेलात 

बुडाला जाऊन बसायचे 


उत्साह आणि आनंद मात्र 

काठोकाठ असायचा 

सख्खे असो चुलत असो 

वाडा गच्च दिसायचा 


चपला नव्हत्या बूट नव्हते 

नव्हते कपडे धड 

तरीही जगण्याची 

मोठी  धडपड 


सारे झालेत श्रीमंत 

पण वाडे गेले पडून 

नाते गोते प्रेम माया 

विमानात गेले उडून 


घरा घरात दिसतो आता 

सुबत्तेचा पूर 

तरी आहे मना मनात 

चुली सारखा धूर 


पाहुण्यांचे येणे जाणे 

आता संपून गेले 

दसरा आणि दिवाळीतले

आनंदी क्षण  गेले 


श्राद्ध , पक्ष व्हावेत तसे 

मोठे  सण असतात 

फ्लॅट आणि बंगल्या मधे 

दोन चार माणसं दिसतात 


प्रवासाची सुटकेस आता 

अडगळीला पडली 

त्या दिवशी माझ्याजवळ 

धाय मोकलून रडली 


हँडल तुटलं होतं तरी 

सुतळी बांधली होती 

लहानपणी तुमची मला 

खूप सोबत होती 

 

सुटकेस म्हणली सर मला 

पाहुण्याकडे नेत जा 

कमीत कमी दिवाळीत तरी 

माझा वापर करीत जा 


सुटकेसचं बोलणं ऐकूण

माझं ही काळीज तुटलं 

म्हणलं बाई माणसाचं 

आता नशीब फुटलं 


*म्हणून म्हणतो बाबांनो  अहंकार सोडा* 

*बहीण भाऊ काका काकू पुन्हा नाती जोडा* 


*संदुक आणि वळकटीचे  स्मरण आपण करू* *दिवाळीला जाण्यासाठी* 

*पुन्हा सुटकेस भरू...*

 व्वा लई भारी 

आमनी अहिराणी 

समद्या भाषासमा 

शोभस ती राणी 


काय सांगू   तिना गोडवा 

जसा साकरमाना   गोड मावा 


चकली चिवडा   शंकरपाया 

तशी मनी अहिराणी शे  अत्तरना फाया 


बहिणाबाई शे लेक  अहिराणी मायनी 

तिना कवितामा शे   गोडी अम्रुतनी 


इसरू नका रे   अहिराणी मायले 

खवडावं पिवडावं   मायनी तुमले 


खान्देशनी राणीना   मान शे तिले 

दिवाळीनी शुभेच्छा प्रेमथी   दी र्हायनू तुमले 


बठ्ठा सुखी र्हाओत   आईच प्रार्थना कानबाईले 

करस तुमना आख्खा   कुटुंब करता दिवाईले 


दिवाईना प्रकाश  येवो तुमना जीवनमा 

दिवाईना फराय पडो  भरपूर तुमना पेटमा 


समदासले आई दिवाली सुख सम्रुद्धीनी,भरभराटीनी जावो 

नवा वरीसना बठ्ठा दिन   तुमले आनंदना जावो 

राजेंद्र वाणी दहिसर 

*उंदराच्या मिशा* 

एकदा उंदीराला फुटली मिशी 

मांजराला त्याने दाखविली भिती 

मांजर म्हणाले याला झाले काय? 

आता कधी कुणाचा भरोसा नाय


घुशीला मग उंदीरमामा भेटले 

त्याचे म्हणणे घुशीलाही पटले 

म्हणे राञो आपण सोबत फिरु 

कुणाच्याही घरात सर्रास शिरु 


आता कुणालाच नका भिऊ 

मांजराचे दुध आपणच पिऊ

किचनमध्ये मारुयाच डल्ला 

मांजर करणार नाही हल्ला 


तू- मी आता असा नकोच भेद 

तुझे काम एक भिंतीला  छेद

छिद्रातून दोघे शिरायचे मस्त 

घरातलचे अन्न करायचे फस्त

उंदराच्या राज्यात शिरल्या घुशी

याची मांजराला वाटतेय भिती 

कारवाया आता कराव्या कशा ?

कारण उंदीरला फुटल्यात मिशा

                  *धनराज खानोरकर* 

           एक विडंबन ...       

तुम्हावर केली मी मर्जी बहाल 

नका सोडूनी जाऊ ताज महाल 

             

हजारोंचे बीलं भरतो हाटेलची 

ही नजर रोखते फंद फितूरीची

जवळी रहावं,मला सांगावं गुपित तुमचं खुशाल 


फिगर तुमचा सांगा खुशाल, 

मज सौदागर  म्हणू की  म्हणू दलाल

या मैफिली बसा, सत्तेचा डाव सुटेल


विरह जाळूया मजा करू या

असे  गोलाकार ही दुनिया 

खाऊ पिऊ घालतो तुम्हा,विनवितो सांज सकाळ


सत्तेचा उघडेल पिंजरा तुमच्या पायी, 

अशीच -हावी युती आपुली बाई

कधी ना व्हावे निराश,होईल उषःकाल

दिलीप मालवणकर 

 समुद्र 

समुद्राला भरती ओहोटीची सवय असते

भरतीने समुद्र मातत नाही

ओहोटीने समुद्र आटत नाही

कारण तो समुद्र असतो


समुद्र असतो अनंत विशाल

अनेक गुपितं पोटात असतात

अनेक जीवाणू त्याच्यावर विसंबून असतात

कारण तो समुद्र असतो 


समुद्र असतो निरक्षीर वृत्तीचा

अनावश्यक वस्तू तो भिरकावून देतो

अनमोल वस्तू तो जीवापलिकडे जपतो

कारण तो समुद्र असतो 


समुद्र असतो कोट्यावधींचा पोशींदा

महाकाय बोटीतून मानव त्याची अपत्य हिरावून नेतो

तेव्हा तो धायमोकलून रडतो

कारण तो समुद्र असतो 


समुद्र तोलून धरतो महाकाय जहाजं

पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळ करतो

पण पोरांच्या भांडणात जहाज फुटते

तेव्हा समुद्राचाही नाईलाज होतो


समुद्र कधी मुक असतो

कधी तो रागवतो घोंघावतो

समुद्राला जेंव्हा मानव गटार समजतो

तेंव्हा समुद्र आपल्या कर्माला दोष देतो !

दिलीप मालवणकर 

9822902470

 मुली शिवाय घराला

नसते घरपण 

येऊ द्या लेक जन्माला 

फुलवुया छान तिचं बालपण 


भावाला नसेल बहीण 

तर राखी कोण बांधणार 

निळ्या आभाळात 

झोका उंच कोण नेणार 


लेक असते मोहक

गोजिरी परी 

तिच्या छुम छुम पैंजणातून 

भरतात अम्रुताच्या घागरी 


पैंजणाच्या तालावर डोलतात 

कानातले डूल 

प्रत्येक संसार वेलीवर फुलावं 

लेकीच्या रुपात सुंदर फूल 


गोजिरवाण्या परीसाठी 

आख्खा बाजारही अपूरा पडतो 

तिच्या बोबड्या बोलातून

घरात स्वर्ग उभा राहतो 


छातीला कवटाळून फिरते 

जेव्हा ती लाडक्या बार्बीला 

किती आनंद होतो 

बघतांना आई बापाला 


कसा रंगणार तिच्या शिवाय 

खेळ भातुकलीचा 

अवर्णनीय असतो आनंद 

लग्नातल्या कन्यादानाचा  


भ्रुण हत्येचं वा बलात्काराचं 

नको संकट तिच्या वाटेला 

तिच लावू शकते लळा

म्हाता-या आई बापाला 


पूर्वी चपला झिजवत असे 

बाप पोरीचा 

मिळत नाहीत मुली म्हणून आता

झिजवतोय चपला बाप पोराचा 


स्री भ्रुण हत्येचाच आहे 

हा सारा परिणाम 

मुलगी पोटी आल्याचा

बाळगा आई बाबांनो अभिमान

राजेंद्र र.वाणी

बालभारतीचे पुस्तक 

आई मला वाचू दे बालभारतीचे पुस्तक

काॅन्व्हेटमध्ये घालून हरवले माझे दप्तर 

चिऊताई,कावळेदादावर कुठेच नाही लेख

इंग्रजी शाळा म्हणजे A,B,C,D चाच केक 

इंग्रजीतच बोलतात अन् इंग्रजीतच चालतात 

मराठी बोललं की, मॅडम गालावर मारतात 

लहानपणापासून मी कसा होऊ गं हस्तक? 

आई मला वाचू दे बालभारतीचे पुस्तक 


विटीदांडू,चोरशिपाई खेळ नाही ग्राऊंडवर 

प्रिन्सिपल तो-यात येतात कधीही राऊंडवर 

क्रिकेट अन् फुटबॉल आंम्ही खेळतो खेळ 

दमलो की केळाऐवजी खायला देतात भेल

तुझ्या लपाछपी,लघोरीपेक्षा क्रिकेट किचकट 

आई मला वाचू दे बालभारतीचे पुस्तक 


तुझ्या तोंडचे गीत आमच्या बुकात नाही 

म्हणून माझे मन रमते बालभारतीत आई 

बाबाने ठेवले सारे हे आमच्यासाठी जपून 

किती सारी माहिती त्यात आहे गं छापून 

खरे गुरु आईबाबा त्यांच्यासमोर नतमस्तक 

आई मला वाचू दे बालभारतीचे पुस्तक

*धनराज खानोरकर* 

   *.परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला.*

*."दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला.*

*."उंदीर कुठे पार्क करू.?  लॉट नाही सापडला".*

*.मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला".*

*."तू पण ना देवा, कुठल्या  जगात राहतोस.?.*

*.मर्सिडीजच्या जमान्यात  सुद्धा उंदरावरून फिरतोस.?".*

*."मर्सिडीज नाही, निदान   nano तरी घेऊन टाक.*

*.तमाम देव मंडळींमध्ये  थोडा भाव खाऊन टाक.*

*."इतक्या मागण्या पुरवताना   जीव माझा जातो.*

*.भक्तांना खुश करेपर्यत खूप खूप दमतो".*

*."काय करू आता माझ्याने manage होत नाही.*

*.पूर्वीसारखी थोडक्यात    माणसे खुशही होत नाहीत".*

*."immigration च्या requests ने system झालीये hang.*

*.तरीदेखील संपत नाही   भक्तांची रांग".*

*."चार-आठ आणे देऊन   काय काय मागतात.*

*.माझ्याकडच्या files   नुसत्या वाढतच राहतात".*

*."माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation.*

*.management च्या theory मध्ये मिळेल तुला solution".*

*."M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे.?.*

*.Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे.?".*

*."असं कर बाप्पा एक Call Center टाक.*

*.तुझ्या साऱ्या दूतांना एक-  एक region देऊन टाक".*

*."बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको.*

*.परत जाऊन कुणाला,   दमलो म्हणायला नको".*

*.माझ्या साऱ्या युक्त्यांनी   बाप्पा खुश झाला*

*."एक वर देतो बक्षीस, माग   हवं ते म्हणाला".*

*."CEO ची position, Townhouse ची ownership.*

*.immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship".*

*.मी हसले उगाच, "म्हटलं   खरंच देशील का सांग.?".*

*.अगं मागून तर बघ,  थोडी देणार आहे टांग.?.*

*."पारिजातकाच्यासड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं.*

*.सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं"*

*."हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव.*

*.प्रत्येकाच्या मनात थोडा  मायेचा शिडकाव".*

*."देशील आणून मला माझी हरवलेली नाती.?.*

*.नेशील मला परत जिथे आहे माझी माती.?".*

*."इंग्रजाळलेल्या पोरांना  थोडं संस्कृतीचं लेणं.*

*.आई-बापाचं कधीही न  फिटणारं देणं.?".*

*."कर्कश्श वाटला तरी हवा   ढोल-ताशांचा गजर.*

*.भांडणारा असला तरी  चालेल, पण हवा आहे शेजार".*

*."यंत्रवत होत चाललेल्या  माणसाला थोडं आयुष्याचं भान.*

*.देशील का रे देवा, यातलं  एक तरी दान.?".* 

*."तथास्तु" म्हणाला नाही,  बाप्पा नुसता सोंडेमागून हसला 

सारं हाताबाहेर गेलंय पोरी, "सुखी रहा" म्हणाला. . . . .*😊








आंब्याचे स्वागत भाजीबाजारात झाल्या बरोबर इतर भाजीपाल्याच्या गप्पा सुरु झाल्यात🌶🥕🥔🍆🍋🍅🌽🥕🥒🥦

" भाज्यांच्या गप्पा  "
-------------------------------------

कलकल ऊन वाढलं की 
सुकू लागतात भाज्या 
थाटामध्ये प्रवेश करतो 
फळांचा राजा 

भाज्या भाज्यात हळू आवाजात 
चर्च्या झाली सुरु 
एकमेकीच्या मनातली 
खद खद बाहेर आली 

हिरवी ढोबळी मिरची म्हणली 
" दोडक्या " कसं होईल ?
काय माहित गिऱ्हाईक कधी 
आपल्याला घरी नेईल 

गवार म्हणली ए कांद्या 
तुझं मात्र बरंय 
बारा महीने तुझी चलती 
आमचं काय खरंय ?

कांदा म्हणला गवारताई 
उपयोग काय त्याचा 
आम्हाला फक्त तोंडी लावतेत 
मुख्य मान तुमचा 

दिसायला दिसतंय बुटकं 
पण वांग्याला भलताच मान 
काळ्या रस्याच्या भाजीला 
सगळेच म्हणतेत छान 

मेथी अन पालक बाई 
नेहमीच हिरव्या साडीत 
टमाट  म्हणतं मीच एकटा 
चवीला असतो गोडीत 

मला तर बाई काही काही येडे 
उगीच वाळीत टाकतेत 
शेपूची भाजी खाल्ली की म्हणे 
वेगळेच ढेकरं येतेत 

आलू , कोबी , डांगर पहा 
किती जास्त लठ्ठ 
भेंडी म्हणती बघा बघा 
दिसते का नाही " फिट्ट " ?

शेवग्याची शेंग म्हणली 
सरक तिकडं भवाने 
चांगली उंची , रंग , रूप 
दिलं मला देवाने 

कार्ल म्हणलं मी तर आधीच 
कडू म्हणून प्रसिध्द 
आमची भाजी केली की 
घरात होतं युद्ध 

आंब्याचा थाट बाई 
भलताच न्यारा दिसतो 
बघ न कसा गाड्यावरती 
एकदम ऐटीत बसतो

उन्हाळ्याच्या दिवसा मध्ये 
लोकं ही येड्यावणीच करतेत 
केशर , हापूस म्हणलं की 
पटकन थैलीत भरतेत 

मुडदा बाजारात आला की 
दहशत निर्माण करतो
गरीब असो श्रीमंत असो 
दररोज रस करतो 

भाज्या म्हणल्या खरोखरच 
खूप त्रास होतो 
आंबा निघून गेला की 
जीव भांड्यात पडतो


ऋतूंप्रमाणे रोज नव्याने
हाक मारती आम्हा फळे,
आम्ही धावतो भलत्यापाठी
सात्विक खाणे का न कळे ?

टरबूज म्हणतो आलो मित्रा
घे माझा तू भरपूर स्वाद,
नकोच खाऊ काही बाही
नकोस भलता करूस नाद.

रोज शहाळे हाका मारी
अमृत त्याच्या पोटाशी,
गाढ तृप्तता मिळते त्याला
बघा लावूनी ओठाशी.

पपई म्हणे मी छान बहुगुणी
ठेव ध्यानी मी पाचक रे,
कशास खातो चूर्णे सोळा
खुशाल होऊन याचक रे.

छान रसरशीत लिंबू म्हणतो
माझा ताजेपणा पहा,
लिंबूपाणी पी खुशाल अन
उत्साहातच न्हात रहा.

संत्री आणि मोसंबीच्या
मोठ्ठीच जादू अंगात,
मैत्री त्यांची सदा रंगवी
जीवन विविध रंगात.

पेरू, द्राक्षे, फणस नि बोरे
खुशाल खावी कैरी रे,
नकोच काही भलते सलते
आरोग्याचे वैरी रे.

सफरचंद अन सीताफळाला
स्थानच देऊ या वरचे,
दोन काळजीवाहू आपले
मानु या त्यांना घरचे.

अननस, अंजीर, आवळा ही तर
अ दर्जाची छान फळे,
हातात घेता हात तयांचा
भयाण संकट दूर पळे.

केळी, कवठे, खजूर, खरबूज
जांभूळ सुद्धा खरे महान,
चिंचा करवंदेही खावी 
होऊन जावे बरे लहान.

आंबा हा तर राजा मित्र
दे त्यालाही टाळी रे,
छान मांडली समोर प्रभूने
फळांची नैसर्गिक ही थाळी रे.

🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋



Dedicated to All Lovely Couples who say *तीचे नी माझे मस्तच जमते*

*मी आणि बायको*

पूर्व दिशा जी मला उमगते
पश्चिमा ती तीलाच म्हणते
तरीही म्हणतो आनंदाने 
तीचे नी माझे मस्तच जमते IIधृII

रास माझी मेष रांगडी
कन्या हीची हो रास असे
कुणी जुळविली जोडी अमुची
ट्रॅक्टरी स्कुटीचे चाक जसे
मृत्यूषडाष्टक योग असूनही  
सहजीवन ते नित्य चालते
म्हणून म्हणतो आनंदाने 
तिचे नी माझे उत्तम जमते II१II

गरम चहाची तल्लफ मजला
हीला लागते फिल्टर कॉफी
मला आवडे कंदी पेढा
हीला हवी ती मलई बर्फी
गरम मसाला दूध जे मजला
थंडे आईस्क्रीम तिला भावते
तरीही म्हणतो आनंदाने 
तिचे नी माझे छानच जमते II२II

नाटकात मी जीव रमवतो
ती तर भाळी चित्रपटाला
शास्त्रीय संगीत भावे मजला
भावगीतच ते पसंत तिजला
कर्तृत्त्वावर माझी श्रद्धा
देव दैव ती खूप मानते
तरीही म्हणतो आनंदाने 
तिचे नी माझे झकास जमते II३II

मनमौजी  बेधुंद असा मी 
हिचा शिस्तीचा करडा बडगा
विजोड जोडी ऐसी अमुची
मैफल जैसी गिटार डग्गा
संगीताच्या तालाकरीता
दोहींची मग जुळणी लागते
म्हणून म्हणतो आनंदाने 
तीचे नी माझे सुंदर जमते II४II 

प्रणय भावना अशी उराशी
सदैव मी ती उत्कट जपतो
हिचा प्रणय तो साफसफाई
घरकामातच विरून जातो
खूप वाटते वेणीत हीच्या ते
फुल सुगंधी सुरेख खुलते
हट्टाने ती झटके देऊनी
केशकुंतली गजरा माळते
तरीही म्हणतो आनंदाने 
तीचे नी माझे खासच जमते II५II

अनेक ऐशा गमती जमती
रोज रंगवी आयुष्याला
आवडी निवडी सेम नसूनही
तीच असे मम सुखदुःखाला
गोष्ट हरेक तीची न माझी 
सेम असावी, स्वप्नची ठरते
म्हणूनच म्हणतो आनंदाने 
तीचे नी माझे बेस्टच जमते II६II

कधी वाटते एक "शनया"
आपुल्याही जीवनात यावी
"राधिकेला"आपुल्या मग
अंतरीची ती व्यथा कळावी 
"गुरूनाथाची" कसरत बघूनी
मन हे नंतर मागे फिरते
समजून म्हणतो आनंदाने 
तीचे नी माझे मस्तच जमते II७II
🙏🏼🙏🏼
कविता माझी नाही पण कवीने काय यथार्थ वर्णन केलंय आामच्या जोडीचं!


*तुझ्या वांझोटी फुलण्याला कोण जबाबदार आहे* 


घडयाळाचे काटे फिरता-फिरता 

' *कमळ* ' आता फुललं आहे

तुझ्या वांझोटी फुलण्याला

 कोण जबाबदार आहे ...


आश्वासनांचा मारा करून

सत्ता तुझी चालू आहे

अलगद बाजूला सारुनी काटा

केसाने गळा कापत आहे..


' *मन की बात'* सांगत

' *कमळाबाई* ' निव्वळ खोटं बोलत आहे

प्रेमाचं नाटक करता-करता

" *देवी और सज्जनों* "म्हणत आहे.....


दिलासा देवून शेतकऱ्यांना 

विदेशवारी चालूच आहे

पाऊस नाही-पिक नाही

बळीराजा पुन्हा-पुन्हा झाडाला लटकतो आहे...


बस्सं! झाल्या आणा-भाका

सत्तेधारी माजोरी बनली आहे

गॉड,विठ्ठलाsss सांगेल का कोणी

' *रामराज्य* ' कधी येणार आहे...


इथे सारेच प्रकांड पंडित 

जणू रावणच जीवंत आहे

अजून देखील कळत नाही

कोण सुग्रीव,कोण बाली आहे...


एकच आशा ठेवतोय आम्ही

स्वाभिमानाने जगायचं आहे

पुरे करा तुमचा खेळ खंडोबा

आमचे शब्द आता तासून ठेवतो आहे...


पेटून उठतिल सारे

असा बुलंद आमचा आवाज आहे

सागरासारखा उफाळू नकोस

आमचा ' *अगस्ति* ' पण तयार आहे...


जागा तुझी ओळख

चिखलातच तुझा पाय आहे

नाहीतर मीच तुझ्यासाठी

जमदग्निपुत्र ' *पर्शुराम* ' आहे

नाहीतर मीच तुझ्यासाठी

जमदग्निपुत्र ' *पर्शुराम* ' आहे......


नाव-चिंतामणी लक्ष्मण पावसे

यश म्हणजे?


वयाच्या चौथ्या वर्षी

यश म्हणजे ...

आता चड्डीत ' शू ' न करणे,


आठव्या वर्षी यश म्हणजे ...

घरी परत येण्याचा नेमका रस्ता माहित असणे,


बाराव्या वर्षी यश म्हणजे

मित्रमंडळी जमा होणे,


अठराव्या वर्षी यश म्हणजे

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे,


तेवीसाव्या वर्षी यश म्हणजे

विद्यापिठातून पदवी संपादन करणे ,


पंचवीसाव्या वर्षी यश म्हणजे

मनाजोगता जॉब मिळवणे,


तिसाव्या वर्षी यश म्हणजे

लग्न करून स्थिरस्थावर होणे ,


पस्तिसाव्या वर्षी यश म्हणजे

बऱ्यापैकी पैसा कमावणे,


पंचेचाळीसाव्या वर्षी यश म्हणजे

अद्यापही आपण तरूण असल्याचा भास निर्माण करणे ,


पन्नासाव्या वर्षी यश म्हणजे

मुलांना चांगले शिक्षण देणे,


55 व्या वर्षी यश म्हणजे

आजही सगळी कर्तव्ये पार पाडण्यासाठी सक्षम असणे ,


60 व्या वर्षी यश म्हणजे

ड्रायव्हिंग लायसेन्सचे नुतनीकरण करणे ,


65 व्या वर्षी यश म्हणजे

निरोगी आयुष्य जगणे ,


70 व्या वर्षी यश म्हणजे

कुणालाही आपले ओझे न वाटणे ...

याचे समाधान असणे,


75 व्या वर्षी यश म्हणजे

जुन्या मित्रां सोबत लहानपणीच्या गप्पा मारणे,


80 व्या वर्षी यश म्हणजे

घरी परत येण्याचा रस्ता लक्षात राहणे,


आणि ...


85 व्या वर्षी यश म्हणजे

पुन्हा एकदा चड्डीत ' शू ' न करणे ...            

                           *पु. ल.देशपांडे*



: गावाकडला सुदामा सुद्धा 

फेसबुकवर टाकतो पोष्ट...

बदललेल्या गावाची 

सांगतो तुम्हाला गोष्ट.....।।

गावं माणसं शेतीवाडी,

सगळं झालयं ओल्ड...

कांताबाई,शांताबाईसुद्धा

झालीय आता बोल्ड...।।

शेतकरी झालायं फार्मर,

मळा झालायं फार्म...

झोपडीत लागलायं एसी,

तापमान झालयं वार्म.....।।

लोण्याला म्हणती बटर,

अन् पाण्याला म्हणती वाटर...

तुपालाही म्हणू  लागलेत आता देशी घी,

देशी पीताना म्हणती थोडं वाॅटर टाकून पी...।।

काळ आता बदललाय,

नवं नवं आलयं टेकनीक...

पिटलं भाकरी खाण्यासाठी,

निघू लागल्यात पिकनीक.....।।

धोतर टोपी सद-याऐवजी,

घालू लागलेत जीन्स....

लुगड्याऐवजी गाऊन घालून,

फिरु लागल्यात क्विन्स....।।

हरीपाठाऐवजी आता ,

करु लागलेत प्रेयर...

म्हातारासुद्धा म्हातारीला,

म्हणू लागलाय डियर...।।

गावाकडल्या हागणदारीचा,

मोठा झालाय इश्यू.....

दगडपाण्याऐवजी आता,

टाॅयलेटला लागतोय टीश्यू.....।।

नाती संपली शेती संपली,

गावाचं झालयं व्हिलेज...

पिकपाणी सांगणारं ,

आटून गेलयं नाॅलेज....।।

वायफाय ईंटरनेटमुळं,

बरबाद झालीय पिढी...

बांधावरली पोट्टेसुद्धा ,

घोकू लागलीत एबीसीडी....।।

फेसबूक, व्हाटसअॅपपायी,

तरुण झालेत मॅड...

कर्जामुळं निराशेपोटी,

आत्महत्त्येचं आलयं फॅड....।।

एवढचं करा गाॅड विठ्ठला,

आता पावसाळ्यात पाडा रेन....

हॅपी होवू द्या फार्मर,

कमी होवू द्या पेन.....।।


*फार्मर फ्रेंड!*


💧🌱


प्रत्येक स्त्री च्या डोक्यावर

एक पूर्णं भरलेली घागर असते .....

तिचा तोल सांभाळून तिला आयुष्य काढायचे असते....


प्रत्येकीची घागरीत

विचारांची,जाणीवांची,

जबाबदारीची , वेदनां आणि सासर माहेर चा समतोल ठेवून तिला चालायच असते.....


आणि ते ही...

मान ताठ ठेऊनच चालायचंय तिने....

आणि चेहर्‍यावर ठेवायचंय खर किंवा उसनं हसू....


घागरी तील पाणी खूप 

हिंदाळते...

कधी शिंतोडे मारते....

खळखळून तिथेच गिरक्या

मारते घागरी च्या  कडेवर जोर जोरात ठेचाळते....

पण तरीही ते घागरीतच

राहते.....


पाणी हिंदकळता 

उपयोगी नाही

माठ फुटूनही 

चालणार नाही.....


पायी काटे,तापतं उन

तरिही ती वाहतेच आहे पाणी युगानूयुगे.....


आपल्या वाटणीचा हा पाणवठा भरतेच आहे.....

देह ,मन थकले तरी ...कर्तव्य तिचे चालू आहे....


तरिही ....

पाणी आणि घागरीचा तोल ती आदी काळापासून सांभाळत आहे....


असंही एक ऋतूचक्र आणि अशी एक तु 

वंदन प्रत्येकीला....

🍁✍🏻..

एका संध्याकाळी तिला

घरी जावसच वाटेना

किती बसेस गेल्या तरी

ती जागची उठेना

तिचं हे वागणं 

तिला स्वत:लाच पटेना

पण तरी उठून घरी जावं 

असं तिला खरच वाटेना

नक्की आपलं घर कुठलं ?

हा प्रश्न तिचा सुटेना

अन तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल

असं गर्दीत कोणी भेटेना

रहदारी काय आपली

घरी जायच्या घाईत

अन ही लोटली जात होती

तिच्या विचारांच्या खाईत

लहानपण एका घरी

अन मोठेपणी दुसर्‍या घरी

हा नियम म्हणून तिला पटेना

अन ज्यानी दुसर्‍या घरी पाठवलं 

ते घरही तिला आपलं वाटेना

एका संध्याकाळी खरच 

तिला घरी जावसं वाटेना

रहदारी ओसरली अन रस्ते

सुने लागले पडायला

तसा तिच्या उरातला जिव

धड धड लागला उडायला

घर दिसत नव्हतं पण 

घरचे दिसत होते

ती तिथेच होती बसून तरी 

तरी ते समोर येऊन हसत होते

त्याना बघणं टाळण्यासाठी

पापणी तिची मिटेना

पण हे खरं की एका संध्याकाळी

तिला घरी जावसं वाटेना

जाता जाता भाजी घेणं तिचं 

नेहमीचं काम होतं 

आणि आता घाई करायची तर

घर खरच लांब होतं 

ती स्वत:च्याच विचारात गर्क

पहात राहिली आकाश

अन कोणीतरी तिच्यापाशी

येऊन बसलं  सावकाश

तिची लागलेली तंद्री त्याने

भंग होऊ दिली नाही

आणि कोणी शेजारी बसलय

हे तिच्या लक्षात आलं नाही

अन जेंव्हा लक्षात आलं 

तेंव्हा लक्षात आलं सारं 

अन नं विचारता तिच्या प्रश्नाचं 

तिला उत्तर मिळालं खरं 

तिचे भरून वाहिले डोळे

आणि भरून आला गळा

तिला कुशीत घेऊन बसला होता

तिचा वेडा खुळा

याला काही कळत नाही

असं नेहमी तिला वाटे

पण आज त्याने परतवून लावले

तिचे सारे आरोप खोटे

मग मात्र तिला

घाईनं निघावसं वाटलं 

अन त्याला मात्र तिथेच जरा 

निवांत बसावसं वाटलं 

ती लटकं रागावत म्हणाली

तुला काही कळतं का नाही?

तो म्हणाला बघुया तुझ्या

प्रश्नाचं उत्तर तुला मिळतं का नाही?

खुदकन हसत ती म्हणाली

तुला काय माहीत?

तो म्हणाला उत्तर मिळाल्यावर

असे प्रश्न विचारायचे नाहीत

तुझ्यासाठीच  तर ते घर

उभं केलं राणी

तू  नसलीस तर त्या घराकडे

पाहील तरी का कोणी?

असे प्रशन कधीच आपण 

 एकट्याने सोडवायचे नसतात

त्यासाठी मदतीला आपली माणसं असतात

आपल्या माणसासाठी आपण 

घरी जायचं असतं 

नाहीतर एखादं वेडं माणूस

उगाच विचार करत बसतं ॑......

मंगेश पाड़गांवकरांची एक अत्यंत सुंदर अर्थवाही कविता !


*'सा रं  का ही  स्व तः सा ठी'*


देवधर्म पूजाअर्चा

सारं असतं स्वतःसाठी

देवाला यातलं काही

नको असतं स्वतःसाठी


फुलं अर्पण करतो देवाला

ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून ?

सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा

त्याला काय करायचंय फुलं घेऊन ?


नैवेद्य जो आपण दाखवतो

तो काय देव खातो ?

तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं

भरणपोषण करीत असतो !


निरांजनाच्या इवल्या ज्योतीने

ओवाळतो आपण प्रभूला

चंद्रसूर्य जातीने

हजर ज्याच्या दिमतीला


स्तोत्रं त्याची गातो ती काय

हपापलाय म्हणून स्तुतीला ?

निर्गुण निराकार जो

त्याला अवडंबर हवंय कशाला ?


सारं काही जे करायचं

ते स्वतःसाठीच असतं करायचं ,

प्रार्थनेनं देव बदलत नसतो

स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं !

आवडलेल्या आमटीचा

आवाज करीत मारता भुरका

विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,

आनंदाने जगायचं नाकरणं

याच्यासारखा दुसरा शाप नाही !


जबरदस्त डुलकी येते

धर्मग्रंथ वाचता वाचता !

लहान बाळासारखे तुम्ही

खुर्चीतच पेंगू लागता !

विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,

आनंदाने जगायचं नाकारणं

याच्यासारखा दुसरा शाप नाही !


देवळापुढील रांग टाळून

तुम्ही वेगळी वाट धरता !

गरम कांदाभजी खाऊन

पोटोबाची पूजा करता !

विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,

आनंदाने जगायचं नाकारणं

याच्यासारखा दुसरा शाप नाही !


प्रेमाची हाक येते

तुम्ही धुंद साद देता !

कवितेच्या ओळी ऐकून

मनापासून दाद देता !

विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,

आनंदाने जगायचं नाकारणं

याच्यासारखा दुसरा शाप नाही !


-- *मंगेश पाडगावकर*

🙏🏻 🌺 🙏🏻  🌺 🙏🏻 🌺 🙏🏻 🌺 🙏🏻 


तो बसतो, तो फसतो, तरी *गालातच* हसतो

दीड, पाच, सात, अकरा *सांगाल* तेवढे दिवस बसतो

*Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो.*


आपल्यासारखा असता तर *काय* म्हणाला असता?

*नैवेद्य* दाखवल्यावर -

आजकाल *२१ मोदकाने* काय होतेय सायेब?

असं म्हणाला असता?


*नवस* पूर्ण न झालेल्या भक्ताला,

तुम्ही नवसाच्या *लाईन* मध्ये नव्हता ना मैडम,

असं म्हणाला असता?


*अंधेरी* वरून आलेल्या भक्ताला, *लालबाग* चा बाप्पा

हे अंधेरीचं *मैटर* आहे अंधेरी च्या बाप्पाला *कॉन्टॅक्ट* करा,

असं म्हणाला असता?


*नाही...*


त्याचा *आशीर्वाद* सगळ्यांवर *सारखाच* बरसतो..

*Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो*


त्याच्या *नावाखाली* आम्ही *धंदा* थाटलाय,

*एक* असला तरी त्याला *मंडळामध्ये* वाटलाय,


*गणपतीच्या सणाला* परवा एक जण म्हणाला,

या वर्षी देवा तेवढं *एक काम* करून दे,

त्या *फेमस गणपती* चा तेवढं दर्शन करून दे,


भक्तांच्या या *डिमांड* ला तो गालातच हसतो,

*Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो*


आशिर्वादाचं त्याने *पॅकेज* दिलं असतं?

माझ्याबरोबर *शंकराचे* आशीर्वाद, फक्त २० हजार..


*ग्रुप नवस* केला असता तर *डिस्काऊंट* दिला असता?

विसर्जनाच्या २ दिवस आधी, *लास्ट २ डेज, लास्ट २ डेज..*

असं ओरडला असता?


*नाही... नाही... नाही...*


भक्तीच्या *धंद्यात* त्याला *इंटरेस्ट* नसतो..

*Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..*


त्याची उंची *फुटात* मोजणारे आपण,

भक्ती सोडून *शक्ती* दाखवणारे आपण,


जो आपल्याला *वाचवत* आलाय त्याला *आपल्यापासून* वाचवा,

*नाक्या नाक्यावर* बसवता तसा *एक क्षण* हृदयात बसवा..


*एक क्षण* कशाला हो..??

दीड, पाच, सात, अकरा *सांगाल* तेवढे दिवस बसतो

*Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..*


विसर्जनाच्या दुसर्या दिवशी काय *नजारा* असतो?

दीड कोटी डोकी ज्या *पायावर* टेकली, तो पाय *कुठेतरी* असतो

तेवढेच *आशीर्वाद* देणारा, *हात* कुठेतरी असतो..

एवढ्या लोकांना *एकत्र* आणणारा बाप्पा,

स्वतः मात्र चौपाटीवर *विखुरलेला* असतो..


*तरीही* तो हसतो.. तो फसतो...

पुढच्या वर्षी *आनंदाने* आपल्या घरी बसतो..


त्याचा *आशीर्वाद* पुन्हा आपल्यावर *बरसतो*

*Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..*


*तुमच्या* आनंदातच त्याला *इंटरेस्ट* असतो

दीड, पाच, सात, अकरा *सांगाल* तेवढे दिवस बसतो

*Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..*


*गणपती बाप्पा मोरया..*

*मीच फक्त चांगला आहे* 

*बाकी सगळे वाईट* 

*तुम्हीच सांगा ही भूमिका* 

*Wrong आहे का Right ?*


*स्वतःला " हिरो " ठरवतांना*

*दुसऱ्याला " व्हिलन " करू नको* 

*विनाकारण गाऱ्हाणे करत* 

*इकडून तिकडे फिरू नको* 


*टोमणे मारणे , कुत्सित हासणे*

*असले धंदे का करतो ?* 

*" मीच शहाणा बाकी वेडे "*

*नावं ठेवीत का फिरतो ?*


*पुढच्या क्षणी काय घडणार*

*कुठे कुणाला माहीत असतं* 

*विकेट कशी , कधी पडणार* 

*कुणालाही ठाऊक नसतं*


*अपॉइंटमेंट घेऊन कधी*

*यमराज घरी येतो का ?*

*गयावया केली म्हणून*

*कुणाला सोडून देतो का ?*


*यमा तुझ्या रेड्यावर मी*

*डबलसीट बसणार नाही* 

*ठीक आहे बसू नकोस* 

*असं कधीच असणार नाही* 


*मनात असो किंवा नसो*

*यमाच्या मागे बसावंच लागतं*

*श्रीराम जयराम म्हणत म्हणत* 

*मसनवाट्यात जावंच लागतं* 


*चोवीस तासाच्या आत तुला*

*रॉकेल टाकून फुकुन देतील*

*कवटी फुटो न फुटो*

*घरी लवकर पळून जातील*


*मूर्ख माणसा त्याच्यामुळे* 

*प्रत्येक क्षण जगून घे*

*सखी सोबत पावसा मध्ये* 

*चिंब चिंब भिजून घे*


*घर घर काम काम*

*चोवीस तास तेच ते* 

*इतकं सोनं , तितके पैसे*

*वेड्या माणसा सोडून दे*


*घण्याच्या बैला जागा हो* 

*थोडी तरी मजा कर* 

*हिरव्या हिरव्या झाडा सोबत* 

*कधी तरी दोस्ती कर* 


*दशम्या , धपाटे , पिठलं ,भाकरी*

*जे जमेल ते घे*

*लसणाच्या ठेस्या सोबत*

*शेंगदाणे अन कांदा घे*


*घरात बसून कुढण्या पेक्षा* 

*टेकडी किंवा डोंगर चढ* 

*नयनरम्य निसर्गाच्या* 

*गळ्या मध्ये जाऊन पड*


*गंभीर चेहरा केला म्हणून* 

*समस्या कधी सुटतात का ?*

*कुठलीच मजा न करता* 

*येड्या डोळे मिटतात का ?*


*चल उठ बॅग भर* 

*फुकट गाऱ्हाणे करू नको* 

*विनाकारण रोज रोज*

*थोडं थोडं मरू नको*🙏🙏

सुंदर कविता 


Busy Busy काय करता

वेळ काढा थोडा

आयुष्यभर चालूच असतो 

संसाराचा गाडा


खूप काम, रजा नाही 

मिटिंग, टार्गेट,फाईल 

अरे वेड्या यातच तुझं 

आयुष्य संपून जाईल


नम्रपणे म्हण साहेबांना 

दोन दिस रजेवर जातो 

फॉरेन टूर राहिला निदान 

जवळ फिरून येतो 


आज पर्यंत ऑफिससाठी

किती किती राबलास

खरं सांग कधी तरी तू

मनाप्रमाणे जगलास ?


मस्त पैकी पाऊस झालाय 

धबधबे झालेत सुरू 

हिरव्यागार जंगला मध्ये

दोस्ता सोबत फिरू 


बायकोलाही म्हण थोडं 

चल येऊ फिरून 

डार्लिंग डार्लिंग खेळू आपण

पुन्हा होऊ तरुण


पंजाबी घाल, प्लाझो घाल

लाऊ द्या लाल लिपस्टिक 

बायकोला शब्द द्यावा

करणार नाही किटकीट


पोळ्या झाल्या की भाकरी 

अन भाकरी झाली की भाजी

स्वयंपाक करता करताच

बायको होईल आजी


गुडघे लागतील दुखायला

तडकून जातील वाट्या 

दोघांच्याही हातात येतील

म्हातारपणाच्या काठ्या 


जोरजोरात बोलावं लागेल 

होशील ठार बहिरा

मसणात गवऱ्या गेल्यावर

आणतो का तिला गजरा ?


तोंडात कवळी बसवल्यावर

कणीस खाता येईल का ?

चालतांना दम लागल्यावर

डोंगर चढता येईल का ?


अरे बाबा जागा हो

टाक दोन दिवस रजा 

हसीमजाक करत करत 

मस्तपैकी जगा


दाल-बाटी,भेळपुरी

आईस्क्रीम सुद्धा खा

आरोग्य उत्तम राहण्यासाठी 

शहरा बाहेर फिरायला जा


Busy Busy काय करता

वेळ काढा थोडा

आयुष्यभर चालूच असतो 

संसाराचा गाडा....

आयुष्यभर चालूच असतो 

संसाराचा गाडा....

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ, 

We are 40+, 50+, 60+, 

सो व्हॉट???💐💐


अब्दुल कलाम सांगून गेले, 

'स्वप्न पहा मोठी'.. 

स्वप्ननगरीत जागा ठेवा

 माधुरी दीक्षित साठी..!💐💐


सकाळी जॉगिंगला जाताना

 पी टी उषा मनात ठेवा,

वय विसरून बॅडमिंटन खेळा, 

 'सिंधूलाही' वाटेल हेवा..!💐💐


मनोमनी 'सचिन' होऊन ,

 ठोकावा एक षटकार ,

घ्यावी एखादी सुंदर तान, 

काळजात रुतावी कट्यार..!💐💐


मन कधीही थकत नसते,

 थकते ते केवळ शरीर असते,

मनात फुलवा बाग बगीचा,

 मनाला वयाचे बंधन नसते...!💐💐


फेस उसळू द्या चैतन्याचा, 

फुलपात्र भरू द्या काठोकाठ,

द्या बंधन झुगारून वयाचे,

 वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ...!💐💐


*We are 40+, 50+, 60+,*

*so what..?* 



होय!मी लोकशाही बोलतेय....✍

स्वातंत्र्य दिनाची प्रभात फेरी

उघड्या डोळ्यांनी पहात.....

आत्मक्लेशाने

संसदेच्या चबूत-यावर उभी राहून 

लोकशाही बोलू लागली...........


मानवतेच्या मारेक-यांनी डोळ्यावर

सभ्यतेची पट्टी बांधून

रोजच चालवलीय माझी हत्या.


कुठल्याही सिशिटीव्हीच्या कॕमे-यात

कैद होत नाहीत.....

माझा नित्य गळा गोठणा-या गिधाडांचे फुटेज

रिस्टर स्केलच्या पट्टीवरही

नोंदवला जात नाही

त्यांच्या लहरींचा केंद्रबिंदू 

आपआपसात......

त्यांनी विभागून घेतलाय एरिया.


घात करणारी

चालती-बोलती हत्यारं

दररोज पचवतात माझे खून


जातिभेदाचे कुंचले हातात घेवून

रंगवता येत नाही.....

एकात्मतेचे चित्र,

मृत्यूनंतर झाकावीच लागतात ना....

उघडी नेत्र.


निर्जन ठिकाणांच सोडून दे

भर चौकात,

पावलोपावली

होतात माझ्यावर बलात्कार!

वर्तमानपत्रांच्या 

मुखपृष्ठावर भगव्या रंगाच टायटल देवून.......

छापली जातात

माझी नग्न छायाचित्रे

माणसांच सोडून दे यार,

आजकाल..........

पुतळ्यांनाही धमकावलं जातय.


तुझ्या घरापासून......

दोन-तीन किलोमीटर नाकासमोर चालत जा

मालधक्याच्या......

उजव्या हाताला वळून 

आठ-दहा पावलं टाकल्यावर

तुझ्या दृष्टिक्षेपात येईल.......

क्रांती चौक

समोरच्या तिरंगी झेंड्याला 

नजर भिडवून

विचारलं तर सांगेन तो.......

स्वातंत्र्य,समानता,

न्याय,बंघुता

यांच्या गोलमेज परिषदेतील तपशील.


रामभाऊच्या टपरीवर

गुटक्यांच्या पुड्यांमधून दिनदहाडे

विकला जातोय कॕन्सर,

'जिवनदान'

होमोपॕथीक मेडीकलमधून

शक्तिवर्धक चवणप्राशच लेबल लावून...

बंद डब्यांतून

विकल्या जातात अफुच्या गोळ्या,

अधिकारशाहिच्या कु-हाडीने

छाटल्या जातात......

सत्याच्या वाटेकडे जाणाऱ्या मुळ्या.


तलवारी,

काडतूसांच्या विक्रिचा हंगाम.....

केंव्हाच सूरु झालाय,

आजकाल.......

ज्वारी-बाजरी ऐवजी पेरलं जातय....

 गांज्याच बियाणं,

मंत्रालयातील बंद फायलीलाही.....

रातोरात फुटतात पानं.


मी तिच्या आणखी जवळ गेलो तर......

पाठीवरती ममतेने

हात टाकत म्हणाली..........

विकासाच्या गळक्या छत-यांनी

थोपावता येत नाहीत..........

आत्महत्यांचा मुसळधार पाऊस,

पोटाची भुक.....

भागवू शकत नाही

एका क्लिकवर माऊस.


आश्वासनांच्या चावीने.......

उघडत नाही कधी

बेरोजगारिची गंजलेली कुलपं,

डोळ्यातलं अश्रू 

रुमालाने कितीही पुसलं तरी.....

खांद्यावरच ओझं 

होत नाही हलकं?


मांत्रिकाच्या छडीवर....

हळदी- कुंकवाचा अभिषेक करुन

सुटत नाहीत विज्ञानातील

 तांत्रिक कोडी,

महाकाय गलबताचे छिद्र.....

बुजवू शकत नाही

गवताची काडी.


आधार कार्डची फिंगर प्रिंट

चूलीवरच्या तव्याला

मॕच करुन

मोफत मिळत नाही भाकरी,

'संसद' नावाच्या

 राजमहालात.......

लोकशाही

करत आहे चाकरी.

महिला दिन

जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू
जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू

नको रडू..’स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ म्हणत तू
शोध घे स्वत:चा ,एक नवीन कहाणी लिही तू

घर आणि करिअर,तारेवरची कसरत करतेय तू
२१ व्या शतकातली सुपरवुमन तू

रक्षण,आरक्षण हे आक्रोश सोड तू
कर्म करत रहा,’फळाला’ पात्र होशील तू

भगिनी भाव जरुर पाळ तू
कणखर हो,स्वत:ची मदत स्वत: हो तू

विधात्याची नवनिर्माणाची कलाकृति तू
एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू

उठ चल,यशाच्या शिखरांची तुला साद..ऐक तू
‘स्त्री’ म्हणून जन्मलीयेस,’व्यक्ती’ म्हणूनही जग तू

 महिला दिन विशेष कविता

असूनी अनेक रूपी उरली दशांगुळे ती

परमेश्वरासही तीज पाहून गर्व भास 

कधी मातृदेव होई,  भार्या कधी सुशील

भगिनी ती पुत्री तीच तरी प्रेम अंतरात 


कर्मात रत सदा ती ना वेळ कौतुकास

गीतेस सार्थ करते राहून निरिच्छित

मिळता न प्रेम तरीही देणेच धर्म जाणे

देई पुन्हा पुन्हा ती साहून सर्व जाच


असूनी समर्थ स्वत्व तरी सार्थ साथ घेते

नसता कुणीच साथी चाले ती एकटीही 

असूनी ती  जन्मदात्री ना नाव लावते ती

उदरी भरून पुत्रा तरी श्रेयास वंचिलेली 


उदरी कुणी असावे हा ही न हक्क तिजला

पुत्रास जन्म देणे की कन्येस त्याजणे ही 

ऐश्या समर्थ नारी ज्या देशी जन्म घेती

होऊन ती जिजाऊ नामात ना तरीही


वाहुन कौतुकाचे हे पुष्प मी तियेस

म्हणतो प्रसन्न राहि आम्हा करी कृतार्थ 


© कवी : प्रसन्न आठवले

८ मार्च , २०१८

आंतराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्

*बाईमाणूस*


समाजाच्या जुनाट मोडकळीस आलेल्या चौकटीला मोडीत काढून ...

ती बाहेर पडली उंबरठा  ओलांडून...


ती हसली , खिदळली , धुसफुसली , रडली ,नाचली ,शिकली ,कमवती झाली अन् जगली ही...


कुणाच्यातरी भरवश्यावर  रहाणं..

कठपुतलीसारखं हुकमावर नाचणं..

गारुड्याच्या पुंगीच्या तालावर डोलणं...

  हळू हळू जमवलं तिने  ..

     हे सारं नाकारणं..


मनातला भूकंप गाडायचा ..

स्वत:ला शरीरात अन् शरीराला स्वत:त कोंबायचं...


दुख-या तनामनानं , हस-या वृत्तीनं ताठ मानेनं जगणं स्विकारायंच ...


कितीही घुमवलं , नाचंवलं , फिरवलं , आपटवंलं , धुसमुसळवलं , खरचवटवलं ..


तरीही जगणं तिने जमवलं...


तो समाज बसला टक्क नी थक्क नजरेनं पहात ..

         तकलादू .. उघड्या दाराचा मोकळा  पिंजरा ....


कारण ....  

जेव्हा बाई  बाईपणावर उतरते    


 तेव्हा केवळ उरते ...


बाईच    बाईतून   बाईस्तव ...


           बाईमाणूस !


‬: जगातीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


।महिलांच्या कर्तृत्वाला, माझा सलाम आहे।।

काळालाही मिठीत घेण्याची, जिच्यात जिद्ध आहे।

असा स्त्री शक्तीला माझा, मनोमन सलाम आहे।।धृ।।


आई असो की, बहीण, बायको किंवा कोणाची सून आहे।

संकटात सापडलेली महिला, कोणाची तरी मुलगी आहे।।

मेणासारखी मऊ असली, तरी वाघाचं काळीज आहे।

सुख-दुःखात ही, संसार करण्यात, तिची धमक आहे।।

त्यांच्याच झिजण्यात, अगरबत्तीचा सुवास आहे।

असा स्त्री शक्तीला माझा, मनोमन सलाम आहे।।१।।


दुष्काळ असो की, दारिद्र, कधी सुखाचा क्षण आहे।

दुष्काळाच्या भयानकतेत ही, लढण्याची ताकद आहे।।

कोणा आत्महत्या करणाऱ्या, बळीराजाची बायको आहे।

त्याच्याच मुलांची माय होऊन, ताट मानेंन जगत आहे।।

महापुरात झाडे गेली, ती लव्हाळ्यासारखी उभी आहे।

असा स्त्री शक्तीला माझा, मनोमन सलाम आहे।।२।।


वासनांधावर प्रेम करते, हेच तीच अपयश आहे।

संस्काराच्या ओझ्याखाली, अजून ती दबली आहे।।

आता तर जन्म देणाराच, तिचा बळी घेत आहे।

आईच्या उदरातच, जीव तिचा गुदमरतो आहे।।

तरी ही अजून ती काळाच्या एक पाऊल पुढे आहे।।

असा स्त्री शक्तीला माझा, मनोमन सलाम आहे।।३।।

कवी-राजेश साबळे-ओतूरकर  उल्हासनगर (ठाणे)  

मोबा-९००४६७४२६


मा.कुसुमाग्रजांची एक सुंदर कवीता*

*पृथ्वीचे प्रेमगीत*

युगामागुनी चालली रे युगे ही

करावी किती भास्करा वंचना

किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी

कितीदा करु प्रीतीची याचना


नव्हाळीतले ना उमाळे उसासे

न ती आग अंगात आता उरे

विझोनी आता यौवनाच्या मशाली

ऊरी राहीले काजळी कोपरे


परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे

अविश्रांत राहील अन् जागती

न जाणे न येणे कुठे चालले मी

कळे तू पुढे आणि मी मागुती


दिमाखात तारे नटोनी थटोनी

शिरी टाकिती दिव्य उल्काफुले

परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा

मला वाटते विश्व अंधारले


तुवा सांडलेले कुठे अंतराळात

वेचूनिया दिव्य तेजःकण

मला मोहवाया बघे हा सुधांशू

तपाचार स्वीकारुनी दारुण


निराशेत सन्यस्थ होऊन बैसे

ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव

पिसाटापरी केस पिंजारुनी हा

करी धूमकेतू कधी आर्जव


पिसारा प्रभेचा उभारून दारी

पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ

करी प्रीतीची याचना लाजुनी

लाल होऊनिया लाजरा मंगळ


परी दिव्य ते तेज पाहून पूजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे

नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा

तुझी दूरता त्याहुनी साहवे


तळी जागणारा निखारा उफाळून

येतो कधी आठवाने वर

शहारून येते कधी अंग तूझ्या

स्मृतीने उले अन् सले अंतर


गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे

मिळोनी गळा घालुनीया गळा

तुझ्या लाल ओठातली आग प्यावी

मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा


अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्

मला ज्ञात मी एक धुलिःकण

अलंकारण्याला परी पाय तूझे

धुळीचेच आहे मला भूषण

*कवी कुसुमाग्रज*

 कवी वि. वा. शिरवाडकर-

पाचोळा


आड वाटेला दूर एक माळ

तरु त्यावरती एक विशाळ

आणि त्याच्या बिलगूनिया

पदास

जीर्ण पाचोळा पडे तो उदास


उषा येवो शिंपीत जीवनासी

निशा काळोखी दडवुद्या जगासी

सूर्य गगनातुनि ओतुद्या निखारा

मूक सारे हे साहतो बिचारा !(पाचोळा)


तरुवरची हसतात त्यास पाने

हसे मूठभर ते गवतही मजेने,

वाटसरु वा तुडवीत त्यास जात

परी पाचोळा दिसे नित्य शांत !


आणि अंती दिन एक त्या वनात 

येई धावत चौफेर क्षुब्ध वात

दिसे पाचोळा,घेरुनी तयाते

नेइ उडवूनि त्या दूर दूर कोठे !


आणि जागा हो मोकळी तळाशी

पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी !


तरू-झाड

निशा-रात्र

पर्णराशी-पानगळ,

जुनी पाने


कवी वि वा शिरवाडकर

 *माझी माय मराठी*


मि मराठी 

माझी भाषा मराठी 

शब्द मराठी 

शब्दात मराठी 

विचारात मराठी 

म्हणून मी लिहतो मराठी


जगतो मराठी जगवते मराठी 

शिकवते मराठी वाचते आणि वाचवते मराठी

संस्कारात मराठी 

म्हणुन माझी संस्कृती माराठी


सण मराठी वार मराठी उत्सव मराठी उत्साहात मराठी

पाडवा मराठी गोडवा मराठी माणुस मराठी माणसात मराठी 

म्हणुन  माणुसकी मराठी


विर मराठी शुर मराठी

तिर मराठी नुर मराठी    

शहिद मराठी सैनिक मराठी क्रांतीविर मराठी

स्वतंत्रविर मराठी

देश मराठी भुमी मराठी माती मराठी म्हणुन तिरंगा मराठी


घाट मराठी वाट मराठी पाहाट मराठी लाट मराठी वारी मराठी वारकरी मराठी

 म्हणून टाळ चिपळी चा नाद मराठी 


ताल मराठी चाल मराठी सुर मराठी स्वर मराठी गाण्यात मराठी भजणात मराठी 

गित मराठी संगीत मराठी

म्हणुन सरस्वती च्या विणेत मराठी


मनात मराठी कणात मराठी देहात मराठी रक्त मराठी 

ढाल मराठी संमशेरी मराठी  मावळा मराठी 

भगवा मराठी  सह्याद्री चा मान मराठी 

म्हणून  छत्रपति शिवाजी महाराजांचा बाणा


धर्म मराठी कर्म मराठी 

जात मराठी बात मराठी 

हात मराठी लात मराठी राग मराठी 

म्हणुन संताप मराठी


लिखाण मराठी वाचण मराठी बोल मराठी अनमोल मराठी लेखणी मराठी देखणी मराठी

 लिहणार मराठी वाचणार मराठी बोलणार मराठी 

लिहा मराठी बोला मराठी

जागवा मराठी वाचवा मराठी टिकवायची  मराठी

कारण 

*माझी माय मराठी*


*संजय धनगव्हाळ*

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


रगारगातून सळसळते 

धमन्यातून वाहते मराठी..!

शिवबांचे मावळे आम्ही

रक्त आमुचे मराठी....!!


पहाटेच्या सूर्य किरणातून 

तेजाळते ही मराठी ..!

फुला फुलातुंन गंधाळते

श्वासात आमुच्या मराठी...!


शब्दा शब्दांतून फुलते

पुस्तकावर खेळते मराठी...!

अमृताचे ज्ञान पाझरते

माय माऊली मराठी..!!


शिवाजी शंभू महाराजांचे

पोवाडे गाते ही मराठी...!

जात्यावर ओवी गाते

माय माझी मराठी..!!


शिकतो भाषा अनेक जरी

रांगते जिभेवर मराठी....

स्वच्छंद घरात नांदत असते

मातृभाषा आपुली मराठी..!           


सह्यांद्रीच्या घाटाघाटातून

पाझरते ही मराठी...!

कृष्णा गोदावरी नदीतून

संथ वाहते मराठी..!!


तुक्याच्या अभंगातून

डोलते  ही मराठी...!

ज्ञानेश्वरीच्या ग्रंथातून

गीता सांगते मराठी..!!


कुळाकुळातून जन्म घेते

माय आपली मराठी..!

चिऊ ताईची गोष्ट ऐकते

बाळ माझं मराठी..!!


तू मराठी मी मराठी 

जात धर्म भाषा मराठी...!

उरा उरातुनी धडधडते

मायबोली आपुली मराठी..!!


--------सौ.प्रतिभा टेकाडे-------

बेंगलोर...



विनोदी कविता

देवाचे custemor care

अखेर त्या दिवशी देवाने custmer care सुरु केले
तक्रार करता यावी म्हणून फोन नंबर दिले

सकाळपासून तक्रारीचा पूरच वाहत होता
दर सेकंदाला तिथला टेलिफोन खणऽखणऽऽत होता

"नशिब माझे कसे देवा पैसा मिळत नाही
बायको मला कशी दिली ती माझे ऐकत नाही

म्हैस हरवली चार दिवसाने अजून सापडत नाही
दहा वर्ष झाली लग्नाला अजून मुलगा नाही

नोकरीत बढती मिळेल देवा अशी तजवीज करा
मुलगा शिकतो इंजिनिअरिँग ला त्यालाही पास करा

सर्वाँना गाड्या आहेत मलाच तेवढी नाही
आम्हाला अजून घर नाही त्याचीही e34 दखल घ्यावी

सर्वाँना "गोरे" बणवले मग माझ्यावरच का कोपला होता
माझ्यावेळीच तुझ्याइथला का देवा "रंग" संपला होता?

सासू कसली खट्याळ इतकी देवा तु मला दिली
घेऊन जा तिला एकदा अजून वेळ नाही का झाली?

सुनेला काही वळणच नाही तिला जरा अद्दल घडव
जावई माझा "दशमग्रह" त्याला माझ्या पाया पडव

संपत्ति वाटताना देवा तु पक्ष:पाती झालास
इतरांना श्रीमंत करुन मलाच गरीब केलंस

यंदाच्या निवडणूकीत खुर्ची तेवढी मिळूद्या देवा
जनतेच्या जनार्धनाला या करुद्या थोडीसी सेवा

सर्व दुःखे देवा काय तु माझ्या वाट्यास लिहली
सुखाची पाने नाही का नशिबी माझ्या ठेवली?

 सृष्टिचा कारभार देवा तुम्हाला नीट चालवता येत नाही
तुम्ही असताना भूकंप,त्सुनामी,दुष्काळ का तो येई

का इथली मुले देवा उपाशी पोटी झोपतात
थंडीने गारठून का ती तिथेच जीव सोडतात

भ्रष्टाचार इथला देवा तु का थांबवत नाही
स्रीयांवरच्या अत्याचाराला लगाम का लावत नाही"

अशा तर्हेने अनेकांनी देवाला फोन केले
प्रत्येकानी त्याच्या परीने जाब विचारुन घेतले

सर्वाचे म्हणने देवानी शांतपणे ऐकून घेतले
स्मितहास्य करुन थोडेसे,उत्तर देवांनी दिधले

"आतापर्यत तुझ्या वाचेने जे जे तु वदलास
या सर्वाँचा का कधि तु विचार मनी केलास?

दिधला मी तुज हा अमूल्य देह मानवाचा
ईच्छाशक्ति, स्वातंत्र्य,सामर्थ्य अन् कर्तृत्वाचा

तुझ्या कर्मयोगाने तु जीवन सुंदर बनवशील
वाटले न मज तु स्वार्थी,भोगी रडका बनशील

यंत्रासंगे संवेदना ही तुझ्या बधिर झाल्यात
बलात्कारी,मूढ मुर्खा बेशर्म तू झालात

बेलगाम वर्तनाने तुझ्या तु समस्या निर्माण केल्या
शोधता उत्तर प्रश्नाचे तू प्रश्नांतच अड़कला गेला 

नात्यातल्या भावनेचा ओलावा तुला कळला नाही
मानव्याने कसे जगावे  हे ही समजले नाही

या सृष्टिच्या सौंदयाशी सुर तुझे कधि जुळले नाही
ओरबाडणे जमले तुला ममत्व समजले नाही

दोषारोप करणे दुसर्यावर हा स्वभाव तुझा बणला
स्वत:च्या आत डोकावून बघ त्यामुळेच तु पुरता खंगला

नव्या दमाने उभा रहा तु कर्तृत्वाची कास धर
या सृष्टीवर प्रेम कर अन जीवन सुंदर मग बघ!"

एवढे सगळे ऐकून देवाचे मानव खजील झाला
"चुकलेच देवा थोडेसे माझे पण अजून वेळ न गेला

जगण्याला मी बनवीन सुंदर या सृष्टीवर प्रेम करीन
मानवता ह्रदयात बाणूनी खरा मानव मी होईन"

झोपेतच हसत हसत बंडूने देवाला नमस्कार केला
"उठ ना रे बंड्या लवकर!"आईने आवाज दिला.

---राजेश खाकरे
Mo.7875438494


विनोदी कविता

मैं अच्छी हूं घबराऊ नको ऎसा खत में लिखो ।
कोणी मेल्याने तुझको लिखा मैं निकली रोडापर
अगर तुझको शक है मुझपर नहीं निकलूंगी बाहर
मैं पानी को जाऊ क्या नको ऎसा खत में लिखो ।

सौ रुपये का हिसाब माँगे तो मैने घर मे क्या खाई
लाईट को वीस दी पानी के तीस दी पचीस का राशन लाये
दी पचवीस दुधवाले को ऎसा खत मे लिखो ।

पहली बार आए कुछ नही लाये अबकी बार लाना टेप
बेबी बडी हुई ऎकने को ऎसा खत में लिखो
मैं अच्छी हूं घबराऊ नको ऎसा खत में लिखो ।

बाबा को आया बुखार खाँसी प्रायव्हेट मे गयी उसको लेकर
सौ रुपया लिया इंजेक्शन दिया असर नही हुआ बच्चे पर
मैं जे. जे. को जाऊ क्या नको ऎसा खत में लिखो ।

आवाजे – निस्वाँ है महिला मंडल जाती मै उस मिटींग को
तेरी बहन को शौहर जब पिटता जाती सब धमकाने को
उसको मदद मैं करू क्या नको ऎसा खत में लिखो ।

जबसे गया तू बिगडा है माहौल फसाद का डर है मुझको
मजहब के नाम पे कैसे ये झगडे अमन से रहना है सब को
ये वस्ती में समजाऊँ क्या नको ऎसा खत में लिखो ।

महाँगाई इतनी, रोजगार भी नही तेरे जैसे जाते दुबई को
घर भी कितने टूट जाते देखो दुख होता मेरे मन को
तू आजा जल्द मिलने को ऎसा खत में लिखो ।

सौदी जाके, दुबई जाके कितने दिन हम टिकेंगे
इसी समाज को हमको बदलना बच्चों के लीए अपने
मैं मोर्चे मे जाऊ क्या नको ऎसा खत में लिखो ।

कोणी मेल्याने तुझको लिखा मैं निकली रोडापर
मिटींग मे जाती मोर्चे मे जाती सुधरने जिंदगानी को
तू भी आज साथ देने को एसा खत मे लिखो
मैं अच्छी हूं घबराऊ नको ऎसा खत में लिखो ।


ती बिनधास्त आहे,
तिच्या कर्तुत्वावर ती निर्धास्त आहे.
लढेल कोणत्याही संकटांशी,
इतकं तिच्यात धारिष्ट्य आहे.
ती बिनधास्त आहे.

तिचे विचार नवीन आहेत,
तिच्या कल्पनाही नवीन आहेत,
नवीन स्वप्न साकारण्याचे तिचे मार्गही नवीन आहेत.
तिच्या मनात भरारीचे निर्णय तरीही पक्के आहेत,
जरी पंखांवर पुरोगामित्वाचे अरिष्ट आहे.
ती बिनधास्त आहे.

तिच्या कडेही आहे एक स्त्रीमन,
ज्यात दडलंय एक हळवेपण,
जितक्या सहजपणे जाते office ला,
तितकी सहजपणे सांभाळते kitchen पण.
जितक्या तिच्या मैत्रिणी तितकेच मित्रही आहेत,
modern असली तरी सांभाळते,
जाणीवेने आपुले स्त्रीधन.
मर्यादा ओलांडणार्यांसाठी,
तिच्यावरही चंडीकेचा वरदहस्त आहे.
ती बिनधास्त आहे.

ती थोडी नम्र आहे,
ती थोडी आगावू पोर आहे,
कधी अतिशय शालीन,
कधी दंगेखोर आहे.
घरही सांभाळते, स्वतःसाठीपण जगते,
जाणीवेने सार्या जगाकडे पाहते.
काळजातलं दुख कधी चेहऱ्यावर आणत नाही,
स्वताचा आनंद कधी एकटीचा मानत नाही.
चार गोष्टी सांगते कधी आईसारख्या समजावून,
कधी वागते अगदी वेड्यासारखी आपणहून.
अशी तशी कशी कशी पण जशी आहे तशी फार मस्त आहे.
ती बिनधास्त आहे.
💐💐💐💐💐💐💐💐

Dedicated to all  lovely ladies

छान कविता

हल्ली म्हणे भारतात चिमण्या
             कमी झाल्यात.
बहुतेक साऱ्या दाणे टिपायला,
           परदेशी गेल्यात.
डाॅलरचे दाणे टिपतां टिपतां
            भल्याभल्यांचे उडतात होश!
त्या तर बिचाऱ्या चिमण्या,
            त्यांचा तरी काय दोष?
आपल्याही घर-अंगणातला,
            बंदच झालाय् चिवचिवाट.
घरटी एक पांखरू तरी
             स्थिरावलय् परदेशात.
करियर करियर करताना
             परत यायचे नाव नाही.
मागच्या साऱ्यांच्या एकटेपणाच्या
             वेदनेला ठाव नाही.
रिकाम्या पडलेल्या घरांचे,
            जगण्यातले अर्थच हरवलेत.
ज्यांचे भविष्य आकारले ते,
             घरापासूनच दुरावलेत.
Bright-Future बघतां बघतां,
           इथे अंधारलेले कधीतरी कळेल.
जुन्या घरट्याची आठवण येऊन,
            हरवलेली वाट परत मिळेल.
ह्या एका आशेवर ,
               चिमणा चिमणी जगताहेत .
मुद्दल नाही तर 'व्याजासाठी' तरी
              रिकामे घरटे जीवापाड जपताहेत.

      राजे

राजे तुमच्या नावाचा आज सर्वत्र
जयघोष होतो आहे
जागोजागी भगवे झेंडे
डौलाने फडकत आहेआख्खी
महाराष्ट्र भूमीच
शिवमय झाली आहे
रस्ते चौक गल्ल्या
गजबजून गेल्या आहेत
  राजे
तुमचा विचार तुमची धोरणे
तुमच्या योजना तुमची सहिष्णुता
तुमचा न्यायीपणा
इथल्या मातीत प्रत्येकाच्या रक्तात
प्रत्येकाच्या कृतीत
इथल्या मनामनात प्रत्येकाच्या देहात 
इथल्या पानापानात
रुजू होतो आहे
      राजे
मला खात्री आहे
नव्हे guarantee च आहे
आता नवस्वराज्याची पहाट
खूप दूर नाही
सुराज्याचं स्वराज्याच स्वप्न दूर नाही
     राजे
तुम्ही ऊर्जा आहात तुम्ही प्रेरणा आहात
तुम्हीच शौर्य आहात तुम्हीच धैर्य आहात
लाखो करोडो जनतेच्या काळजातील
अस्मिता राजे तुम्हीच आहात
        राजे
तुमच्या नावाचा
वापर केल्याशिवाय
या महाराष्ट्राची सत्ताही
हस्तगत करता येत नाही
तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय
निवडणुकीलाही कुणाला
उभे राहता येत नाही
   राजे तुमच्या नावाशिवाय
कोणत्याही राजकीय सामाजिक 
चळवळीच्या भाषणाचीही
सुरुवात करता येत नाही
या पुरोगामी महाराष्ट्राची
ओळखही राजे
तुमच्या नावाशिवाय
अधुरीच आहे
शाहू फुले आंबेडकरी
विचारांचा पायाही राजे
तुमच्याच नावात आहे
हिंदुत्वाचे राजकारणही राजे
तुमच्या नावाशिवाय
करता येत नाही
  राजे
तुम्ही राजे आहात
सर्वांचेच राजे आहात
प्रत्येक जाती धर्माचे
मराठा व समस्त बहुजनांचे
धर्मनिरपेक्ष वृत्तीचे
अन्याय अत्याचाराविरोधात
दंड पुकारणारे
मानवतेचे रक्षक
राजे तुम्हीच आहात

तुमच्या कर्तुत्वाला अव्हेरून राजे
इथलं साधं पानही
पुढे सरकू शकत नाही
 आणि म्हणूनच पित्त
तेव्हा खवळून उठते
जेव्हा एखादा उपटसुंभ
माँ जिजाऊ वर शिंतोडे
उडवण्याच कुकर्म करतो
कधी एखादा बेअक्कल 
तुमच्यासारख्या सूर्यावर
थुंकण्याचा प्रयत्न करतो
  पण राजे तुम्ही तर राजे आहात
ओजस्वी सूर्य आहात
ही सृष्टी असेपर्यंत राजे
तुमचा तेजोमय प्रकाश
आम्हास व्यापून असणार आहे
आजचा प्रत्येक मावळा
जसजसा शिवमय होत जाईल
तसतसा महाराष्ट्राचा 
स्वाभिमान जागृत होत जाईल
घराघरात राजे शिवबा
तुमच्या रुपात येईल
स्वच्छ चारित्र्यवान पिढी राजे
पुन्हा जन्म घेईन
एक न्यायी समाज
राजे पुन्हा निर्माण होईल
मला खात्री आहे राजे
ही शिवजयंती एक
अनोखे व नवे वळण घेईन
समाज ऐक्य होऊन
पाऊल आपले पुढेच
पडत राहील


   कवी सुभाष पवार नाशिक


।।राजा शिव छत्रपती।
 आज मित्रहो एकोणीस फेब्रुवारी
शिवजयंती साजरी होते घरोघरी
एक असा राजा त्याची बातच न्यारी
अवघ्या विश्वात शिवरायच भारी

प्रजादक्ष,गो-ब्राम्हण प्रतिपालक
रयतेचा कैवारी, जाणता राजा 
किती बिरूदावली पण एकच राजा
असा भूतलावर एकला छ्त्रपती माझा

पर स्त्री मध्ये जो बघायचा माता
अन्यायाचा कर्दनकाळ परी न्यायदाता
मोगलांना वाटायचा दरारा तयांचा
मराठयांचा असा पराक्रमी त्राता

कित्येक उपाध्या लाभल्या तयांना
व्यवस्थापन गुरू,कनवाळू राजा
आरमार उद्गाता,दूरदृष्टीचा नेता
मुत्सदेगिरी हा तयांचा गुण दुजा

मारले जरी छापे,लुटली जरी शहरे
नितीमत्तेचे ध्यान मावळयांनी ठेवले
सुभेदाराची सुन तिचे रूप सुंदर गहीरे
शिपायांनी तिला महाराजांसमोर ठेविले

त्या रूपवतीचे सौंदर्य बघून राजे उद्गारले
अशीच रूपवान जर आमची माता असती
आंम्ही आहोत या पेक्षा सुंदर असतो जाहले
जीजाऊंनी संस्कारिलेल्या गुणाचीच ही महती

सुभेदाराच्या सुनेला चोळी खणाचा आहेर
समज म्हटले भगिनी आमचे घर तू मोहर
अशी चारित्र्याची ज्यांच्या व्यक्तित्वास झालर
असा स्वाभिमानी,प्रजापालक राजा रणधुरंधर

 कवी :-प्रल्हाद कोलते
        ९७६६९०२४९९



पाडवा सण मोठा* 🌳
🌳 *नाही आनंदा तोटा* 🌳   

ना कुठला dance ना कुठली party......पाडवा म्हंटल कि फक्त *हिंदू संस्कृती ....*
ना कुठला one piece अन two piece, ना कुठला party wear,
पाडवा म्हंटल कि फक्त
*झब्बा-लेंगा-नववारी* म्हणजेच traditional wear ...
ना कुठला DJ break ना कुठला rawadi dance ....
पाडवा म्हंटल कि *ढोल - तशा - झांज - ध्वज आणि लेझीम नाच....*
ना कुठल hard drink ना कुठल मद्य........
पाडवा म्हंटल कि *फक्त फक्त आणि नैवेद्य ...*
ना कुठल hotel, ना कुठला beach, ना कुठला कोपरा,
पाडवा म्हंटल कि फक्त *हिंदू नववर्ष शोभा यात्रा ....*
ना कुठली बेशुद्धी, ना कसला hangover
पाडवा म्हंटल कि *नवचैतन्याचा कहर ...*
ना कुठला दिखावा, न घातक ज्ञान, ना कुठले आकर्षण....
पाडवा म्हणजे आमच्यासाठी *आमच हक्काचा सण.....*
ना राग - द्वेष - पश्चात्ताप, ना दगा फटका......
पाडवा म्हणजे *आपल पथक आणि त्यांच्यावरची निष्ठा ....*
ना दुःख - संताप, ना पोकळ चर्चा
पाडवा म्हणजे *जल्लोष नववर्षाचा ....* 


🍋🍋 *आतुरता_पाडव्याची*🍋🍋 
रुतु हर्षाचा सण वर्षाचा आला गुढीपाडवा
आनंद वेचु आनंदे नाचू आला गुढीपाडवा

वसंत नयनी फुला फुलांच्या
हर्ष उमलतो धुंद कळ्यांचा
गंध पसरला सर्वदूर हां स्वर्षे नव वर्षाचा
आला गुढीपाडवा हो आला गुढीपाडवा

अगणित अक्षे उघड़ूनी आपुली
रवीराजाची किरणे आली
मनात आनंद जनात स्वागत करुनी मांडूया
आला गुढीपाडवा हो आला गुढीपाडवा

बहुविध पुष्पे रंगीत माळा
गुढ़यातोरणे जन हे गोळा
करीता हर्षे गंध पसरला आनंदसोहळा
आला गुढीपाडवा हो आला गुढीपाडवा

जून ते सरले नवे बहरले
वाद्यांचे नव स्वरही विहरले
सारे गायने करुनी नृत्या करती जणू मौजा
आला गुढीपाडवा हो आला गुढीपाडवा

कवी : प्रसन्न आठवले 


[2/17, 8:25 PM] Tikam Mam: भाजून सोलणे अन्
निवडून ते पाहाणे
मी ओळखून आहे
कुठल्या डब्यात दाणे ।।

जाता घरातूनी तू
घेईन एक वाटी
खाईन मस्त दाणे
येईल मौज मोठी
हे स्वप्न जीवघेणे
भरतो सुखे बकाणे ।। १।।

हाती डबा जयाच्या
त्याला कसे कळावे
पोटात भूक ज्याच्या
त्यालाच दु:ख ठावे
लपवून लाख ठेवा
शोधू आम्ही दिवाणे ।।२।।

पोटास वेदनांचा 
का सांग त्रास व्हावा ?
इतका चविष्ट खाऊ
का औषधी नसावा ?
येवो कळा कितीही
सोडू आम्ही न खाणे ।।३।।

(चाल:लाजून हासणे



: 💥_*नात्यांची मिसळ ...*_


💥आयुष्य म्हणजे  नात्यांची मिसळ

💥आई वडील मूग मटकी कडधान्य
त्यांच्या शिवाय मिसळ ही कल्पनाच अमान्य
त्यांच्या मुळेच तर ती बनते सकस अन्न

💥बहीण भाऊ टोमॅटो बटाटे वाटाणे
मिसळतील एकमेकात सहजपणे
मिळून येईल मिसळ 
मग छान दाटपणे

💥नातेवाईक म्हणजे 
मीठ लिंबू मसाला
चव हवी मस्त तर 
प्रमाणातच घाला
खारट आंबट मिसळ 
उगाच हवी कशाला

💥मित्र मैत्रिणी म्हणजे 
लाल मस्त तर्री
मिसळीला रसदार 
तीच करते खरी
हवीहवीशी चटकदार 
चव आणते भारी

💥जोडीदार,  कांदा 
डोळ्यात आणे पाणी 
पण मिसळीला मजाही 
तोच तर आणी 
फोडणीत हवाच शिवाय 
वरून त्याची पेरणी

💥मुलं ,कुरकुरीत शेव 
फरसाण चिवडा
त्यांच्यावीना मिसळ 
हा विचारच सोडा
अधुरा राहील ना सारा 
खटाटोप एवढा

💥शेजारी, म्हणजे कोथिंबीर
हिरवी गार
असेल तर 
मिसळीची वाढेल शोभा पार  
नसली तरी काही 
अडणार नाही फार

💥ऑफिस बॅास, म्हणजे मलईदार दही
गोड असेल तरच 
मिसळीला सही
नाहीतर ठेवा दूरच 
घालू नका काही

💥मिसळ जमली चविष्ट तर 
रंगत हमखास
पण सर्वांच्याच नशिबी, 
नाती नसतात ना झकास 
मग आयुष्यच सारे 
होऊन जाते उदास

💥पण बिघडली चव तरी 
प्रयत्न नाही सोडायचे
चवीनुसार पदार्थ 
कमी जास्त करत रहायचे
मनाच्या समजुतदारपणाचे 
पाणी थोडे घालायचे

💥हळूहळू मग जमेल मस्त भट्टी
मिसळीची चवीशी होईल 
छान गट्टी
सुखाशी मग आपली 

कायमची बट्टी..😄😄😄😄😄😄😄🐾💥🐾💥💐💥🐾💥🐾💥🐾 

*'भेट'...* 


किती प्रगल्भ व्याप्ती आहे *'भेट'* या शब्दाची !
खरंच, खूपच अर्थपूर्ण.
             
कोण? कुणाला? कुठे? केव्हा?
कशाला? *'भेटेल'*

आणि

का? *'भेटणार नाही'*

ह्याला 'प्रारब्ध' म्हणावं लागेल.

*'भेट'* ह्या शब्द संकल्पनेविषयी थोडंसं काव्यात्मक विवेचन.

*'भेट'* कधी 'थेट' असते,
कधी ती 'गळाभेट' असते,
कधी 'Meeting' असते,
कधी नुसतंच 'Greeting' असते.

*'भेट'* कधी 'वस्तू' असते प्रेमाखातर दिलेली.
*'भेट'* कधी 'देणगी' असते कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली.

*'भेट'* कधी 'धमकी' असते...
'बाहेर भेट' म्हणून दटावलेली.
*'भेट'* कधी 'उपरोधक' असते...
'वर भेटू नका' म्हणून सुनावलेली.

*'भेट'* थोरा-मोठ्यांची असते,
इतिहासाच्या पानात मिरवते.
*'भेट'* दोन बाल-मित्रांची असते...
फार वर्षांनी भेटल्यावर,
पिकल्या केसांचा अंदाज घेत चाचपलेली.

*'भेट'* कधी अवघडलेली,
'झक' मारल्यासारखी.
*'भेट'* कधी मनमोकळी,
मनसोक्त मैफिल रंगवलेली.

*'भेट'* कधी गुलदस्त्यातली,
कट-कारस्थान रचण्यासाठी.
*'भेट'* कधी जाहीरपणे,
खुलं आव्हान देण्यासाठी.

*'भेट'* कधी पहिली- वहिली
पुढल्याची ओढ वाढवणारी
*'भेट'* कधी अखेरची ठरते.
मनाला चुटपूट लावून जाते.

*'भेट'* कधी अपुरी भासते,
बरंच काही राहून गेल्यासारखी.
*'भेट'* कधी कंटाळवाणी,
घड्याळाकडे पाहून ढकलल्यासारखी.

*'भेट'* कधी चुकून घडते,
पण आयुष्यभर पुरून उरते.
*'भेट'* कधी 'संधी' असते,
निसटून पुढे निघून जाते.

*'भेट'* कोवळ्या प्रेमिकांची.
लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर.
*'भेट'* घटस्फोटितांचीही असते.
हक्क सांगण्यासाठी मुलांवर.

*'भेट'* एखादी आठवणीतली असते.
मस्त 'Nostalgic' करते.
*'भेट'* नकोशी भूतकाळातली.
सर्रकन अंगावर काटा आणते.

*'भेट'...*
विधिलिखीत...काळाशी न टाळता येण्याजोगी !

*'भेट'...*
कधीतरी आपलीच आपल्याशी.
अंतरातल्या स्वत:शी.
आयुष्याच्या नाजुक वळणापाशी.

*'पुन्हा भेटू*...✋🏻

गुढी पाडवा* 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 
*चला उभारू गुढी* 
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 

चला उभारू गुढी, सयांनो 
चला उभारू गुढी 
बदलून टाकू रूढी 
सयांनो अशी उभारू गुढी ———•|धृ|• 

नाविन्याची आस धरूया 
प्रगतीचाही ध्यास घेऊया 
जूने जाऊद्या मरणा लागूनी 
जळो तयांची कुडी 
सयांनो अशी उभारू गुढी ———•|१|• 

श्रद्धेला मनी स्थान देऊया 
अंधश्रद्धेला दूर करूया 
भव्यत्वाच्या आदर्शाची 
दिव्य घेऊया उडी 
सयांनो अशी उभारू गुढी ———•|२|• 

जे जे सुंदर आणिक मंगल 
भारत भू ला करिती उज्वल 
परंपरा त्या जपण्यासाठी 
विसरून जाऊ अढी 
सयांनो अशी उभारू गुढी ———•|३|• 

वृक्षांचेही मित्र बनूया 
पशू पक्ष्यांना घास देऊया 
सृष्टीचे रक्षण करणारी 
घडवूया नव पिढी 
सयांनो अशी उभारू गुढी———•|४|• 
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *स्वरचित* 
 *वर्षा सरवदे,सोलापूर* 
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 
 

*एक अफलातून कविता...*

** *तो* ***

हे बघ....
मला नाही आवडणार 
भर रस्त्यात , चौकात 
तुझं झपाट्ल्यागत भेटणं 

चारचौघात झडप घालून 
घट्ट कवेत घेणं...

यायचचं असेल कधी 
तर मी सांगते तसा ये 
अगदी मध्यरात्री अंधारात 
सगळे गाढ झोपेत असताना 
हळूच पाय न वाजवता ये. . .

दाराबाहेर मॅटखाली बघ 
चावी ठेवलेली असेल 
हळूच दरवाजा उघड 
हॉलमधून उजव्या हाताला 
बेडरूमकडे वळ . . . . .

आताशा मी दाराला 
लावलेलीच नसते 
आतून कडी 

तरीपण तू काळजी घे 
दार कुरकुरणार नाही याची . . .
मंद निळसर झिरो बल्बच्या 
उजेडात निरखून पहा 
क्षणभर माझा चेहरा....

झालंच तर टाक एक कटाक्ष 
शेजारी झोपलेल्या 
माझ्या पतीवर 
पलीकडेच असतील 
गाढ झोपेतील माझी 
दोन गोड पिल्लं . . . . .

त्यांना पाहुन लाजलास 
तर मग आला तसा 
हळूच माघारी जा .. . .

अन् नसलासच जाणार 
माझ्याशिवाय, तर मग 
हळूच उचलून कवेत घे 

कुणाचीही झोपमोड न करता 
आलास तसा पाय न वाजवता 
बाहेर पड. . . . .

पुन्हा दार बंद करून 
चावी मॅट खाली ठेवायला 
विसरू नकोस....

बघ असा शहाण्या सारखा 
वागलास तर मग 
कुणाची बिशाद आहे 
*मृत्यू* वाईट असतो म्हणायची ?


*Poet Unknown*

।।गुढीपाडवा।। 

लावण्याने ती नटली
रवी किरण ती ल्याली
ती लाजरी ती साजरी
पाडव्याची प्रभा आली।

चैत्र शुद्ध प्रतिपदा
नववर्ष आले दारी
गुढी तोरण उभारू
हर्ष होई घरोघरी।

कडूनिंबाची डहाळी
बांधू आंब्याचे तोरण
गोड साखरेची माळ
होई आरोग्य रक्षण।

पुरण पोळीचा बेत
कडूनिंब रसपान
करू अर्पण प्रसाद
देऊ गुढीस सम्मान।

भाग्य येऊ दे संसारी
हीच कामना सुदिनी
नववर्षाचे स्वागत
करू सारे आनंदूनी।

सौ.मनिषा वाणी.
सुरत.२८.०३.२०१७.
०९४२६८१०१०९. 


 नवीन वर्षाचंं स्वागत करण्यासाठी घर आमचं सजलं आहे
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼

गुढी, तोरण आणि रांगोळी ह्यांचं लेणं लेऊन सज्ज झालं आहे
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼

संकल्पाची गुढी मी माझ्या मनात उभारली आहे
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼

मनाच्या दारातच सुविचारांचं तोरण मी लावलं आहे
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼

रांगोळीच्या नक्षीने चैतन्य चितारलं आहे
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼

आरोग्याच्या पंचांगाची मी पूजा केली आहे...
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼

सौख्य आणि संपदा ह्यांचं दान मी मागितलं आहे...
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼

तुम्हां सगळ्यांनाही मिळो हे ऐश्र्वर्य हीच ईश्र्वररचरणी प्रार्थना आहे.
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼

*मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*गुढीपाडवा* 

तोडू दीन बेडी
नको द्वेषअढी
समतेची गुढी
उभारुया

कडुनिंब पान
आज त्याला मान
आरोग्य ते छान
सदा ठेवू

साखर माधुर्य
वेळूचे सामर्थ्य
आसनाचे स्थैर्य
जीवनात

ऐक्याची भावना
यशाची कामना
समृद्धी जीवना
आणूयात

समर्पण वृत्ती
कामाप्रती भक्ती
विचारांची शक्ती
जोपासूया

नकोच विकल्प
नवीन संकल्प
निर्मिती प्रकल्प
करू यात

सौ योगिता किरण पाखले,पुणे 

वर्ष मराठी मनाचे..... 

वर्ष मराठी मनाचे 
स्वागत माझ्या घरी..... 
तया स्वागतासाठी 
गुढी घेतसे ऊभारी..... 

दुमदुमला नगारा 
शिवनेरीच्या मस्तकी...... 
इथं अंग-अंगणात 
रेखिलेली स्वस्तकी.... 

वैरभाव संपवूनी 
सवे नांदाया लागले...... 
पाडवा सनाला 
कडू निंबास गोड केले..... 

भ्रष्टांचा नाश होवो 
माझा मराठी बाणा....... 
खर्याच वाटेवर 
ताठ माझा कणा..... 

कमलेश शिंदे 




विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी

गुलाल उधळुनि नगर रंगले
भक्तगणांचे थवे नाचले
रामभक्तिचा गंध दरवळे
गुढ्यातोरणे घरोघरी

आला राजा अयोध्येचा
सडा शिंपला प्राजक्ताचा
सनई गाते मंजुळ गाणी
आरती ओवाळती नारी

श्रीरामाचा गजर होऊनी
पावन त्रिभुवन झुकते चरणी
भक्त रंगले गुणी गायनी
भक्तियुगाची ललकारी... 



 नववर्षाचे करुया स्वागत
गुढी उभारुया आनंदाची
कोकिळ पहा देतसे वार्ता
ऋतुराजाच्या आगमनाची

नको कलह,नको अबोला
प्रेमाने अवघ्यांशी बोला
मानवतेचे जोडूया नाते
दूर सारुया जातीपातीला

गुढीपाडवा असे द्योतक
पावित्र्याचे नि आनंदाचे
समृध्दि, शांती आणिक
नात्यांमधल्या मधुरतेचे

साडेतीन मुहूर्तातला हा
असे उत्तम दिवस आजला
संकल्प करुनी नववर्षाचा
घडवूया प्रसन्न भविष्याला

देऊघेऊ शुभेच्छा आपण
जोडूया नात्यांचे बंध नवे
मिठाईतील मधुरतेचे मग
मैत्री मध्ये परिवर्तन व्हावे

सुनीता सुरेश महाबळ 


 ✍🏽🌹स्वागत नव वर्षाचे 🌹✍🏽


जुने वर्ष ते सरुनी गेले
नव वर्षाचे स्वागत करु या
नव्या आशा नव संकल्प
नवी - नवी स्वप्ने पाहू या.! 1!

नवी क्षितिजे, नवी आव्हाने
नव्या अपेक्षा नवीन वाटा
शोधू या नवीन वर्षात
मनात आनंदाच्या लाटा.! 2!

जल्लोषात उत्साहात आपण
करू या स्वागत नव वर्षाचे
येवोत जीवनी आपल्या
सुखद क्षण हे हर्षाचे. ! 3 !

झाले गेले विसरून जाऊ
पुन्हा नव्याने जूळवून घेऊ
क्षणभंगूर हे जीवन आपले
रोज नव्याने फूलवीत ठेऊ. ! 4.!

स्वप्ने आपली पूर्ण कराया
प्रयत्नांची पराकाष्ठा करू या
श्रमावरती निष्ठा ठेवूनी
भविष्याचा वेध घेऊ या. ! 5!

सर्वांना लाभो आरोग्य संपदा
धन धान्याने घर हे भरावे
आनंदाच्या बागेमध्ये
सुयशाचे फूल उमलावे. ! 6 !

✍🏽🌹सौ. शारदा राम मालपाणी. 🌹✍🏽 


🌷नववर्ष🌷 

नववर्षाचे स्वागत समयी
उजळली सुरेख उषा
ब्रम्हांडी नक्षञ पलटले
दाखवीत नाविन्य दिशा

चोहूबाजूने घेरीत किरणे
उधळीत गुलाल-सडा
सांगती हे सुखद ललाटी
निजली रे दुखद निशा
नववर्षाचे......

नववर्षाच्या नव्या कामना
साध्य कराया करा साधना
स्वच्छ भावना ठेव सख्या रे
उमल तू गुलाब जसा
नववर्षाचे .......

✍🏻चंदु झुरमुरे 



।। शिवरायांचा महाराष्ट्र।। 

नवं वर्षाचा गुढीपाडवा, लई हर्षित होऊन आला।
संस्काराचा सुगंध उधळीत, सण वर्षाचा आला।।धृ.।।
साफ सपाई करून झाली, गाव खेड्यांची शहराची।
सजवून ठेवले रस्ते येथले, सारी कमाल रांगोळ्यांची।।
सडा समार्जन करून जाहले, घर अंगण सजले सारे।
गुढी उभारून मंगल्याची, मन भावुक झाले का रे।।
तोरण बांधुनी घरच्या दारा, स्वागत करू या चला।
माणसातल्या माणुसकीची, नवी गुढी उभारू चला।।१।।
विसरून जाऊ गतकाळातील, वाईट नीतीच्या खुणा।
जे जे आहे सत्य खरोखर, त्याचाच करू या जिना।।
चला टाकू या पाऊल पुढती, हातात घेवुन हात।
पळवून लावू वाईट मनातील, दृष्ट प्रवृत्तीचे भूत।।
प्रेम अन सदभाव भक्तीचा, मळा फुलावू या चला।
शिवरायांच्या संस्काराचा, नवा महाराष्ट घडू चला।।२।।
कवी-राजेश साबळे-ओतूरकर
उल्हासनगर-(ठाणे)
मोबा-९००४६७४२६३ 


**महिमा गुढीपाडव्याचा** 

गुढीपाडव्याच्या सणाचा
महिमा आगळावेगळा
गुढया उभ्या करून
आनंद व्यक्त करण्याचा

प्रभू रामचंद्र वनवासी
गेले होते चौदा वर्षे
दुष्ट अशा रावणाचा
नाश करून अशुभाचा
परतले होते अयोध्यानगरी
प्रभू रामचंद्र याच दिनी

मंगल दिन शुभकार्याचा
वर्षारंभ हिंदूधर्मियांचा
प्रसाद मानती कडुनिंबपानांचा
आरोग्याला हितकारक मोलाचा,
अन् चांगल्या वाईटाचा
प्रतिकार करता येण्याचा

जन मानती हा दिन
साडेतीन मुहूर्ताचा
आरंभ मानतात
शालीवाहन शकाचा

बालगोपाळांनो घेऊया ध्यानी
महत्त्व भारतीय सणांचे मनी
एकमेका सहाय्य करूनी
करूया यशाची गुढी उभी

वि.म.कुसाळे 
 

**चैत्र (मैत्र)** 

चैत्राच्या चाहुलीने
सारे काही नवे होई
ऊन असे तप्त तरी
झाड-झाड गाणे गाई

पिंपळाचे पान हले
कानातले डूल
लतावृक्षांनी जणू
पांघरली झूल

सूर्य तापे तीव्र तरी
वारा वाहे मंद
नटलेली धरती सारी
मना करी धुंद

चैत्राच्या लोभापायी
भास्कराची उधळण
उदय होई लवकर
अस्त मात्र विलंबानं

मानवाच्या मना देई
आल्हाद चैत्र
गुढया उभारून तो
व्यक्त करी 'मैत्र'

वि.म.कुसाळे 



*🎐गुढीपाडवा🎊

निळ्या वत्सल आभाळी 
औचित्य आजच्या शुभदिनी 
उभारू समृद्धीची गुढी 
नववर्षाचे स्वागत करुनी || 

मंगलमय प्रभात समयी 
सुखाचा मोहर फुलला 
ऋणानुबंधनाच्या गाठी 
प्रेमाचा कलश उभारला || 

मांगल्याच्या सुरासोबत 
सनई-चौघडे वाजती 
स्वप्नाची उभारली आस 
आनंदाची फुले उमलती || 

चैतन्याचा स्पर्श झाला 
विजयाचा क्षण आला 
आकांक्षेची होवो पुर्तता 
पाडव्याचा सण आला || 

⚜काव्यरचना⚜ 
*✍🏻संदीप ढाकणे🎭
📱7588512467 
जि.प.प्रा.शा.लिंगदरी 
औरंगाबाद. 


*" सरणारे वर्ष मी "*
----------- 

मी उद्या असणार नाही 
असेल कोणी दूसरे 
मित्रहो सदैव राहो 
चेहरे तुमचे हासरे 

झाले असेल चांगले 
किंवा काही वाईटही 
मी माझे काम केले 
नेहमीच असतो राईट मी 

माना अथवा नका मानु 
तुमची माझी नाळ आहे 
भले होओ , बुरे होओ 
मी फक्त " काळ " आहे 

उपकारही नका मानु 
आणि दोषही देऊ नका 
निरोप माझा घेताना 
गेट पर्यन्त ही येऊ नका 

उगवत्याला " नमस्कार " 
हीच रीत येथली 
विसरु नका ' एक वर्ष ' 
साथ होती आपली 

धुंद असेल जग उद्या 
नव वर्षाच्या स्वागताला तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझा प्राक्तनाला 

शिव्या ,शाप,लोभ,माया 
यातले नको काही 
मी माझे काम केले 
बाकी दूसरे काही नाही 

निघताना " पुन्हा भेटु " 
असे मी म्हणनार नाही 
" वचन " हे कसे देऊ 
जे मी पाळणार नाही 

मी कोण ? सांगतो 
" शुभ आशीष " देऊ द्या 
" सरणारे वर्ष " मी 
आता मला जाउ द्या। 

मंगेश पाडगावकर........... 
 *गुढी मानवजातीची*

चला उभारूया गुढी
करू अवर्षणावर मात
बळी राजाचेच राज्य यावे
त्याची करू सुरूवात !!

चला उभारूया गुढी
करू भ्रष्टाचारावर मात
भ्रष्टाचाराचे करू दहन
भ्रष्टाचा-यांची लावु वाताहत !!

गुढीची काठी नसावी लाठी
रक्षक ठरावी गरीबासाठी
साखरेच्या गाठी भुकेल्यासाठी
रेशीम वस्र द्रोपदी रक्षणासाठी !!

फुलं गुढीची असावी वंचितांसाठी
कलश गुढीचा नसावा शोभेचा
दीन दलितांचा सन्मान वाढवावा
कडुनिंबाचा पाला निरोगी जीवनाचा !!

असा पाडवा हवाहवासा
जो नसावा निव्वळ हिंदुंचा
आनंद वाढवी मानवजातीचा
क्लेष द्वेष सारावा सकलांचा !!

दिलीप मालवणकर
उल्हासनगर
9822902470 

चैतन्याची गुडी
ंंंःःःःःःःःःःःःं

माझी आई नेहमीच
सकाळीच उठायची
संध्याकाळ पर्यंत
सर्व काम संपवायची

आज माझे घरी
चैत्र प्रतिपदा आली
जुनी वर्षाला आठवून
स्वागताची तयारी झाली

नव्या पक्वानाचा
आज घातला घाट
नव्या खरेदीचा
झाला मोठा थाट

निसर्ग पण नटलाय
झाडे पण बहरलीय
गुलमोहर अजून हिरवाच
नीलमोहर फुललाय

प्रतिपदेच्या दिनी
नवचैतन्य संचारल
गुडीपाडवा उत्सव
करण्याच ठरवल

गुडीपाडवा कवितेचा
पाऊस पडला मंचावरती
गुडी उभारुन यशाची
जाऊ आपण शिखरावरती

सीमा भांदर्गे,आमरावती 

"  बोबडी व्यथा "

नाही झालो मोठा मला
काहीतरी कळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...

इवलेसे हातपाय इवलेसे बोटं
बोबडे बोल बोलू लागले
दूधपिते ओठं
बालपणचं सुख मला
थोडंतरी मिळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...

छोटे छोटे मित्र आमचे
छोटे छोटे खेळ
दंगा मस्ती करता करता
मस्त जातो वेळ
पडू द्या, रडू द्या,
कपडे सारे मळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...

नर्सरीत म्हणता 
खेळायचच असते
प्ले गृप मधे म्हणता
तुझं वय बसते
घराच्याच अंगणात
दुडूदुडू पळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...

सकाळी सकाळी मला
झोप येते भारी
अंशू ऊठ, अंशू ऊठ
मम्मी जागं करी
मम्मीच्या कुशीत मला
थोडावेळ लोळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...

देता काहो पाठीवरती
दप्तराचे ओझे
कळत कसं नाही तुम्हा
काय होईल माझे
भीती वाटे मम्मीच्या
पदराआड दडू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...

मोठं झाल्यावर मी
शिकणारच आहे
स्पर्धेच्या जगात मी
टिकणारच आहे
कुटूंबाच्या सस्कारात
पहिल्यांदा घडू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...

इंग्रजी शाळा काढून
कमाई करतात
बिच्च्याऱ्या पालकांना
वेठीला धरतात
आग लागो त्या कान्व्हेंटीला
धडधड जळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...

शहाणे माझे पप्पा कसे
हट्ट नका धरू
लोकं करतात तसं पप्पा
तुम्ही नका करू
समजलं का पप्पा आता
एक पप्पी हळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या....


Very heart touching. Share if you like.⁠⁠⁠⁠

आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.

आई म्हणायची संध्याकाळची, 

झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.

आई म्हणायची मिळतेच यश,

तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.

आई म्हणायची काहीही असो,

होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.

आई म्हणायची ठेवा श्रद्धा

आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.

आई म्हणायची निर्मळ मन तर 

राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.

आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा

राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.

आई म्हणायची अन्नावर कधी

काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.

दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये

म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.

आई म्हणायची पहाटेची

स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.

आई म्हणायची खाऊन माजावं

पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!

आई म्हणायची येतेच झोप

जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.

अजूनही वाटतं बसलाय देव

घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.

जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं

आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ 
वाटून खायचे सात.

मरण यातना सोसत

आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.

बाबा मात्र हसत हसत

दिवस रात्र झटत असतात
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतात.

त्यांना  कसलंच भान नसतं

फक्त कष्ट करत असतात
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतात .

तुमचा शब्द ते कधी

खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं

तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
पेलत सगळी आव्हाने 
घडवतात तुमचा भविष्यकाळ..

तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबाही खचत असतात
आधार देता तरी
मन मारून हसत असतात..

तुमच्याकडूनं तसं त्यांना 

खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्यांचं
अवघं पोट भरत असतं.

त्यांच्या वेदना कुणालाही

कधीसुद्धा दिसत नाहीत
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाहीत.”

त्यांच्या वेदना आपल्याला

तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

एक दिवस तुम्हीसुद्धा

कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल

तेव्हा म्हणाल, “ आपले बाबा

खरंच कधी चुकत नव्हते
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होते.”

तेव्हा सांगतो मित्रांनो

फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.

आपल्या आई-वडिलांवर

खरोखर प्रेम करा..
 ☘☘

"ए आई" आणि " अहो आई " 

 माहेरच्या मातीतली तुळस जोवर सासरच्या अंगणात रूजत नाही 
तोवर तुलना होणारच दोघीमध्ये
ए आई आणि अहो आई।।

आईची गोष्टच वेगळी तिच्या कुशीतलं रोपटं ती हळुवार जपते
पण कर्तव्यदक्ष सुगृहीणी घडवण्यासाठी अहो आई कठोर वागते।। 

जन्मदात्या आईची सर कोणालाही येणार नाही
पण तरी अहो आईचं आयुष्यातलं महत्व कमी होणार नाही।।

ताणल्याशिवाय तुटत नाही
अन् टाळी एका हातानं वाजत नाही
असं एकतरी घर दाखवा बघू
जिथं भांड्याला भांड लागत नाही।।

अहो आईचे अनुभव तिचे कष्ट याचे ठेवावे भान
म्हणजे घराच्या रंगमंचावर
होणारच नाही नाटक मानापमान।।

अहो आईचा मोठाच पाठींबा 
घरादाराला त्याचाच आधार 
मुलं तिच्याच स्वाधिन करून 
आपण संभाळतो घरसंसार।।

माहेरची जाईजुई बहरून
सासरच्या मंडपावर चढते 
ए आई इतकं मुलीचं कौतूक 
अहो आई सुनेचंही करते।।


सर्व आया आणि सासवांनां समर्पित.....⁠⁠⁠⁠

दुष्काळाच्या छायेमध्ये

दुष्काळाच्या छायेमध्ये 
बाप माझा वारलेला
मदतीची  घोषणा ही
हात कुणी मारलेला 

जोडे हे झिजून गेले

माल त्याला चारलेला
टेबलाखालून चाले
खेळ त्याचा मुरलेला

फाईलही सापडेना 

खिसा माझा मारलेला 
त्याला त्याचे काही नाही
टक्का त्याचा ठरलेला

आत्महत्याचा विचार

मनी माझ्या शिरलेला
घरी जावं कसं सांगा
कलेजा हा चिरलेला 

शेतीप्रधान देश हा

आहे कसा शापलेला
शेतमालामध्ये सुद्धा 
बळीराजा लुटलेला

अशोक भांबुरे, मो. : 8180042506

                             9822882028

ashokbhambure123@gmail.com

🏌ज्येष्ठ is The Best.💃
~~~~~

आम्ही ना म्हातारे, 
आम्ही आहोत 'ज्येष्ठ'
उचलू आम्ही जबाबदारी, 
आम्ही नाही 'वेस्ट'

फक्त थोडी लागे आता, 
मधून आम्हां 'रेस्ट'
कारण दुखतात आता,
 हात पाय कधीतरी 'चेस्ट'

खाण्याचेही शौकिन आम्ही,
घेतो सगळ्यांची 'टेस्ट'
त्यामुळेच घ्याव्या लागतात
पॕथॉलॉजीच्या 'टेस्ट'

जीवनातील गोष्टींचीही
माहिती आम्हां 'लेटेस्ट'
तरीही माहीत नाही
उरले आयुष्य किती 'रेस्ट'

वाट पाहतो त्याची कारण, 
केव्हांतरी सांगेल तो, 
तुम्ही आहात 'नेक्स्ट'

तोपर्यंत काळजी कशाला?
उरलेले आयुष्य घालवू, 
आम्ही आता 'बेस्ट'

कारण आम्ही आहोत, 
जातीवंत 'जेष्ठ'
🏌🏃✍🍰🍾💃🍷⁠⁠⁠⁠

ही गाडी कुणी नेली पळवून?

सर्जा-राजाची जोडी म्होरं,
बैलगाडीत  पोरी , पोरं,
मागं घेतलाय दाव्याचा मुंगा,
नाही घसरून पडायचा घोरं,
लावलं फुगं,पताका,तोरणं,
आला मोकाट बैल म्होरणं,
बाप लावी चाबकानं लोळवून,
ही गाडी कुणी नेली पळवून ? ||1||

चाकं गाडीची वाटतात भिंगरी,
घरी काळजीत म्हातारी डंगरी,
गाडवाटेनं   पळल   गाडी,
आहे पांदीला चिटकून झाडी,
बोरी-बाभळीचं बसतील सटकं,
लेका-सुनाचं उडतील खटकं,
लेकरं बसतील कापडं मळवून,
ही गाडी कुणी नेली पळवून ? ||2||

बैलं तळ्यात ,नदीवर धुवून,
तवा मिळायची भलतीच मजा,
गोंडं,चंगाळ्या,झुली बांधुन,
शिंबी,फुग्यानं खुलायचा राजा,
नातू , आजोबा  सारं  नवं,
पुढं मल्हारीचा बेंडबाजा,
आणी आजोबा 'चक्कर' वळवून,
ही गाडी कुणी नेली पळवून ? ||3||

होती पहिलीच भलती मजा,
शहरीकरणाची झाली सजा,
आजी-आजोबा गेलं वाटून,
गेली मायेची गोधडी फाटून,
नातवाला खांद्यावर  देवळात,
खाऊ  घालुन  नुक्ती-भात
सांगा,आणेल कोण खेळवून,
ही गाडी कुणी नेली पळवून ? ||4||

रचना©-विनोद भागवत गादेकर,
('वंचितांच्या व्यथा'--काव्यसंग्रहातून साभार)


उन्हातान्हात, पोर रानात, शेळ्या राखते
चिंच गाभूळी, पिक्क्या बोराची, चव चाखते..

सुरपारंबी, विठी दांडूचा, खेळ रंगतो
डाव नेकीचा, बकाबकीचा, असा दंगतो
खेळ रंगात, मस्ती अंगात, लाज राखते
चिंच गाभूळी, पिक्क्या बोराची, चव चाखते..

भर उन्हात, पाय पाण्यात, डोह लाजतो
खोल मनात, तीच्या सख्याचा, पावा वाजतो
पावा वाजतो, जीव लाजतो, तोंड झाकते
चिंच गाभूळी, पिक्क्या बोराची, चव चाखते..

खेळ लगोरी, मन अघोरी, जाते धानात
शीळ घुमते, राघू मैनेची, फुल पानात
दूर रानात, गंध मनात, काया माखते

उन्हातान्हात, पोर रानात, शेळ्या राखते,
चिंचा गाभूळ्या, पिक्क्या बोराची, चव चाखते..

हनुमंत चांदगुडे
   सुपे [बारामती]

 9130552551

वाचलच पाहिजे!
वाचन दिनानिमित्त कविता🚩🚩
तुकडोजींची "ग्रामगीता”
तुकोबाची "गाथा”
व.पु.च्या कथा
अन्  श्रीकुष्णाची "भगवद् गीता"
      वाचलीच पाहिजे!

पुरंदरेचा 'छत्रपती'
विश्वास पाटलांची 'झाडाझडती'
खांडेकरांची 'ययाती'
आणि गणपतीची आरती
      वाचलीच पाहिजे!

कुसुमाग्रजांचं "कौंतेय"
देसाईचं "राधेय"
सावंताच "मुत्युंजय"
वाचलच पाहिजे!

पु.ल.ची 'अपूर्वाई'
विनोबांची 'गिताई' आणि
'श्यामची आई' वाचलीच पाहिजे!

हिंदूचे वेदपुराण
मुस्लिमांचे कुराण
प्रेमचंदाचं गोदान
आणि आपलं..पसायदान
वाचलच पाहिजे !

भोसल्यांचा जागरं
कदमाचं गोंडर
मोरेंचा सावरकर 
आणि धनंजय कीरचा आंबेडकर
 वाचलाच पाहिजे!

अत्रेंचे विनोद
गडकरींची नाटकं
मानेंची उपरा आणि 
आण्णाभाऊंची फकिरा
   वाचलीच पाहिजेत!

गांधींचे प्रयोग
विवेकानंदांचे योग
बहिणाबाईंची गाणी
इंद्रजित भालेरावचं पिकपाणी

    वाचलच पाहिजे!⁠⁠⁠⁠


" डॉक्टरची कैफियत " 

आम्ही डॉक्टरांनी केला संप
आणि  हैराण झालात सारे
सा-यांचीच होतेय अडचण
आम्हालाही हे पसंत नाही बरे

डॉक्टर आणि पेशंट दोघांनाही
गरज असते ना एकमेकांची
परस्परांच्या  सहकार्याविणा
उपपजीविका नाही कोणाची

जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ देणा-या
डॉक्टरच्या जीवावरच उठलं कोणी
तर खरंच सांगा मित्रांनो  मूग गिळून
फक्त सहन करायचं  का डॉक्टरांनी?

आपली बाजू मांडायचा अधिकार
लोकशाहीत आहे ना सगळ्यांना?
मग आमचीही न्याय्य बाजू जरा
सगळ्यांनी   समजून घ्या ना

जरा काही  दुखलेखुपले तर
डॉक्टरच आठवतो ना सा-यांना
दहशतीला घाबरून जर झाला नाही
डॉक्टरच कोणी, तर बोलवाल कोणा

मान्य  आहे एखादा डॉक्टर
अपवाद असेल या सा-याला
पण म्हणून काय तुम्ही एका मापी
मोजणार काय हो प्रत्येकाला

हेही कळतंय आम्हाला की, तुम्हा
सा-यांचे समर्थन आहे आम्हाला
पण मूक समर्थन नाही कामाचे
व्यक्त करुन भावना  द्या पाठिंब्याला

परस्परांना सहकार्य  आपण देऊघेऊया
जीवन सा-यांचे अन् सुखमय करुया
मग विसंवाद नावालाही नाही उरणार
डॉक्टरपेशंटचं निखळ नातं आपण निर्मूया

सुनीता सुरेश महाबळ 



युग पुरुषाला विनम्र अभिवादन.

जगी नाहीच विद्वान
माझ्या भिमराया वाणी

विद्वतेला सलाम करी
भारत मातेचा कैवारी
कायद्याची रचना करी
शब्द धनाचा पुजारी
गातो समतेचा पोवाडा
पिऊन तळ्यातले पाणी

सर्वधर्म समभावाने
समता नांदावी घरोघरी
हरिजनांच्या उद्दारा
ममता, मानवता दारी
त्याने सुगंध पेरीला
गंध, अबीर बुक्कयावाणी

अन्यायाला फोडली वाचा
घेऊन ज्ञानाची मशाल
वंचितांना न्याय दिला
करुन कायद्याची ढाल
मारली भरारी गगनात 
फिनिक्स पक्षावाणी

युग पुरुषाची गाथा
कोणा वाचता येईल?
प्रज्ञावंत सिद्ध योगी
कायम किर्ती राहील
चंद्र सुर्याच्या साक्षीने
सारे  गातील गाणी

जगी नाहीच विद्वान
माझ्या भिमरायावाणी

सौ. राही कदम (फपाळ)

सोनपेठ, परभणी⁠⁠⁠⁠

[12:58, 4/14/2017] +91 94233 58295:  ⁠
🌹निळाईच्या सावलीत 🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


निळ्या नभाच्या छताखाली 
तमाचा नाश करणारा 
रविकर !!!!
खळाळणारं मुक्त जल
अन रो रो गर्जणारा वारा 
मुक्त आभाळ स्वछंदी हवा
सुख समृद्धी ऐश्वर्य 
निळ्या नभाच्या छताखाली 
मानवतेचा महासूर्य  !!!
अज्ञानाचा काळोख चिरुन
आणणारा उजेडाचा गाव
दलित पिडीत शोषण कळा त्रस्त 
अन्याय अत्याचार चिरडलेले 
राजहंस...... !!!!
त्यांचा स्पर्श नको की त्यांची हवा 
हवा ही नको  !!!
सावलीची ही नको साथ
निळ्या नभाच्या छताखाली 
हवा वेगाने नव्हतीच.......... 
हवे पेक्षा ही त्याचा वेग होता 
अन्याया विरुद्ध लढण्याचा 
देखावा नव्हताच मुळी 
इरादा ही त्यांचा नेक होता......
निळा झेंडा अन निळीच शाई होती
शब्दा शब्दात मातीची उतराई होती 
ज्यांच्या पायधुळीत ही पुण्याई होती 
निळ्या नभाची निळाई होती..........
माणुसकीचा धर्म तेवढीच 
भिमरावांची कमाई होती !!!
लाखो बहुजनां साठी
परिवर्तनाची एकट्याची लढाई होती 
ज्यांच कुणीच नव्हतं या जगी
त्यांच्या साठी सावली निळाईची होती 
धर्म नव्हताच मुळी माणुसकीचा 
माणूसकीनं जगण्याची लढाई होती 
निसर्गानं दिलेल्या मुक्त......
पाण्या साठी महाडची ती चढाई होती 
पाणी पेटलयं...... पेटलायं माणूस....
माणूस म्हणून जगण्या साठी !!!
मूक बहिष्कृत पंख छाटलेले
शरणागता सारखे अपराधी........
गावकुसा बाहेरचं जगणं !!!!
अपमानित अस्तित्व हीन 
अन रक्ताचं शिंपण ही केलं
काळ्यारामाच्या पायरी साठी.......
मानव मुक्ती युगा न युगाची 
अबोल वाणी बोधीवृक्षाची
समतेच्या विशाल सागरी !!!
अशांत लाटा विरल्या.......
महासूर्याच्या चरणांती  !!!


सौ.रजनी ताजने.⁠

१२६ व्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन !!!

।। जन्मा आले भीमराव म्हणूनी।।

जन्मा आले भीमराव म्हणूनी, कळून आले काही।
माणसातल्या माणुसकीची, आज लाज वाटते पाही।।

इथेच पाहिले माणसातल्या, माणुसकीचे चेहरे।
रंग बिरंगी कपडे आणिक, रंग बिरंगी चेहरे।।
कोणी घेतला भगवा, हिरवा, निळा झेंडा हो हाती।
राम, रहीम, अन बुद्धासाठी, कोणी पडल्या जाती।।
जन्मा आलो माणूस म्हणूनी, माणूस म्हणूनी राही।
शिळी कोरडी भाकर खाऊन, एकत्र मिळूनी राही।।

कशासाठी हो ही धर्म बंधने, कशाला पाहिजे जाती।
या भूमीवर पिकते जे जे, सर्व धर्म-जातीचे खाती।।
खाणारा ना विटाळ होतो, ना किटाळ कुणावर येते।
माणसांच्या स्पर्शाने कशी, माणूसकी विटाळून जाते।।
देव कुणाचा कसा असू द्या, तो असले करणार नाही।
सांगून गेले भीमराव जगाला, जरा मना विचारून पाही।।

मोठ्या घरचा कुत्रा फिरतो, रोज एसी गाडी मधुनी।
गरीब बिचारा माणूस मरतो, नसता पोटा अन्न-पाणी।।
तरी आम्हाला हवी कशाला, ही धर्म-जात बंधने।
उपटून काढा कडू विषारी, माणसातले जे उणे।।
भीमरावांच्या संविधानाने, दिले आम्हाला लई।
भीमरावाला वंदन करतो, या भारत भू चा शिपाई।।
कवी-राजेश साबळे-ओतूरकर
उल्हासनगर (ठाणे)

मोबा-९००४६७४२६३⁠⁠⁠⁠

बाबांचे कार्य कळणार    कधी

बाबासाहेबांचे कार्य लिहिण्या 
लेखणी माझी अपुरी आहे
भाव माझ्या मनीचे तरीही
इथे आज मांडते आहे

दलितांच्या उध्दारा
नाही कोणी सरसावला
थोर तो महापुरूष 
दलित वस्तीत जन्मला

शिक्षणाची दारे खुली केली समाजाला
आम्हीही माणूस आहो जाण दिली सवर्णाला
अस्पृश्याची पोरं म्हणून जगणे होते महाग
खितपतलेल्या समाजाला आणली त्यांनी जाग

अन्यायाची धगधग 
पेटली होती मनात
झणझणीत अंजन 
घातले त्यांनी डोळ्यात

महामानव हा तारणहार
घटनेचा तो शिल्पकार
जातीपाती उखडून केला 
बौद्ध धर्माचा स्वीकार

भीमाची लेकरे म्हणून
सारीकडे मिरवतो
एक तरी त्यांचे विचार
जीवनी कधी आचरतो?

मिरवणूकांनी त्यांचे फिटेल का ऋण?
अरेरावीने कधी कधी होते सुन्न मन
जातीची बेडी घालू नका त्यांना
समानतेची संधी दिली त्यांनी सर्वाना

झाले गेले सारे सोडून देऊया
आदर्शाची पिढी उभी करूया
बाबासाहेबांच्या संघर्षाला करूया सलाम
महामानवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

सौ.ज्योती संजय वाघमारे

महामानव ...

मी असलो जरी मराठा
मी मानतो महामानवा
मी मानत नाही जाती - भेद
म्हणून चालवितो वारसा महामानवाचा...

मी मानतो महामानवा
करतो आदर त्यांच्या विचारांचा
भोक्ता आहे मी त्यांच्या ज्ञानाचा
मानव मी पुजतो महामानवा...

त्यागाची परिसीमा महामानव
ज्ञानाचा महासागर महामानव
माणसातील माणूस महामानव
नम्रतेचा शिखर महामानव

दया क्षमा शांती अहिंसा 
आणि प्रेमाचा आधार महामानव
जन्माला महामानव ज्या दिवशी
तो दिवस नक्कीच असावा चमत्काराचा...

तो चमत्कारी दिवस आजचा 
महामानवाच्या जयंतीचा
चला ! स्मरून महामानवा
त्यांना अभिवादन करूया ....

©निलेश बामणे
         सोलापूर⁠⁠⁠⁠

| भीमा तुमच्या पावलांनी ||
=================
तिमिराचे चिरुनी काळीज
पहाट नवी झाली..
भीमा तुमच्या पावलांनी
जादू अशी केली..!!

पिचलेल्या जनतेमध्ये
जान नवी आली..
समतेच्या किरणांनी ही
वाट सुकर झाली..
पसरल्या हातांची त्या
वज्रमुठ झाली..
भीमा तुमच्या पावलांनी
जादू अशी केली..!!

बाळ तडफडे पाण्यास  
तहान बहू लागली..
दृष्ट त्या धर्मांधांस  
दया नाही आली..
आग लावून पाण्यास 
तळी खुली केली..
भीमा तुमच्या पावलांनी
जादू अशी केली..!!

चहूओर जातीयतेची 
अजारकता वाढलेली..
विटाळाच्या वेटोळ्यात  
छाया घुसमटलेली..
दिली तिलांजली धर्मास
मुक्त झाली सावली..
भीमा तुमच्या पावलांनी
जादू अशी केली..!!

बहु झाले विरोध जरी 
पर्वा नाही केली..
संविधान लिहून तयांना
चपराक दिली..
महामानवाचा अवतार
जनता बोलू लागली..
भीमा तुमच्या पावलांनी
जादू अशी केली..!!
*सुनिल पवार...✍🏽

🌺डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌺⁠⁠⁠⁠

भिमा...
माणसाला माणूस म्हणून ,
जगायला शिकवलस तू 
गुलामीचं उतरलं  
मानेवरून जू ,

तू सूर्य बनून आलास,
क्रांतीचा, 
प्रज्ञावंत झालास तू 
चवदार पाण्याचा अर्थ 
तेव्हापासून कळला आम्हाला 

तू डोळ्यांना दृष्टी दिलीस
माणूस म्हणून जगायला  
सृष्टीचा नियम आम्हाला बाहाल केलास तू 
आणि बदलून गेले सारे 
म्हणून आज काही आकाशात 
चमकतात आमचे तारे 

तू दिलास न्याय ,
तू शिकवलेस समता,
आणि आम्ही बंधुत्वात 
बांधून घेतले स्वतःला 
आम्ही शिकलो, 
संघटित झालो......
मात्र संघर्ष अजून चालूच आहे 

पण 
आजून काही बेड्या 
अडकून आहेत पायात,
बेड्या तोडाव्यात तर 
पाय रक्तबंबाळ होतोय,
आणि बेड्या घेऊन 
चालणे असह्य होतयं 

भिमा, तुझी जयंती खूपच 
मोठी होईल 
यात शंका नाही ,
आज आम्ही तुझे अनेक 
पुतळे उभे केले,करत राहू 
तुला आवडेल का नाही 
माहित नाही 

पण तू आहेस म्हणून !
ब-याच प्रश्नांची उत्तरे प्रश्नांच्या 
अगोदरच मिळतात 

आम्ही आता वस्त्यातून 
आवास योजनेच्या बंगल्यात आलोय,
थोड्याशा भिंती कच्च्या आहेत 
काही ठिकाणी छत गळतं आहे 
मूलभूत सुविधा लवकरच 
मिळतील 
बाकी आनंद आहे भिमा,

पण अजूनही थोडे 
अंतर आहेच माणूस पणाच्या वैचारिक रेषेवर 
पोहचायला 

तुझाच धडा गिरवणारी 
काही लेकरं खूपच 
पुढे निघून गेली आहेत 
ते जोडून घेतात,
आम्हाला त्याच्याशी 
राजकीय फायद्यासाठी 
आम्हीही जातो त्याच्या 
मागे विना तक्रार 
केवळ तू तिथं आहेस म्हणून 
फक्त तुझ्यासाठी भिमा,

काळाप्रमाणे बदलते सारे 
आणि बदलायलाही आवश्यक आहे 
रक्षणाचं म्हणाल तर  
आरक्षणाला मात्र 
आम्ही धक्का लागू दिला नाही 

चैत्यभूमीवर 
तुझ्या नावाने निळ्या आसमंतात 
सगळी कडे तूच दिसतोस,
तू असतोच 
पांढऱ्या शुभ्र वस्रात सारं सारं शांत झालंय असे वाटते,माझी दुःख कुठंच 
दिसेनाशी होतात.

अस्पृश्यता आता राहिली नाही भिमा,
आज आमच्या मांडीला मांडी लावून 
सारेच पंगतीला बसतात,

पंगती भेद नसतोच करायचा,
पण डोक्यातून  जाता जात नाही "जात"
बौध्दीक अस्पृश्यता आहे 
आज काल,
पण ती वरवर दिसत नाही ,

जातीचे भांडवल करून ,
आपल्यातल्यांनी ही एक स्वतःचा दबाव गट तयार केला आहे ,
काहीनी थाटली आहेत दुकाने तुझ्या नावावर नव्यानं  
फक्त तुझा फोटो डोक्यावर लावून ,
तुला सांगायचं आहे आजून काही 
जाणवत रहात 
पण माफ कर भिमा,
तुझ्या इतका संघर्ष करण्याची तयारी नाही आमची 

तू असतोस, गाड्यांच्या 
नंबर प्लेटवर,
तू असतोस, पेनवर, 
अंगठीत, बनियनवर, 
तू निळा वाघ, होतोस, 
निळे वादळ होतोस आणि बरचं काहीस होतोस 

तुझी कोणतीच नसते तक्रार 
तू शांत पणे पाहतोस ,
तुझे तत्त्वज्ञान माणूस पणाच्या समूहाची भाषा होती 
तू तलवार लढण्याची 
तू ढाल संरक्षणाची 

तू टीव्हीवरच्या चर्चेचा विषय होतोस,
तुझी राजकीय भूमिका त्या काळी योग्य की अयोग्य ,
याचे फड रंगले जातात,
सोयीचे सोयीने, संदर्भ बदलले जातात,
हवे ते अर्थ घेतले जातात,

तुला अपेक्षित नव्हतेच असे अंधळ्याने जगणे,
तू स्वीकारलास बुध्द,
तू म्हणाला होतास, 
डोळे उघड्या असणाऱ्या बुध्दाला तुला पाहायचं आहे 
आता तूच बुध्द झालास,
परत एकदा डोळे उघड बुध्दा,
परत एकदा डोळे 
उघड बुध्दा .....

अभिजीत पाटील, सांगली 

9970188661©®©⁠⁠⁠⁠

दिपस्तंभ!®5
=======
मानवा तुज पाणी दिले
मानवा तुज मानव बनविले
झुगारले असंख्य बंधने लादलेली
तरी कारे झुलतोस ढोल ताशाच्या तालावरती.....
चलाख आहेत काही तुला 
शिकार करण्यास निघाले
तुझी स्तुती करुनच काही
तुझे गळे कापण्यास निघाले....

तू तोड रे माणसा तुझ्या
अंधश्रद्धेच्या पाश ,निघ जरा
बाहेर गोषातून बघ कुठे 
चालला समाज...

मला उदोउदो ची आस नव्हती
वाटल होतं तू बनावं..
शासन करती जमात..

पण!
भाऊभाऊच झाले वैरी तुम्ही
कशी साधाल ऐकिची हाक..

जातीवाद्यांनी अजूनही केलेत
जातीत जातीला बंधिस्त
फक्तच बोद्धांनी दिली हाक बाकी
मलिदा खाण्यापुरतचे घेतात
बिंलदर माझे नाव....

घटनेच्या ऐका ऐका पानावर
तुझे अधिकार केले पक्के
तरी कारे तुम्ही शिकूनही
असे भलतीकडेच मारता शीक्के

स्कूल काढा कॉलेजेस काढा
काढा समाजासाठी संस्कार केंद्र
होऊ द्या घडन पिढीची
ऊद्या उभा होईल त्यातून दिपस्तंभ!
एक नवा दिपस्तंभ!!
दिपस्तभ!!!

कांचन वीर
यवतमाळ

9422057620®5®5®5



बाबासाहेबांची विनवणी !



माझ्या नावाचा जप करूनी

कर्तव्य आपले विसरू नका !

दलितांचा केला मी उध्दार खरे

दलित म्हणुनी  यापुढे जगु नका !



बाम्हणास नव्हे ब्राम्हण्यास 

विरोध माझा सदैव होता !

नका ऊगाळू खपल्या जखमांवरच्या

नका करू बाऊ भेदभावाचा आता !!



बहुजनांतील ब्राम्हणांस आता शोधा

खरा लढा त्यांच्याशीच  लढा आता !

लाचारीने नका स्विकारू पदे आता

तुम्हीच व्हा तुमचे भाग्यविधाता !!



मी दिला शांती समतेचा मार्ग तुम्हा

माझी आरती गाण्यात नको धन्यता !

पुतळे माझेच उभारून का लाजवता

बुद्धाचा संदेश रूजवा जनमानसात आता !!



माझा मार्ग अनुसरून करा वाटचाल

 नका करू देवत्व बहाल मला !

माझे कार्य हाच माझा महाल माना

स्मारकात का शोधता बांधवांनो मला !


मी प्रत्येक श्वासात आहे तुमच्या
भूलू नका कोणाच्याही भुलथापांना आता !
समतेचा ममतेचा मार्ग स्विकारा आता
मी असता सभोवती पर्वा कशाची करता !!

दिलीप मालवणकर
9822902470⁠⁠⁠⁠


🙏🏻ज्ञानसुर्य🙏🏻

दिनदलितांचा कैवारी
निळ्या आभाळाचा दाता
किती सांगू मी थोरवी
बाबासाहेबांची गाथा ||

संविधानाचा निर्माता
जन्म झाला भारतात
ज्ञानाचा सुर्य असा
तळपला विश्वात ||

अस्पृश्यतेचा धिक्कार
समतेचा पुरस्कार
शिकून व्हा संघटीत
बाबासाहेबांचा विचार ||

महाडचे चवदार
पाण्यासाठी सत्याग्रह
दिली शिक्षणाची दारे
ज्ञानासाठी आग्रह ||

प्रज्ञा,शील,करूणा
बोधिसत्वाचा विचार
जुगारली मनुस्मृती
माडंला आदर्श आचार ||

बाबासाहेबांचा विचार
असा पेरावा जीवनात
होई जीवना आधार
सुख मिळे आनंदात ||

🙏🏻काव्यरचना🙏🏻
✍🏻संदीप ढाकणे🎭
📱7588512467
जि.प.प्रा.शा.लिंगदरी
औरंगाबाद.


::::"बाबा"::::::::::::

निर्माण करूनी संविधानाचे
उद्धरीले सकल जन
नव्या दृष्टी ने प्रज्वलित
करुन चेतवीले पाषाण

घडवीला नवा समाज
फक्त विचार बुद्धांचे माननारा
भिमराया फक्त तुच होतास
समाजाला संजीवनी देणारा

अनंत उपकार तुझे या
भारत भु वर फिटनार 
ना कधीही हे भिमराया
विद्वते पुढे कोन टिकनार

तेहत्तीस कोटींना ही
पुरून उरलास अजुनी
महाडच्या तळ्याचे पाणी
चवदार केलेस हात लावूनी

राख मनू ची करुन
गुलामीतुन काढलेस
जातीयतेच्या किड्यांना
तु खोलवर गाढलेस

......सुरजकुमारी गोस्वामी 
हैदराबाद

💫💫💫ओव्या 💫💫💫


पहिली माझी ओवी गं.... 
सुनेच्या आईला., 
सल्ले तुझे नको आत्ता., करू दे संसार लेकीला 
दुसरी माझी ओवी गं.... 
लाडक्या सुनेला., 
जीन्स, टाॅप सोड बाई., गुंडाळ आत्ता साडीला 
तिसरी माझी ओवी गं.... 
नवर्‍याच्या फोनला., 
तोंडाने बोल आत्ता., लाव काडी व्हाटसपला 
चौथी माझी ओवी गं.... 
अंगणातल्या चिमणीला., 
देईन धान्य पाजेन पाणी., ये गं माझ्या दाराला 
पाचवी माझी ओवी गं.... 
मायेच्या माणसाला., 
गाते मी गोड ओव्या., बंद कर तुझ्या डी. जे. ला

@सौ.मनीषा निपाणीकर 
लातूर 

दि. 11.04.2017⁠⁠⁠⁠

🙏🙏 श्री.राम 🙏🙏

मुखी आळवित,तुझेच नाम
श्री राम,जय राम,जय जय राम •|•

एक वचनी,एक पत्नी
जगी वंद्य तव,अमोघ वाणी •|•

आदर्श राजा,आदर्श पुत्र
राम राज्याचे,अमोल  सूत्र •|•

तुझ्या गुणांचा,रत्न खजिना
कैवल्याचा चोख दागिना •|•

हाती घेतली,राम पताका
अध्यात्माचा दिव्य अवाका •|•

उद्धारक तू,सकल जनांचा
तूच सोडवी,मोह मनाचा •|•

जन्म मृत्यूच्या फेऱ्या मधूनी
नेशील सर्वां,तूच तारूनी •|•

जगी निनादे,एकच नाम
श्री राम जय राम,जय जय राम •|•

🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
🙏🚩
स्वरचित
वर्षा सरवदे,

श्रीराम नवमी निमित्त लिहिलेल
प्रभु श्रीरामाचे स्तुतिकाव्य :

वटव्रुक्षातळी बैसलि राममूर्ति
तया पाहुनिया जले शांत झाली
मुकी जाहली स्वर्णिमा प्राचीमाजी
पहाया तया गोधने आर्जवेली

उभे जाहले पूर्ण ते चित्र मागे
तया पाहण्या सुर ते लोटलेले
जरी राघवे रूप ते धारिलेले
तरी तेज ते स्वरूप साजिलेले

असे शांत जो आत्मजा सयंमिव
असे राघवी लाघवी तो सजीव
महामूर्त ती कीर्त जी वीरधैव
असुर शक्ति होती रणी पार्थिव

दिले सुग्रीवा राज्य बिभीषणाला
जया दास होताची महारुद्र झाला
जया चिंतने भयही ते सागराला
असा राम तो स्वामी रुद्रेश्वराला

महमंत ते संतही सर्व गाती
तया पायी लोटांगणे तेज जाती
निघे सर्वही मंडले भूमि ज्याते
नमस्कार माझा तया श्रीप्रभुते

प्रसंन्न आठवले
श्रीराम नवमी २०१७⁠⁠⁠⁠

🙏🏻🚩प्रभू श्रीराम🚩🙏🏻

कर्तव्यआज्ञेचा महामेरू
बंधुत्व भक्तीची जाणीव
प्रभू श्रीरामाचे जीवन
नसे आदर्शाची उणीव ||

आधारस्तंभ संस्कृतीचा
सद् विचाराची अस्मिता
प्रभू श्रीरामाचे जीवन
मातृपितृभक्तीची ममता ||

एकवचनी सत्य विचार
योग्य ध्येयाचा कल्पतरू
प्रभू श्रीरामाचे जीवन
बहुत जीवनांचा आधारू ||

मर्यादाची विचारधारा
कर्तव्यनिष्ठेचा ध्यास
प्रभू श्रीरामाचे जीवन
जनकल्याणाची आस ||

दृष्टांचे करी निर्दालन
धर्मरक्षणासाठी शौर्य
प्रभू श्रीरामाचे जीवन
पुरूषोत्तमाचे औदार्य ||

🍁काव्यरचना🍁
✍🏻संदीप ढाकणे🎭
📱7588512467
जि.प.प्रा.शा.लिंगदरी.
औरंगाबाद.

| गोड तुझे नाम ||
=◆=◆=◆=◆=◆=
गोड तुझे नाम प्रभु
ठेवितो मुखात..
एक तूच श्री राम
वसे अंतरात..!!

तूच माझा मुक्ती दाता
तूच निजधाम..
जपता श्री राम नाम
सरे क्रोध काम..!!

कौसल्येचा पुत्र राम
दशरथाचा प्राण..
मातृ पितृ वचनी ऐसा
पुत्र तू महान..!!

ताडन करण्या असुरांचा
तुझा अवतार..
चरण स्पर्शे मात्रे केला
अहिल्या उद्धार..!!

तुझ्या नामाचे सामर्थ्य
पाषाणाही तारी..
लाघुंन सागरास केली
लंकेवरी स्वारी..!!

वाल्याचाही वाल्मिकी होतो
घेता तुझे नाम..
रामायण रचिता झाला
ऋषि तो महान..!!

एक पत्नी एक वचनी
भ्राता गुणवान..
मित्रा हाके धावून जाशी
मित्र दयावान..!!

किती वर्णावी महती
पामर मी अजाण..
अल्पमती स्तवतो स्मरतो
गातो गुणगान..!!

|| राम नवमीच्या पावन शुभेच्छा ||
**सुनिल पवार.....✍🏽⁠⁠⁠⁠

गुण मर्यादा पुरुषोत्तमाचे
       असती अनंत
       गुरुभक्ती
    मात्रुपित्रु भक्ती
गुणसंकीर्तन गावे श्रीरामाचे

सज्जनांचा करी सांभाळ
    दुष्टांचा कर्दनकाळ
         एकबाणी
       एकवचनी
कौसल्यापुत्र,जानकीपती
    असे प्रेमळ,निर्मळ

शबरीची खाल्ली बोरे
     प्रेमाने,भक्तीने
         जागे
         होई
     प्रेम जन्मभूमीचे
प्रभू रामाच्या चरित्राद्वारे

राजेंद्र वाणी,मुंबई 🙏🌹⁠⁠⁠⁠

 ⁠⁠⁠🙏 श्री राम चरित्र 🙏


💥वादळ💥

नमस्कारचे सुद्धा आता 
तुकडे पडलेत...

जय जिजाऊ,
जय भीम,
जय भगवान,
जय मल्हार,
जय रोहिदास,
जय राणा.

सकाळ सुद्धा आता 
जात घेऊनच उगवते...

शिवसकाळ,
भिमसकाळ,
लहूसकाळ.

समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन,
हातात लेखणीची मशाल घेऊन, क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा 
आता जात सांगून टाकतात...

शिवकवी,
भीमकवी,
मल्हारकवी.

वादळं सुद्धा आता 
जात घेऊन येतात

भगवं वादळं,
निळं वादळं,
हिरवं वादळं,
पिवळं वादळं.

रंगात विभागलेत आता
पाऊस,वारा,वादळं

शहरातली दुकाने अन्
गावच्या वेशीसुद्धा...

...पण रक्ताचा रंग मात्र 
अजूनही लालच...

⚜काव्यरचना⚜
✍🏻संदीप ढाकणे🎭
📱7588512467
जि.प.प्रा.शा.लिंगदरी

ता.जि.औरंगाबाद.


❣मैं भारत का नागरिक हूँ
     मुझे लड्डू दोनों हाथ चाहिये

     बिजली मैं बचाऊँगा नहीं
     बिल मुझे माफ़ चाहिये

     पेड़ मैं लगाऊँगा नहीं
     मौसम मुझको साफ़ चाहिये

     शिकायत मैं करूँगा नहीं
     कार्रवाई तुरंत चाहिये

     बिना दिए कुछ काम न करूँ
     पर भ्रष्टाचार का अंत चाहिये

     घर-बाहर कूड़ा फेकू
     शहर मुझे साफ चाहिये

     काम करूँ न धेले भर का
     वेतन लल्लनटाॅप चाहिये

      एक नेता कुछ बोल गया सो
      मुफ्त में पंद्रह लाख चाहिये

      लाचारों वाले लाभ उठायें
     फिर भी ऊँची साख चाहिये

     लोन मिले बिल्कुल सस्ता
     बचत पर ब्याज बढ़ा चाहिये

      धर्म के नाम रेवडियां खाएँ
     पर देश धर्मनिरपेक्ष चाहिये

      जाती के नाम पर वोट दे
      अपराध मुक्त राज्य चाहिए

      टैक्स न मैं दूं धेलेभर का
      विकास मे पूरी रफ्तार चाहिए

       मैं भारत का नागरिक हूँ
      मुझे लड्डू दोनों हाथ चाहिए।

            😄😄😄😄⁠⁠⁠⁠

तुम्ही बी तुमच्या मिसेसला
दागिण्यांनी नटवा
---------------------------------

संपादक  साहेब, 
तुम्ही बी तुमच्या मिसेसला
 दागिण्यांनी नटवा
दोन दिवस शेतामंदी 
खुरपायला पाठवा

आमच्या माईचं दागिणे बघून
तुमचं डोळं फिरलं
त्याच्या मागचं कष्ट तुमच्या
टाळक्यात नाही शिरलं
कष्टक-याच्या द्वेषाचं झापड
जरा डोळ्यावरून हटवा
संपादक  साहेब
 तुम्ही बी तुमच्या मिसेसला
दागिण्यांनी नटवा

कडाक्याच्या थंडीत माय
गोठ्यामंदी जातीय
गायाचं शेण काढून
घामाघूम व्हतीय
तिच्या कष्टाने मिळते दूध
बेड टी घेताना आठवा
संपादक साहेब,
तुम्ही बी तुमच्य मिसेसला
दागिण्यांनी नटवा

नऊ महिन्यांची गरोदर
माय शेतावर खपतीय
शेळ्या कोंबड्या जगवायला
दिसभर राबतीय
चिकन मटण वरपतना
हे जरा मनाला पटवा
संपादक साहेब, 
तुम्ही तुमच्या बी मिसेसला
दागिण्यांनी नटवा


पेरणी, लावणी,  कापणी
करते माझी माय
तुमच्या मिसेसने चिखलात
कधी ठेवलाय का पाय
पडत्या पावसात एकदा
तिला भांगलायला पाठवा
मग खुशाल तिला तुम्ही
दागिण्यानी नटवा

शेतकरी राबतो म्हणून
मिळते तुम्हाला भाकर
त्याच्या घामातूनच मिळते
दूध आणि साखर
केबिनमधलं तुमचं ज्ञान
हुतात्मा चौकात पेटवा
संपादक साहेब, 
तुम्ही  बी तुमच्या मिसेसला
दागिण्यांनी नटवा

-  शामसुंदर सोन्नर
19-12-2014
.
 फोन : 9594999409⁠⁠⁠⁠

जीवनाचे phone घ्यावे

माझ्या जीवनाचं button 
कधीचं off झालंयं
मी स्वतःला आयुष्यातून
कधीचं delete केलंयं

जगताना save केल्यात
वेदनांच्या भयाण हाका
वादळात मी वावरताना
नेहमीच होता धोका 

दुःखचं download करायची
माझ्यावर आली वेळ
मरणानेच game केलाय
आयुष्याचा झालाय खेळ 

आता वाटतं save करावं
जीवनाचं धुंद गाणं
मोबाईलवर काढावेत
स्वप्नांचे photo छान 

कवितेची file मी
Purse मध्ये ठेवावी
शब्दांची  chord मी
Mobile ला लावावी

आनंदाचं recording मी
Headphone वर ऐकावं
सुखाच्या रंगानं माझं
सारं जीवन माखावं

रिंगटोन वाजली की
सुखाचेचं call यावे
आयुष्याच्या mobile वर
जीवनाचे phone घ्यावे 

आयुष्याच्या mobile वर
जीवनाचे phone घ्यावे 

जीवनाचे phone घ्यावे 

कवयित्री उल्का 
द्विज पुरस्कार विजेती उल्का 
शहापूर ठाणे 

मो. 8550935028⁠⁠⁠⁠

काव्यपुष्प🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖
खड्डे

रस्त्यावरच आजकाल
नवे खड्डे सापडतात
काळजावर वार करून
अपघात देऊन जातात ||

एका क्षणात जातोय
इथे जीव माणसाचां
संसार उध्वस्त होतो
अपघात नेहमीचा ||

शोधावे खड्डे रस्त्यात 
दुरावलेल्या त्या मनात
रक्ताने आता माखलेल्या
जुन्या जाणत्या जखमात ||

खड्डे पडलेत आता
निस्वार्थ माणुसकीला
ओस पडलेत रस्ते
भावनांच्या वाहतुकीला ||

जीवन  झालयं स्वस्त
धावपळीत भरकटलं
मृत्यूचा खच पाहून
काळीज नाही थरारलं ||

⚜काव्यरचना⚜
✍🏻संदीप ढाकणे🎭
📱7588512467
औरंगाबाद.
Khup chan kavita !!!!!

खरं सांगु का तुम्हाला..?
छान चाललय माझं..!

टेरेस गार्डन फ्लॅट,
कार मधुन फिरतो..
विकेंडला मी फार्महाउसवर रहातो,
महिना अखेर हप्ते भरुन
जीव माझा जातो..

तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!

क्लास-वन चा जॉब, कार्पोरेट ऑफिस,
हाय प्रोफाइल लोकांसोबत
रोज उठतो बसतो..
खोट्या प्रतिष्ठेपायी मी खरा चेहरा झाकतो..

तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!

आई-वडिल, भाऊ-बहिण सर्व एकत्र रहातो,
आतुन मात्र ते कधी वेगळे होतील याचीच वाट पहातो..

तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!

गावाकडची जमीन विकुन,
मुलाला ऑडी घेउन दिली..
वर्षाकाठी तिन लाख खर्च,
वर शेतातली भाजी बंद झाली..

तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!

चौसोपी वाडा सोडुन, अपार्टमेंट ला रहायला आलो..
शंभर जोर मारुन न दमणारा,
आज दम्याचे औषध खावु लागलो..

तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!

पोरगा झाला डॉक्टर,
पोरगी आय.टी. वाली..
मराठी बोलता बोलता,
जीभ इंग्रजी वर घसरली..
इंग्रजीतलं संगळं आलं,
पण रामरक्षा विसरली..

तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!

फेसबुक वर शेकडो मित्र,
तरीही कट्यावर एकटा बसतो..
मीच केलेल्या विनोदावर,
मीच खळखळुन हसतो..

तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!

आम्ही आमच्या घरात,
आणि मुलगा हॉस्टेल वर रहातोय..
मी मुलाला स्थळ शोधतोय,
अन् तो वृध्दाश्रमांची माहिती घेतोय..

तरीही जगाला ओरडुन सांगतोय,
छान चाललय माझं..!😊 😎कॉपी पेस्ट

 शैक्षणिक पाळणा 


१)पहिले नमन माझे हिंद मातेला
२)दुसरे नमन माझे महाराष्ट राज्याला
३)तिसरे नमन माझे ठाणे जिल्हयाला
उणीवा पोटी क्षमता जन्मल्या॥१॥ जो बाळा
नंदकुमार शिक्षण सचिव झाले
महाराष्टाला त्यांनी जागेच केले
वाचन-लेखन सर्वांना यावे
विविध उपक्रम राबवण्यात आले॥२॥ जो बाळा
पहिल्या दिवशीचा प्रकार पहिला
RTE अॅक्टचा जन्म हा झाला
बालकास वयानुसार प्रवेश द्यावा
मानसिक क्षमतांचा विकास व्हावा॥
३॥ जो बाळा
दुसरा दिवशिचा ग प्रकार दुसरा
पायाभूत चाचणीचा जन्म हा झाला
शिक्षणाचा प्रसार वेगाने आला
तेथून क्रांती आली जन्माला॥४॥ जो बाळा
तिसर्‍या दिवशीचा ग प्रकार तिसरा
रचनावादावर भर हा दिला
संबोध मुलांना समजू लागला
नविन क्षमता जन्मास आल्या॥५॥ जो बाळा
चौथ्या दिवशीचा ग प्रकार चौथा
गुणवत्ता विकास व्हायला लागला
संकल्पनेचा अर्थ समजू लागला
मुलांच्या समस्या सुटू लागल्या॥६॥ जो बाळा
पाचव्या दिवशीचा ग प्रकार पाचवा
अभ्यासात झालेला बदल दिसला
आत्मपरिक्षण सोहळा झाला
सर्वांना बदल मान्य हा झाला॥७॥ जो बाळा
ज्ञानरचनावादाचा वेगळा गट
पास व्हावे हा सचिवांचा हट्ट
त्यातून विद्यार्थि होतील पुष्ट
महाराष्ट राज्य होईल संतुष्ट॥८॥ जो बाळा
पुर्नमुल्यांकाचे विचार झाले
पर्यवेक्षक परीक्षा घेण्यास आले
समाधानकारक उत्तर मिळाले
जीवनाचे सारे मांगल्य झाले॥९॥जो बाळा
धोंडो कर्वैंचे आभार मानू
साविञिबाईना वंदन करू
गुणवत्ता विकासाचा ध्यासच घेऊ
तंञज्ञानात मुलांना पुढेच आणू॥१॰॥जो बाळा
लेखन 
सौ.आशालता घाटगे 
वरिष्ठ शिक्षिका 
ठा.म.न.पा.शा.क्र.४४ 



हरवली आहे माणुसकी 

*हल्ली माणसं पहिल्या सारखं*
*दुःख कुणाला सांगत नाहीत*
*मनाचा कोंडमारा होतोय*
*म्हणून आनंदी दिसत नाहीत* .

 *एवढंच काय*
*एका छता खाली राहणारी तरी*
*माणसं जवळ राहिलीत का ?*
*हसत खेळत गप्पा मारणारी*
*कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?*

*अपवाद म्हणून असतील काही*
*पण प्रमाण खूप कमी झालंय*
*पैश्याच्या मागे धावता धावता*
*दुःख खूप वाट्याला आलंय*.

*नातेवाईक व कुटुंबातले*
*फक्त एकमेकाला बघतात*
*एखाद दुसरा शब्द बोलतात*
*पण काळजातलं दुःख दाबतात*.

*जाणे येणे न ठेवणे , न भेटणे , न बोलणे*
*या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका*
*गाठी उकलायचा प्रयत्न करा*
*जास्त गच्च होऊ देऊ नका*.

*धावपळ करून काय मिळवतो*
*याचा जरा विचार करा*
*बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा*
*आपल्या माणसांची मनं भरा* .

*एकमेका जवळ बसावं बोलावं*
*आणि नेहमी नेहमी*
*तिरपं चालण्याच्या ऐवजी*
*थोडं सरळ रेषेत चालावं*

*समुद्री चोहीकडे पाणी*
*आणि पिण्याला थेंबही नाही*
*अशी अवस्था झालीय माणसाची*
*यातून लवकर बाहेर पडा*.


*माणसं अन माणुसकी नसलेली घरे*
*अन देव नसलेले देव्हारे*
*कितीही पॉश असले*
*तरी त्याचा काय उपयोग ..✍🏻 

स्री जन्मा तुझी कहाणी

 जन्मते कुठे, मरते कुठे
स्री जन्मा तुझी कहाणी
आयुष्य जणू खळाळते
पाटात वाहणारे पाणी ..

जन्मताच मुलगी बापाला
लागली हुंड्याची काळजी
माय सांगे जपुन ठेव पाऊल
तुला जायचे दुसऱ्या घरी
*स्री जन्मा तुझी कहाणी....*

लेक होता षोडशी लागते
हात पिवळे करायची घाई
सोडुन माहेर होते तीची
परक्या सासरी रवानगी
*स्री जन्मा तुझी कहाणी.*

सगळे काही नवीन तरी
प्रेमाने जपते सारी नाती
कधी सून भावजय होऊन
तर ती कुणाची सहचरणी
*स्री जन्मा तुझी कहाणी...*

दोन्ही घरची लाज राखण्या
खडतर प्रवास असतो तो
जन्म घेऊन एका ठिकाणी
संसार करी दुस-या ठिकाणी
*स्त्री जन्मा तुझी कहाणी...*

शल्य सारे हृदयी ठेऊनी
कधी जळून हुंड्या साठी
आईबाबाची लाज राखुनी
जळते राख मागे ठेऊनी
*स्री जन्मा तुझी कहाणी.*

आजन्म ठेवून मनी वेदना
माहेरवाशीण लाडकी लेक
जगते सासरवाळी निमूट
दावणीला झुंपल्यासारखी
*स्री जन्मा तुझी कहाणी...*

..........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद 



💝तिच्यातील ती💝
============= 
|| बदल ||
=======
आज ती खुश भासली
म्हणाली,
बदलतोय पुरुष
बदलतेय मानसिकता..
किंचित का होईना
तो रुजवू पाहतोय
प्रगल्भता..!!

मी हसलो म्हणालो
तसा तो असतोच मुळात
पण अडकून पडतो
नाहक
पुरुषी अहंकारात..
पिढ्यान पिढ्या रुजलेल्या
कुळाचाराच्या कवच कुंडलात..
कुणीतरी
काढून घ्यायला हवीत
ती कवच कुंडले हळुवारपणे
तुला ते जमेल
इतकी प्रगल्भता आहे
केवळ तुझ्यात..!!

आणि
कसं आहे ना..
तुझंच बोट धरून
तो पाहिलं पाऊल टाकतो..
तुला कळतंय नेमकं
तो कुठे चुकतो..?
मागची नाही घडली
पुढची पिढी नक्की घडेल..
तू ठेव अशी जरब त्यावर
काय बिशाद आहे
पाऊल कुठे वाकडं पडेल..!!
***सुनिल पवार 


" योग-प्राणायाम आणि शंखप्रक्षालन " 
---------------------------------------------- 

तरुणपणीच हल्ली माणूस 
म्हाताऱ्यावनी दिसतं 
पोळ्या खातं कमी 
अन गोळ्या खातं जास्त 

कधी तपासा लघवी 
कधी तपासा रक्त 
योगासने केलीतर 
होशील रोग मुक्त 

आरोग्य असेल उत्तम 
तर उत्साह राहील टिकून 
वमन , शंखप्रक्षालन 
लवकर घ्या शिकून 

शरीराची शुद्धी क्रिया 
करावीच लागेल 
नसता उगीच Acidity 
जळजळ मागे लागेल 

जो पर्यंत तुम्ही योगासाठी 
बाहेर नाही पडणार 
हे दुखतं , ते दुखतं 
दिवस रात्र रडणार 

शरीराची हालचाल बाबा 
करावीच लागेल 
नाहीतर चष्म्याआधी 
कंबरेला बेल्ट लागेल 

पन्नाशीतच गुडघे जर 
होणार नसतील फोल्ड 
काय करता अंगावरचं 
दहा तोळे गोल्ड ? 

डॉक्टर म्हणतील गुडघ्याची 
बदलून टाका वाटी 
नाहीतर घ्यावी लागेल 
हाता मधे काठी 

तुम्हीच सांगा रडकं तोंड 
कुणाला आवडत असतं 
दुःखी , कष्टी माणसा जवळ 
कुणीच बसत नसतं 

प्राणायाम केल्यामुळे 
चेहऱ्यावर तेज दिसेल 
म्हातापरणी सुद्धा माणूस 
हसत मुख दिसेल 



*भूतकाळात डोकावल्या शिवाय* 
*भूतकाळात डोकावल्या शिवाय* 
*मजा काही मिळत नाही* 
*मागे वळून पाहिल्यावर* 
*हसावं का रडावं कळत नाही* 

*साऱ्याच गोष्टी मधे* 
*खूप खूप बदल झाले* 
*पहिल्या पेक्षा प्रत्येकाला* 
*नक्कीच बरे दिवस आले* 

*खरं वाटणार नाही पण* 
*एवढं सगळं बदललं* 
*निगरगट्ट माणूस सुद्धा* 
*मुळा सकट हादरलं* 

*शाळेतून घरी गेल्या गेल्या* 
*दप्तर कोनाड्यात जायचं* 
*दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना* 
*बाहेर काढल जायचं* 

*अहो दप्तर म्हणजे काय* 
*वायरची पिशवी असायची* 
*जुन्या फाटक्या पुस्तका सोबत* 
*फुटकी पाटी दिसायची* 

*अभ्यास कर म्हणून कुणी* 
*म्हणलंही नाही* 
*अन मार्क कमी पडले म्हणून* 
*हाणलंही नाही* 

*कोणताही ऋतू असो* 
*काळपट चहा असायचा*👌 
*तडकलेल्या बशीवर* 
*कानतुटका कप दिसायचा* 

*बारा महिने अनवाणी पाय* 
*चप्पल म्हणजे श्रीमंती* 
*पायाला चटके बसायचे* 
*पण सगळ्या गावात हिंडायचे* 

*कुणाचं गुर्हाळ लागलं की* 
*चला रस प्यायला* 
*खळे दळे लागले की* 
*चालले शेतात झोपायला* 

*मरणाची गरिबी होती* 
*पण मजा मात्र खूप* 
*लग्ना कार्यात माणसं , नाती* 
*व्हायची एकरूप* 

*अमावस्येच्या दिवशी पोरं* 
*मारुतीच्या पारावर* 
*नारळाच्या टूकड्यासाठी* 
*एकमेकाच्या अंगावर* 

*ओ मामा द्या नं , ओ मामा द्या नं* 
*एकच गलका व्हायचा* 
*रेटा रेटी केल्यामुळं* 
*सदरा टरकून जायचा* 

*पाहुण्याला पाहुणचार म्हणून* 
*खिचडी भजे व्हायचे* 
*तेवढ्यातच सारयांचे* 
*डोळे भरून यायचे* 

*तेलच्या-गुळवणी आणि पापडांची* 
*काय मामलात होती* 
*तरीही त्या माणसां मधे* 
*माणुसकी होती* 

*रात्र रात्र गप्पा व्हायच्या* 
*डोळ्यात यायचं पाणी* 
*आडपडदा न ठेवता* 
*दुःखाची व्हायची गाणी* 

*कुठे गेला तो साधेपणा* 
*कुठे गेलं ते सुख ?* 
*खरं सांगा पहिल्या सारखी* 
*लागते का आता भूक ?* 

*इतकुसाक पेढ्याचा तुकडा* 
*मिडकू मिडकू खायचा* 
*कधी तरी कुणी तरी* 
*प्रसाद म्हणून द्यायचा* 

*सारं सारं संपून गेलं* 
*आता पैसा बोलत असतो* 
*माणूस मात्र भ्रमिष्ठा सारखा* 
*खोटं खोटं डोलत असतो* 

*पेढ्याच्या बाॅक्स कडे* 
*ढुंकूनही कुणी पहात नाही* 
*एवढंच काय पहिल्या सारख्या* 
*मुंग्याही लागत नाही* 

*सुखाचं बोट कधी सुटलं* 
*आपल्या लक्षात आलं नाही* 
*श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं* 
*तसं काही झालं नाहीे* 
*ते सुख आणि वैभव* 
*पुन्हा घरात येईल का ?* 
*चिरेबंदी वाड्या मधून* 
*हसण्याचा आवाज येईल का?* 


 माझ्या २०० चारोळ्या.... 

स्त्रियांना काय हवे असते 
सापडले उत्तर या प्रश्नाचे 
अधिकार हवे असतात स्त्रियांना 
त्यांचे निर्णय त्यांनीच घेण्याचे... 

मलाच आश्चर्य वाटते 
कसा तुझ्या प्रेमात पडलो 
जग माझ्यावर भाळते 
मी कसा तुझ्यावर भाळ्लो… 

समजू नकोस मला 
तुला पर्याय नाही 
माझ्या साऱ्या पर्यायात 
तू कोठेच नाही... 

एकशे आठ चारोळ्यांची 
माझी माळ तयार झाली 
माझ्या परम मित्रासाठी 
नववर्षाची भेठ तयार झाली... 

मूर्खांच्या बाजारात स्वतःला विकणे 
मला नाही जमत... 
त्यापेक्षा आवडते मला पडायला 
बुद्धिजीवी लोकांच्या चरणात… 

भल्या पहाटे तुला 
आठवून जाग आली 
स्वप्नातील माझी कविता 
आता वास्तवात आली… 

फक्त म्हण एकदाच 
माझे तुझ्यावर प्रेम आहे 
समज माझे आयुष्य 
तुझ्या प्रेमाला अर्पण आहे... 

ती म्हणाली मला 
तुझे प्रेम हवे 
मी म्हणालो तिला 
ते वाहून गेले... 

तिच्या आठवणीत मी 
आयुष्य काढले असते 
आठवणीतल्या तिने तसेच 
रहायला हवे होते... 

आठवावा एक क्षण 
तो फक्त दुसऱ्यासाठी जगलेला 
कारण आपण गेल्यावर 
तो क्षणच असतो उरलेला ... 

एक वर्ष सरले तरी 
आठवतोय एक क्षण आनंदाचा 
संकल्प होता माझा यावर्षी 
तो क्षण साजरा करण्याचा... 

प्रेम कोणीच करत नाही 
सारे त्याचे भांडवल करतात 
काही तर त्यांच्या अनैतिकतेलाही 
प्रेमाच्या नावावर नैतिक करतात... 

आधुनिकता कोणाच्याच पोशाखात नसते 
ती प्रत्येकाच्या विचारात असते 
विचार खरोखरच आधुनिक असतील 
तर नग्नतेतही सौंदर्य दिसते... 

दारू पिऊन काय मिळते 
हे पिणाऱ्याला माहीत नसते 
न पिणाऱ्याला तर ते 
न सुटलेले कोडे असते... 

आम्हाला जन्म दिला म्हणून 
आम्ही आमच्या बापाला दोष देतो 
आपल्या देशात आता कोणीही 
जनतेला पोर काढण्याचा सल्ला देतो... 

ती गांव तर 
मी शहर आहे 
दोघांच्या मधे भिंत 
फक्त विचारांची आहे… 

सुवर्णावर त्या 
काय प्रेम करायचे 
प्रेम करायचेच 
तर परिस शोधायचे... 

माझ्याशी बोलणारे 
माझ्या प्रेमात पडतात 
अबोल असणारे 
माझ्यावर प्रेम करतात... 

प्रेमात पडत नाही मी 
कधी विनाकारण स्वतःच्याही 
तुझ्या प्रेमात कसा पडेन 
तू अनोळखी असतानाही... 

तिसरीत पहिलीच्या प्रेमात पडलो 
सहावीत दुसरीच्या प्रेमात डुंबलो 
बारावीत तिसरीच्या प्रेमात बुडालो 
आता सवतीच्या प्रेमात अडकलो... 

कधी करणार मी 
माझ्या मनासारखे 
कधी उडणार मी 
मुक्त पक्षासारखे… 

माझ्या प्रेमाच्या 
आता चारोळ्या झाल्या 
माझ्या आयुष्याच्या 
आता कथा झाल्या... 

मित्र म्हणाला आता 
चारोळ्यांचे शतक कर 
काहीतरी तुझ्या आयुष्यात 
एकदाचे पुरे कर … 

आंधळे झालेत सारे 
डोळे असूनही 
सभोवतालचा अंधार त्यांना 
दिसत नाही... 

जातीची गरज मला 
कधीच भासली नव्हती 
समतेचा घोष करत 
मेंदूत भरली होती... 

संकल्प करण्यात 
माझे आयुष्य गेले 
गेलेल्या वर्षात 
आयुष्य संकल्प झाले... 

मी म्हणतो मला 
तुझ्यात फार रस नाही 
तुला पाहिल्या खेरीज 
मला जोश येत नाही ... 

मोठयांच्या चुकिला चूक 
न म्हणण्याची संस्कृती वाढतेय 
असेच होत राहिले 
तर कसली चूक कळतेय... 

तुझ्यासोबत घालविलेला एक क्षणही 
पुरेसा आहे मला जगण्यासाठी... 
मग कशाला वेचू मी 
माझे सारे आयुष्य तुझ्यासाठी… 

माझे प्रेम तुझ्यावरचे 
हे अक्षरासारखे आहे 
तुझ्या देहाचे काय 
ते नश्वर आहे... 

मतलबी दुनियेतला मतलबी प्रियकर 
मला कधीच व्हायचे नव्हते... 
तुझ्या आधुनिकतेच्या प्रेमात पडून 
प्रेमाचे बाजारीकरण करायचे नव्हते... 

प्रेमात पडावं अशा 
लाखो असतात 
पण साऱ्याच हृदयात 
राहत नसतात... 

जिच्या प्रेमात पडावं 
अशी ती एकच होती 
तिनेच मला घडवलं 
जी माझी प्रेरणा होती... 

तुला आता 
मी नाहीच सापडलो 
सापडलो तितकाच 
जितका पुरून उरलो... 

माझ्या यशामागे ती होती 
अपयशामागे कोण आहे 
कित्येक वर्षे मी वेड्यागत 
चोहीकडे शोधतो आहे... 

आमचे आवडते विषय 
भूगोल आणि इतिहास 
तिला भूगोल आहे 
आणि मला इतिहास… 

एका डोळ्यात निर्भयता 
दुसऱ्या डोळ्यात नम्रता 
दोन्ही डोळे मिळता 
आयुष्याची होते गीता... 

जग लहान दिसेल इतके 
मोठे मला व्हायचे नाही 
जग मान नकारेल इतके 
लहान मला रहायचे नाही... 

मी गुलाब आहे 
तुला प्रेमात पाडणारे 
तुला दिसलेच नाहीत 
माझे काटे टोचणारे... 

जेंव्हा कधी माझ्या 
वेळेची किंमत वाढते 
जवळ असणाऱ्या माझ्या 
माणसांची किंमत घटते... 

फक्त एक सही 
बाकी असेल करायची 
प्रतीक्षा असेल मला 
फक्त तुझ्या वहीची... 

एकच सेल्फी 
माझ्या स्वप्नात आहे 
ज्या सेल्फीत 
ती सोबत आहे... 

माझ्या कवितेपेक्षा 
चारोळी मोठी झाली 
हृदयात शिरून 
सरळ डोक्यात गेली... 

झालो असतो उद्योगपती 
कवींना नाही तोटा 
असत्या खिशात माझ्या 
त्या गुलाबी नोटा... 

भिंतीवर चित्र म्हणून 
लटकण्यात कसली मजा 
त्यापेक्षा पुस्तकाच्या कैदेत 
बरी भोगलेली सजा... 

तिला पाहता माझी नजर 
तिच्यावर किंचित स्थिरावते 
पाहून झाल्यावर तिचे सौंदर्य 
सुंदर !!! मन म्हणते... 

आकर्षणातून निर्माण होणारे 
प्रेम प्रेम नसते 
नदीकडून समुद्राला मिळणारे 
खरे प्रेम असते... 

पूर्वी स्त्री -पुरुष 
यांच्यात फक्त प्रेम होते 
आता प्रेम सोडून 
गाडी दागिने घर असते... 

कपड्याने झाकलेली आधुनिकता 
भोकातून बाहेर येते 
संस्काराने दबलेली वासना 
नजरेतून बाहेर येते... 

माझ्या विचारांचा 
तू विचार करू नकोस 
भांडी घास 
भांड्यात जीव गुंतवू नकोस... 

मी बोलून 
काहीच केलेले नसते 
मी केलेले 
जग बोलत असते... 

करोडो जन्मतात 
चौघात रमण्यासाठी 
एखादाच जन्मतो 
विश्वात रमण्यासाठी... 

माझा मित्र प्रेयसीला 
नेहमी गावठी म्हणतो 
त्याचे कारण विचारता 
बंदी आहे म्हणतो... 

माझी प्रेयसी 
चारोळी असते 
चार ओळीत 
मावणारी असते... 

माझ्या चारोळीचा प्रवास आता 
प्रेमातुन अध्यात्माकडे सुरु झाला 
माझे मित्र म्हणतील आता 
प्रेमवेड्याचा आध्यात्मिक गुरू झाला... 

मी तो नाही 
जो मी दिसतो 
मी जो दिसतो 
तो मी नाही.. 

माझ्या चारोळीतल्या गर्दीच्या शब्दातही 
माझ्या मित्राला मुंबई दिसली... 
खरंच माझ्या छोट्याशा मुंबईत 
आता इतकी गर्दी झाली... 

स्वार्थाचे अनेक रंग दिसले 
बदललेले आणि न बदललेले 
प्रेमाचेही अनेक रंग पाहिले 
पाहिलेले आणि न पाहिलेले 

तुला मी वर दिसतो 
तसा मी अजिबात नाही 
माझ्या मनाचा थांग अजून 
माझा मलाच लागला नाही... 

जग बदलण्याची ताकद राखणारे 
स्वतः कधीच बदलत नसतात 
जग नाही बदलले तरी 
ते जगणे सोडत नसतात... 

मला माहीत आहे 
मी तुला आवडतो 
पण आवडत नाही 
जसा मी जगतो... 

निरर्थक गोष्टींच्या मागे 
हल्ली जग धावत... 
धावून धावून थकलं 
कि सन्यास घेतं... 

सामान्य माणसे जगतात 
असामान्य माणसे झिझतात 
सामान्यांचे वाढदिवस होतात 
असमान्यांच्या जयंत्या होतात.. 

एक वर्ष संपणार आता 
एका संकल्पाचा बळी घेऊन 
दुसरे वर्ष उजडणार मग 
दुसऱ्या संकल्पा जन्मा घालून ... 

मूर्खांच्या बाजारात 
अक्कल विकली जाते 
अक्कल विकणाऱ्याला 
गाढव म्हटले जाते... 

अकल्पित जोड्या जुळतात 
या नश्वर जगात 
लोक उगाच बोट 
घालतात आपल्या तोंडात... 

तू माझ्या प्रेमात पडलीस 
यात नवल काही नाही 
मी तुझ्या प्रेमात पडलो 
हे कोणासाठी खरे नाही... 

माझ्या प्रेमात पडलेले 
प्रेमात पडलेले असतात 
प्रेमाच्या नादात प्रेमालाचा 
शिव्या घालत असतात... 

मी तिच्यात गुंतलो 
ती जगात गुंतली 
मी भविष्य झालो 
ती भूतकाळात रमली 

तुला डोळ्यासमोर ठेऊन 
मी चारोळ्या लिहिल्या 
प्रेमच्या काही बाजू 
मी नव्याने पाहिल्या... 

अंतर कितीही असले 
तरी कापता येते 
एकदा प्रेमात पडले 
की सारेच जमते... 

तू असलीस जरी 
माझ्या स्वप्नातील परी 
मला आवडते तरी 
माझी प्रेयसी खरी... 

तुझ्या मनात जे आहे 
ते माझ्या गावात नाही 
माझ्या मनात जे आहे 
ते कोणाला माहित नाही 

समजू नकोस माझ्या कविता 
ह्या फक्त तुझ्यासाठी असतात 
तुझ्यासारख्या कित्येक जणी रोज 
माझ्या कविता होत असतात... 

वाटलं नव्हतं स्वप्नात 
तू अशी असशील 
माझ्या अगोदर प्रवाहात 
तू आधुनिकतेच्या पोहशील... 

मोबाईलचा सिम काढून 
मेंदूत बसवावा लागेल 
नात्यांचे जगातील साऱ्या 
थडगे बांधावे लागेल… 

बेंबीच्या देटातुन ओरडणारे 
प्रेम प्रेम प्रेम 
का करतात प्रेमाचाच 
गेम गेम गेम ... 

भल्या पहाटे तुला 
आठवून जाग आली 
स्वप्नातील माझी कविता 
आता वास्तवात आली... 

तू जमिन 
मी रविकिरण 
भेटण्यास आलो 
घेऊन सुप्रभात... 

बोललो नाही कधी 
माझे तुझ्यावर प्रेम आहे 
माझ्यातील लबाड पुरुष 
प्रत्येक दिनी जागा आहे 

काळ चार चारोळ्या 
लिहताना घाम फुटत होता 
आज तुला आठविता 
चारोळ्यांचा पाऊस पडत होता... 

बस्स झाले आता 
तुझ्या प्रेमात पडणे 
मला हवे आहे 
माझे वास्तवातील जगणे... 

माझ्यातला कवी झोपला 
कि लेखक जागा होतो 
कवी स्वप्नात रंगतो 
लेखक वास्तवात जगतो 

आता माझे 
तुझ्यावर प्रेम नाही 
तू कोण 
मी जाणत नाही... 

माझ्यातला कवी 
फारच प्रेमळ आहे 
पण लेखक 
हिऱ्या सारखा आहे... 

यावर्षीचे माझे उरलेले प्रेम 
पुढच्या वर्षात जमा होईल 
त्यात तुझे प्रेम मिसळता 
नवीन वर्ष शुभ होईल... 

आकाशाला भिडणारे प्रेम 
आता कानाला भिडले 
हृदयात शिरणारे प्रेम 
मोबाईल मध्ये घुसले... 

मला मोठे व्हायचे होते 
पण फक्त तिच्या नजरेत 
मोठा झालो मी जगासाठी 
पण नालायक तिच्या नजरेत.. 

माझ्या चारोळ्या वाचा 
सहन करू नका 
नाही आवडल्या तरी 
छान म्हणू नका... 

वाटत नाही कोणाला 
मी प्रेमवेडा आहे... 
कारण प्रेमाने मला 
बोलताच येत नाही... 

माझी कविता रोज 
तरुण होत गेली 
माझे तारुण्य रोज 
थोडे चोरत गेली.... 

माझी कविता काळापलीकडे 
कधीच जात नाही 
तरी कोणतीच बंधने 
काळाची जुमानत नाही... 

माणसांच्या गर्दीत मला 
कधीच हरवायचे नव्हते 
गर्दीतला एक माणूस 
कधीच व्हायचे नव्हते... 

भूत भविष्य आणि वर्तमान 
आपल्या जागी स्थिर असते 
मी बदलत गेलो वेड्यासारखा 
ती मात्र तशीच असते... 

का घाबरते का थरथरते 
तुझे प्रेम माझ्या समोर 
माझे प्रेमच वादळ होते 
असता माझ्या तू समोर... 

करोडो चांदण्या जरी नभात 
असते एकच त्याच्या जवळी 
माझ्या सभोवताली त्या असतात 
मी असतो तुझ्या जवळी... 

फाटक्या कपड्यातून डोकावणारे 
सौंदर्य पहावे लागते 
फाटक्या हृदयातून सांडणारे 
प्रेम जमवावे लागते... 

माझी प्रेमाची व्याख्या 
फारच निराळी आहे 
राधा- कृष्णाच्या अगदी 
जवळ जाणारी आहे... 

आभाळ दाटून येते 
आकाश निरभ्र असते 
वासना दाटून येते 
प्रेम निरभ्र असते... 

मला घायाळ करण्यासाठी 
शेवटी अस्त्र वापरले... 
माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी तू 
तुझे सौंदर्य खुलवले... 

कविता कवी लिहतो 
कविता कवी वाचतो 
कविता कवी ऐकतो 
कविता कवी जगतो.. 

त्या कित्येकींच्या आनंदासाठी 
ती दुःखी राहिली 
त्या चारोळ्याच राहिल्या 
तिची कविता झाली... 

तुझ्यासाठी वाया घालविलेले 
दिवस आता कामी आले 
त्या दिवसांतील प्रत्येक तासाचे 
आता कवितेतील शब्द झाले... 

नैतिकतेच्या सीमा ओलांडून कधीच 
शिरलो असतो तुझ्या मिठीत 
पण संस्कार आणि विचार 
ठासून भरलेत माझ्या कुडीत..... 

माझ्यावर प्रेम करणारे 
हजार खरे आहेत 
तुझ्यावर प्रेम करणारे 
सारे लबाड आहेत... 

माझी वेदना आता 
माझीच झाली आहे 
माझ्या वेदनेची आता 
कविता झाली आहे... 

आदर्शांचे स्मारक असावे 
पण प्रत्येकाच्या हृदयात 
नाहीतर त्याच्या विचारांचे 
स्मारक होते चौकात... 

आदर्शांना आदर्श मानत 
लहानाचा मोठा झालो 
मोठा झाल्यावर मी 
आदर्शांचा आदर्श झालो ... 

नैतिकता आणि अनैतिकता यामध्ये 
अस्पष्ट रेषा असते 
त्या रेषेचे नाव 
दुर्दैवाने हल्ली प्रेम असते.... 

उगाच समजू नका 
मी प्रेमवेडा आहे 
प्रेम कशाशी खातात 
मला ठाऊक आहे ... 

प्रत्येक वर्षी संकल्प करतो 
फक्त तिच्याच प्रेमात पडण्याचा 
वर्ष संपता संकल्प असतो 
ती सोडून प्रेमात पडण्याचा... 

तुझ्या प्रेमात पडल्यापासून 
माझा शीघ्रकवी झाला 
फेसबुकवर माझ्या कवितांचा 
पाऊस सुरु झाला... 

आजही तुझी आठवण येता 
मला स्वतः वर हसू येते 
पण स्वतःवर हसत असताना 
मला तुझी आठवण येते... 

प्रेमभंग झालेल्या कित्येकांचा 
बऱ्याचदा देवदास होतो 
पण दारूला नाकारणाऱ्याचा 
फक्त कवी होतो... 

मी तिच्यावर प्रेम केले 
तिने माझ्या कवितेवर केले 
माझ्या कविता कामी आल्या 
पण प्रेम वाया गेले... 

कविता फक्त तुझ्यावर लिहिली 
बाकीच्यांची तर कथा झाली 
लेखांची तर तऱ्हाच निराळी 
माझ्या प्रेमाची निबंधे झाली... 

मी तुझी कविता 
तू चारोळी आहेस 
मी शब्दांचा सागर 
तू नदी आहेस... 

मला अडचण नाही 
तुला अडचण कसली 
बस आपल्या दोघांची 
एकच गरज भागली... 

तू हो म्हणाली असतीस 
तर मोठा झालो असतो 
मना विरुद्ध का होईना 
जगाच्या शर्यतीत धावलो असतो... 

दुसऱ्याचे भविष्य काही लोक 
का घडवू पाहतात... 
वर्तमानातही जर कित्येक गोष्टी 
क्षणा क्षणाला बदलतात... 

कोणाचे तरी 
व्हायचे 
त्यापेक्षा नाही 
जगायचे... 

मी प्रेम करतो तुझ्यावर 
तू करू नकोस... 
जगाच्या बंधनातून कधीच बाहेर 
तू पडू नकोस... 

मी यशाच्या धुंदीत असताना 
माझ्या प्रेमात पडू नको 
माझ्या यशात धुंद झालेली 
बेधुंद तू मला नको... 

कळत नाही तुला 
तू ढोंग करतेस... 
जगापासून चोरून 
माझ्यावर प्रेम करतेस... 

लोकांना इमारत दिसते 
पाया दिसत नाही 
लोकांना प्रेम दिसते 
मन दिसत नाही... 

मूर्खांनी माझ्या भानगडीत 
कधीच पडू नये 
शहाणे झाल्यावर होणारी 
अडचण भोगू नये... 

स्वप्ने पहावीत तर 
अपूर्ण राहणारी 
आळशी जगतात स्वप्ने 
पूर्ण होणारी... 

एकदा भेटू आपण पुन्हा 
तू काहीच बोलणार नाहीस 
तुझ्या डोळ्यात प्रश्न असतील 
पण काहीच विचारणार नाहीस... 

हल्ली कित्येकांना 
प्राण्यासारखेच जगायचे असते 
सुखे भोगत 
रोजच मरायचे असते... 

तुझ्या विरोधात 
माझा सूर असतो 
पण मी 
तुझ्या विरोधात नसतो... 

माझे एक अक्षर 
तुला कळणार नाही 
मी कळणे तुला 
जन्मात जमणार नाही... 

मी कळणे 
इतके सोप्पे नाही 
न कळताच 
वर गेले काही... 

का मरावे 
प्रेम करूनी तुझवरी 
माझ्या जगण्यावरही 
मरतात किती तरी... 

चिखलात उगवलेले कमळ 
दुर्दैवाने मी आहे 
माझे आकर्षण जगाला 
चिखल नको आहे... 

खूप विचार केला तुझा 
आता पुरे झाले 
तुझा विचार करता करता 
जग माझे झाले... 

मी तुझ्या प्रेमात पडावं 
अस तुझात काहीच नाही 
तरी तुझ्या प्रेमात पडलो 
आणि जगाचा राहिलो नाही... 

दगडातून एक सुंदर 
शिल्प घडवायचे होते 
काय माहित दगडात 
शिल्प असावे लागते... 

तू काय मला 
विकत घेणार आहेस 
किंमत माझ्या प्रेमाची 
काय लावणार आहेस... 

वाटले होते मला 
तू माझ्या प्रेमात पडलीस 
पण तू तर 
माझ्या प्रेमाची किंमत लावलीस... 

प्रेम नको माझे तुला 
जगातील सारी सुखे हवी... 
सुख सारे भोगल्यावर म्हणशील 
मला तुझी जागा हवी ... 

तुला अर्धे उगडे पाहिले 
माझे संस्कार नागडे झाले 
माझे डोळे मी मिटले 
तू मला नालायक म्हटले.... 

नको झाले मला जगणे 
आशेने तुला पाहात राहणे 
तुझ्यावर एकतर्फी प्रेम करणे 
आणि तुला ते नकळणे.... 

आता तुला कळेल 
मी किती मोठा आहे 
सारे जग आज 
का माझ्यावर फिदा आहे.... 

माझा सभोवताल सारा आता 
फक्त स्वार्थाने भरला आहे 
मी स्वार्थी होऊन आता 
तिच्या प्रेमात पडणार आहे..... 

माझ्या चारोळ्यांचा अर्थ 
तू लावत बसू नकोस 
प्रेम असेल तर 
सांगायला उशीर करू नकोस..... 

तुझ्या प्रेमात पडल्यावर 
माझ्यातील राजा जागा झाला 
त्यासोबत माझ्यात दडलेला 
लबाड पुरुष जागा झाला.... 

ती माझ्या कवितेला 
जन्म देऊन गेली 
ही माझ्या चारोळीचा 
जीव घेऊन गेली... 

लोकं माझ्या फालतू 
चारोळीच्या प्रेमात पडली 
जेव्हा माझी चारोळी 
तिच्या प्रेमात पडली.... 

तुझ्यासाठी माझे प्रेम 
एक मृगजळ आहे 
तुझ्यामुळे आता माझेच 
मुगजळ झाले आहे.... 

खरे प्रेम काय असते 
आता मला कळले 
जेव्हा माझ्या हातात करण्यासारखे 
काहीच नाही उरले... 

तुला का दोष देऊ 
मी तुझ्या प्रेमात पडलो 
मी माझे शहर सोडून 
तुझ्या गावात चोरून शिरलो... 

केले असते प्रेम मजनुसारखे 
दिवस रात्र तुझ्यावर 
पण माझे दिवस - रात्र 
कुर्बान झालेत जगावर... 

नैतिकतेच्या चौकटीत नबसणारे 
माझे तुझ्यावरील प्रेम आहे 
अनैतिकतेच्या चौकटी तोडणारे 
करायला माझ्याकडे बरेच आहे... 

व्यक्त झालो असतो तुझ्याजवळ 
पण मला भीती वाटते 
तू नाही म्हणालीस तर 
बदनामी असेल माझ्या जवळ... 

माझे पाय जमिनीवर असतात 
काही ते ही ओढू पहातात 
मग काय एक दिवस ते 
माझ्या प्रेमाने लाथा खातात.... 

मूर्खांना आज जग 
शहाण म्हणत... 
म्हणूनच आजच्या जगात 
मूर्खांच फावत... 

कसला बाप 
कसली आई 
जग झाले 
सारे मतलबी.... 

मी बोलत नाही 
म्हणजे मला बोलता येत नाही 
मी बोललो तर 
ते जगाला रुचणार नाही.... 

जगाकडे प्रश्न असतात 
माझ्याकडे फक्त उत्तरे 
जगाकडे समस्या असतात 
माझ्याकडे त्यावरील उतारे..... 

मूर्ख पाहतात मला 
त्यांच्या नजरेतून 
शहाणे पाहतात मला 
माझ्या नजरेतून.... 

शांती हवी मला 
अशांत मनासाठी 
एकांत हवा मला 
माझ्या आनंदासाठी.... 

स्वार्थी जगात या 
सारे आता स्वार्थाने भरले 
ज्याला माझे म्हणावे 
असे कोणीच नाही उरले.... 

प्रत्येकाने आपलाच स्वार्थ जपला 
प्रत्येक आपलाच स्वार्थ जगला 
माझ्यातला माणूस जागा राहिला 
म्हणून माझाच बळी गेला..... 

तू अशिक्षित नसतीस 
तर किती बर झालं असतं 
माझ्या जगण्याला आज 
एक वलय प्राप्त झालं असतं.... 

काही हिशोब चुकते करायचेत 
ते झाले एकदाचे 
कि जगातील सारे बंध 
एकदाच तोडून टाकायचे..... 

नाही जगायचे मला बंधनात 
ना हिच्या ना तिच्या 
ना जगाच्या ना समाजाच्या 
ना बापाच्या ना आईच्या.... 

आता मी कोणाचेच 
काही ऐकणार नाही 
जो घडवेल मला 
त्याला सोडणार नाही... 

जगाला का वाटते 
मला काहीच कळत नाही 
मला सारे कळते 
म्हणूनच मी बोलत नाही..... 

मी हि प्रेमात पडलो 
पण कधीच स्वार्थी झालो नाही 
माझे प्रेम सोडले मी 
पण कर्तव्यात कमी पडलो नाही... 

सारड्यांच्यात रहातो मी 
रंग बदलणाऱ्या 
स्वार्थाचेही रंग स्वार्थासाठी 
सहज बदलणाऱ्या.... 

मला माणसे वाचता येतात 
त्यांच्या डोळ्यात पाहून 
ती बोलता मी पाहतो 
त्यांच्या मनात डोकावून.... 

माझ्या वेळेची किंमत 
अजून ठरली नाही 
ती ठरता कोणा 
देणे जमणार नाही... 

माझी सारी संपत्ती 
माझ्या सोबत आहे 
मी जिथे आहे 
तिथेच लक्ष्मी आहे... 

सभोवतालच्या मूर्खांना मी म्हणालो 
आता माझा पाठलाग सोडा 
मी कधीच काळापलीकडे गेलोय 
आता तरी बंध तोडा ... 

अज्ञानी माणसात राहून 
माझे ज्ञान अज्ञान झाले 
अज्ञान वाढत गेले 
आता ज्ञानाचा सागर झाले..... 

बोलत नव्हतो मी 
आता फक्त मी बोलणार 
बोलणारे जग आता 
फक्त मी बोलताना ऐकणार..... 

मी तो दिवा आहे 
ज्याच्याखाली अंधार असतो 
जगाला प्रकाश देतो साऱ्या 
स्वतः अंधारात असतो.... 

एका क्षणात तुझ्या 
प्रेमात पडलो होतो 
दुसऱ्या क्षणात मी 
तिच्यात रमलो होतो.... 

एक सकाळ गेली 
दुसरी पहाट झाली 
सकाळ रोज होते 
आज पहाट झाली... 

सुटत नाही एक कोडं 
मला याच जन्मीचं 
खरंच असतं काही नातं 
आपलं कोणाशी गतजन्मीचं... 

तू माझ्या प्रेमात पडणे 
हे नैसर्गिक होते 
मी तुझ्या प्रेमात पडणे 
माझ्यासाठीही अकल्पित होते.... 

तू माझ्या आकर्षणाचा 
विषय नाहीस 
तरी माझ्या मनातून 
जात नाहीस... 

तू तर बोलणार नाहीस 
मी ही बोलणार नाही 
आपले प्रेम अबोल राहणार 
कोणाला कधीच कळणार नाही... 

तू माझ्या हृदयात 
कोणत्या भोकातून शिरलीस 
कि अजून त्यातून 
बाहेर नाही पडलीस... 

तू मृगजळ माझ्यासाठी 
मी वेडा तुझ्यासाठी 
जग धावेल तुझ्यासाठी 
मी धावेन जगापाठी... 

जगायला निमित्त भेटले 
तुझ्या प्रेमात पडण्याचे 
नसती भेटलीस तू 
जीवन संपले असते... 

माझे तुझ्या प्रेमात पडणे 
म्हणजे माझ्यात प्रेम जागणे 
प्रेमातच तुझ्या आता मरणे 
जमले तर तुझ्याशिवाय जगणे... 

काही जन्मतात जगण्यासाठी 
काही जन्मतात मरण्यासाठी 
मी जन्मलो तुझ्यासाठी 
फक्त तुझ्यावर मरण्यासाठी... 

तुझी किंमत जगाला 
कधीच कळणार नाही 
तुझ्याकडे जग माझ्या 
नजरेने पाहणार नाही... 

तुझ्यावर चारोळ्या लिहिल्या मी 
अशी कशी तू 
एक ओळ वाचली नाहीस 
अशिक्षित कशी तू ... 

भ्रम आहेस तू 
माझ्या कल्पनेतला 
वास्तव आहेस तू 
असून नसलेला... 

माझ्या जवळ असतानाही 
तू माझ्यापासून दूर होतीस 
माझ्या विचारात होतीस 
पण माझा विचार नव्हतीस ... 

तू माझी होणार नाही 
मी तुझा होणार नाही 
तू झालीस दुसऱ्याची तरी 
मी दुसरीचा होणार नाही... 

प्रतिभा होती 
कविता होती 
कथा होती 
ती होती... 

प्रेमात मी हजारदा पडलो होतो 
पण प्रत्येकवेळी सावरलो होतो 
आता कदाचित मी सावरणार नव्हतो 
नव्याने प्रेमात पडणार नव्हतो... 

मी चारोळ्या कोणावर लिहल्या 
कधी कोणाला कळणार नाही 
चुकून कळलच कोणाला तर 
तो जगाला सांगणार नाही... 

प्रेमात पडावं तर 
जमिनीने आकाशाच्या 
मी तुझ्या तर 
नदीने समुद्राच्या... 

सारं समजून उमजून मग 
काही प्रेमात पडतात 
मला वाटत ते फक्त 
जीवनाच गणित मांडतात... 

कोण म्हणत तू वेडी आहेस 
कोण म्हणत तू भोळी आहेस 
कोण म्हणत तू मूर्ख आहेस 
कोण म्हणत तू माझी आहेस... 

कल्पनेच्या जगात शिरलो 
तिच्या प्रेमात पडलो 
वास्तवातील तिला विसरलो 
चारोळ्या लिहित गेलो... 

दोनशे चारोळ्या लिहिल्या 
माझ्या कल्पनेतील प्रेमावर 
वास्तवात ती नाही 
करायला प्रेम माझ्यावर... 

© निलेश बामणे 



 *सावधान* 
चोरांवर आता दरोडेखोरांचा 
पहारा आहे 
सीतेस आता द्रोपदीचे 
आव्हान आहे !! 

आता नाही राहिला राम 
ना राहिला लक्ष्मण 
सत्तेसाठी साठमारी करणारे 
घरभेदीच खुप आहेत !! 

निष्ठेच्या घेऊन आणाभाका 
रात्रीत परक्याशी घरोबा 
सती सावित्रीच्या तो-यात 
मिरवते बाई नखरेल !! 

नोटांचीच शेज आहे 
तिथे नितीमत्ता फेल आहे 
पोपट पिंज-यात बंद आहे 
कावळ्यांस मोकळे रान आहे !! 

मोकाट सुटले लुटारू आता 
निवडणुकीचा हंगाम आहे 
दरोडेखोरांनी घेतला आता 
कर्णाचा अवतार आहे !! 

खाटीकही आता बोलुन लागतील 
भूत दयेवरती काही बाही 
मदिरेची आता चांदी आहे 
कोंबड्या बोकडांची खैर नाही !! 

गाव सारे लुटण्याला 
5 वर्षांचा वाव आहे 
रवंथ करून खाता खाता 
गब्बर ते होणार आहेत !! 

नंतर तुमचीच पाळी आहे 
दुष्काळच दुष्काळ येणार आहे 
माणुसकीचा खून पाडून 
समाज सेवक अवतरणार आहेत !! 

निवडणुकीचा काळ आहे 
तो असाच सोकावणार आहे 
लोकशाहीच्या नावाने 
झुंडशाही येणार आहे !! 

दिलीप मालवणकर 


 || राजे || 
======

 मुजरा करतो राजे, 
आसनस्थ व्हा.. 
बेकितल्या एकीचा 
आपला महाराष्ट्र पहा.. 
तो मावळा पहा 
किती जोशात जयजयकार करतोय 
तो तिथीचा भक्त दिसतोय.. 
आणि तो पहा दुसरा 
मागून नाक मुरडतोय 
बहुतेक तारखेचा सक्त दिसतोय..!! 

आपलेच भक्त आहेत सर्व 
मात्र मतभेदाने बिथरलेले.. 
लाटेवरचे स्वार सारे 
इतस्त: विखुरलेले.. 
जसे विखुरले होते कधी 
तुमच्या काळात 
निजामशाहीत, त्या मुघलशाहीत 
तसेच आहेत अजूनही 
पक्षशाहीत 
एकमेकांच्या जीवावर उठलेले..!! 

तुम्ही नव्हता दिला कधीच, 
थारा कोणत्या जातीला.. 
जमविला 
एक एक मावळा निष्ठावान 
अन साद घातली 
महाराष्ट्राच्या ऐक्याला.. 
अशक्य ते शक्य 
तुम्ही करून दाखविले राजे 
अटकेपार भगवा फडकला.. 
मराठेशाहीचा इतिहास गौरवशाली 
सुवर्णाक्षरांनी लिहला गेला..!! 

आता 
त्याच इतिहासाची पानं उगाळून 
आजचा मावळा 
तुमच्या नावाचा चंदन टिळा 
आपल्या रंगात मिसळून 
आपापसात 
माथ्यावर लावून घेतोय.. 
दरी रुंदावत चाललीय 
ऐक्याची 
उभा महाराष्ट्र विस्तवावर चालतोय 
पण 
दखल कोण घेतो 
अवघा महाराष्ट पहा 
तुमच्या जयजयकाराने दुमदुमतोय..!! 
*****सुनिल पवार...✍🏽 



 *नको मज* नको मज कॅडबरी 
नको मज चॉकलेट 
फक्त माझं यावं 
कवितांच बुकलेट 

नको मज बंगला 
नको मज गाडी 
तरंगुदे काव्याच्या समुद्रात 
माझ्या कवितांची होडी 

नको मज सकाळ 
नको मज रात्री 
फक्त राहूदे माझी 
कवितेंसोबतची मैत्री 

नको मज घड्याळ 
नको मज गेम 
फक्त मज द्या 
एक लिहायला पेन 

नको मज जमीन 
नको मज आभाळ 
तुमच्या मनात जागा द्या 
असेल तो कवितेंचा सुवर्णकाळ 

नको मज प्रसिद्धी 
नको कोणते पुरस्कार 
फक्त मिळूदे कवितेला 
प्रेक्षकांच्या प्रेमाची धार 

:-साई कुमावत 


राजे !!! तुम्ही पुन्हा जन्माला या 

जातीपातीच्या राजकारणात 
विचार स्वातंत्र्याने घालतो राडा 
माणूसकीलाच मातीत गाढून 
नेहमीच करतो रक्ताचा सडा 
राजे! पुन्हा एकदा माणुसकीचा 
धडा आम्हाला द्या ना ? 
राजे!! खरंच एकदा तुम्ही 
पुन्हा जन्माला या ना? 


आपण स्त्रीचा आदर करून 
मिळवुन दिला सन्मान 
तीच परंपरा विसरलोय आम्ही, 
आज घरात, कुत्च्छितपणे वागवून, 
करतो ससत तिचा अपमान, 
तिची गरज, तिचे महत्त्व आज 
आम्हाला पुन्हा पटवून द्या ना? 
राजे!! खरंच एकदा तुम्ही 
पुन्हा जन्माला या ना? 


धर्म पंत तुमच्यापाई नतमस्तक होते, 
विविधतेत एकतेचे पोवाडे गात होते, 
जीवा, तानाजी, नूरखान,मदारी 
शत्रूवर तुटून पडत होते, हीच, 
सर्व धर्म समभावाची शिकवण, 
तुम्ही आज आम्हाला द्या ना? 
राजे!! खरंच एकदा तुम्ही, 
पुन्हा जन्माला या ना? 


दिन दुबळे ,अबाल वृद्ध, वंचित 
बदलले आपण त्यांचे संचित 
आम्ही मात्र स्वार्थासाठी खटपट 
करत असतो, 
समाजभानच विसरुन आपसातच 
भांडत बसतो 
वसुधैव कुटुंबकम् शिकवण आपली 
पुन्हा एकदा रुजवून द्या ना? 
राजे!! खरंच एकदा तुम्ही, 
पुन्हा जन्माला या ना? 

सौ. राही कदम (फपाळ) 
सोनपेठ, परभणी 


 महाराज 
*********************** 
मुजरा महाराज... 
त्रिवार शतवार मुजरा ...!! 
वाघिनीच्या छाव्याला.. 
सिहाच्या प्रतिरुपाला.. 
आणि 
स्वराज्याच्या उद्गात्याला 
एका कर्मवादीनीचा.. 
वाघिनीच्या शक्तिचा.. शतवार मुजरा...!! 

आत्यंतिक अभिमान,प्रेम 
आदर आम्हाला तुमचा.. 
तुमच्या कर्तुत्व कर्मठ , 
नेतृत्वाचा 
नख शिखान्त सम्मान...!! 

तुम्ही गेलात महाराज 
किती काळ लोटला...!! 
आमच दुर्भाग्य की 
तुमच सद्भाग्य महाराज...?? 
आम्हाला परत राजाच 
नाही भेटला...!! 

कर्तुत्व वानाच कर्तुत्व 
शीलवानाच शिलत्व 
दांन विराच दातृत्व 
कर्म वीराच कर्मत्व 
धारमा वीराच धर्मत्व 
नीति वानाच नितित्व ... 
आम्ही कधी अंगिकार तच नाही 
कृतितील सतीत्व स्विकारतच 
नाही...!! 

आम्हाला फ़क्त सवय लागलीय 
आम्हला फक्त वेड लागलय.. 
या दिव्य व्यक्तित्वांच 
व्यक्तित्व सिमित करण्याच..!! 
त्याना फक्त तसबीरी, प्रतिमा,घोषणा,मुर्त्या आणि 
जयंत्या, पुण्यतिथित पूजण्याच...!! 

महाराज शिवाजी ग्रेट ग्रेटेस्ट 
होता,आहे,व् राहणार..!! 
त्रिकाल बाधित निर्विवाद सत्य...!! 
डी जे ,नृत्य,दारु,लाउड स्पेकर 
आणि डेकारेशन बघायला... 
शिवाजी कुठे हो येणार..?? 

तुम्ही तर तदनंतर किती 
जन्म घेतले असतील 
महाराज...?? 
किती कर्तुत्व केले असतील..?? 
शिवाजीच्या कोशातून 
कधी बाहर येणार हे लोक..?? 

इतिहास पुजावा पण किती..?? 
प्रतिमा पूजाव्या पण किती..?? 
व्यक्ति पूजा झाली की 
आदर्श,सिद्धांत,कर्तुत्व 
यांची किमत काडी मोल होते..!! 

शिवाजीचे हजार शिष्य 
शिवाजी झाले पाहिजे..!! 
कर्तुत्व शिकवायला या च 
महाराज..!! 
84 जन्म घ्यावेच लागतात हो..!! 
या कलियुगास दिशा देण्यास या..!! 

आडम्बर आणि थोतांड़ 
कर्मकांडच व्यवधान 
जय जयकाराचा टाहो.. 
आता जिव घेताय महाराज..!! 

कुठे तरी समस्त समाज 
कर्म शून्य होत चाललाय..!! 
थाम्बवा तुम्हीच .. 
महाराज...!! 

वृषाली सांनप 


 *नवरा म्हणजे कोण ?* 

जे आहे ते सारं 
तुझंच म्हणत 
सगळं 
स्वतःच्या नावावर ठेवणारा! 

*नवरा म्हणजे कोण?* 

मी तुझा गुलाम म्हणत 
सगळी कामं करवून घेणारा.. 

*नवरा म्हणजे कोण?* 

तुझ्या हाताला 
आईसारखी चव नाही 
म्हणत फर्माईशी करणारा! 

*नवरा म्हणजे कोण?* 

तू म्हणशील तसं करु 
म्हणत 
अंतीम निर्णय देणारा! 

*नवरा म्हणजे कोण?* 

रविवारभर टी.व्हीसमोर लोळून 
सुट्टी साजरी करणारा... 

*नवरा म्हणजे कोण?* 

स्वतःची ढेरी नजरेआड करुन 
बायकोचा बांधा सुटलाय म्हणणारा! 

*नवरा म्हणजे कोण* 

*मी बायकोला* 
*घाबरून आहे दाखवत* 
*तिला शेंड्या लावायची* 
*संधी शोधणारा!* 

*नवरा म्हणजे कोण?* 

उधळलेल्या वारुला जणू 
लग्नाचा लगाम घातलेला. 

*नवरा म्हणजे कोण?* 

*पदरी पाडून पवित्र* 
*मानून घेतलेला....* 


😏😜 



*📚माझी चारोळी: बंधन* 
➖➖➖➖➖➖➖➖ 
*बंधन असावे स्वेराचाराला 
बंधन असावे वाईट विचारांना 
बंधन असावे पिसाट नजरेला 
बंधन असावे निर्लज्ज मनाला 


बंधन हे प्रेमाचे 
राखीच्या रेशीम गाठीचे 
भावनेने समजनारे 
बहिण-भावाचे अतुट बंधन 

बंधन नकोत मुक्तांगनाला 
बंधन नकोत शिक्षनाला 
बंधन नकोत कर्तव्याला 
बंधन नकोत समविचारांना 

प्रीतीचा रंग कोनता 
कोनालाच कलेना 
प्रीति ज्याला कलली 
त्याला बंधनेही कलेना 

नको नको म्हनताना 
आठ्वनी येतात 
पापन्यांची बंधने सोडुन 
मग अविरत वहात असतात 

बंधना पलीकडचे 
असत एक नात 
कदाचित त्यालाच 
नाव असावे मीत 

माधुरी फालक पालघर 


 *आता मी पाहुणी आहे*.... 

मंगळसुत्र आणि जोडवे 
या सगळ्यांमुळे नाही.. 
तर भरलेल्या बॅगमुळे 
परके वाटते.. 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते.. 

आई म्हणते अगं 
हे बॅगमध्ये लगेच भर 
नाहीतर जाताना विसरशील, 
प्रत्येकवेळी काहीना काही विसरते.. 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते.. 

माहेरी येण्याआधीच 
परत जाण्याच्या बसचे 
तिकीट बुक असते, 
किती जरी सुट्टी असली 
तरी ती कमीच पडते.. 
वाळुसारखी माहेरपणाची 
वेळ निसटून जाते.. 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते.. 

आता परत कधी येणार ? 
हा सगळ्यांचा प्रश्न ऐकून 
वाईट वाटते, 
मन आतल्या आंत रडू लागते.. 
मग जबाबदारीची जाणीव होऊन 
पुन्हा शहण्यासारखे वागते.. 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते.. 

माझ्या माहेरच्या खोलीचा 
कोपरा अनं कोपरा 
फक्त माझा आणि 
मी म्हणेल तसा असायचा 
पण आता पंखा आणि 
दिवा लावताना सुद्धा 
बटणाचा गोंधळ उडतो.. 
प्रत्येक क्षण आता 
मी पाहुणी आहे 
हे जाणवुन देतो.. 

आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते.. 

शेवटच्या दिवशी घरातुन निघतांना 
आईच्या डोळ्यात मी बघूच शकत नाही 
कारण तसं केलं तर कधीच 
मी जाऊ शकणार नाही.. 
मग तसंच पाणवलेले डोळे 
आणि गच्च भरलेली बॅग घेवून 
बसमध्ये बसावे लागते, 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते.. 

४ दिवसांची माहेरपणाची सुट्टी 
संपलेली असते.. 
पाहुणचार घेऊन पाहुण्यासारखे 
आपापल्या घरी जावे लागते.. 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते.. 

आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते.. 
Dedicated to all women's 



 💧 *22 मार्च हा "जागतिक जलदिन"* 💧 


💧 *जल प्रतिज्ञा* 💧 

मी प्रतिज्ञा करतो की, 
पाणी हे जीवन असून, 
त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन. 
मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही. नेस्रगिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन. 
पाण्यविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन. 
पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकि मानून त्याचे सदैव पालन करेन. 

जय हिंद! जय महाराष्ट्र ! ! 

💧 *"पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिर्ती"* 💧 

💧💧💧💧💧💧💧



 *पानी आकाश से गिरे तो........बारिश,* 

*आकाश की ओर उठे तो........भाप,* 

*अगर जम कर गिरे तो...........ओले,* 

*अगर गिर कर जमे तो...........बर्फ,* 

*फूल पर हो तो....................ओस,* 

*फूल से निकले तो................इत्र,* 

*जमा हो जाए तो..................झील,* 

*बहने लगे तो......................नदी,* 

*सीमाओं में रहे तो................जीवन,* 

*सीमाएं तोड़ दे तो................प्रलय,* 

*आँख से निकले तो..............आँसू,* 

*शरीर से निकले तो..............पसीना,* 

*और* 

*प्रभु के चरणों को छू कर निकले* *तो.........................चरणामृत* 

[ *व. पु. ची अशीच एक भन्नाट कविता ---* 

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं 
आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत, 
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं 
घरादाराला कधीही ’लॉक'  नव्हतं.. 
तरीही माझ् जीवन सुखाचं होतं ||१|| 


आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होतं 
स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत, 
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होतं 
आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं.. 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||२|| 


घरासमोर छोटंसं अंगण होतं 
तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं, 
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होतं 
विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ३ || 


आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, 
माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा, 
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- 
दगडाने अंग घासणं फ़ारसं सुसह्य नव्हतं 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ४ ॥ 


पायात चप्पल असणं सक्तीच नव्हतं 
अंडरपॅट बनियनवर फ़िरणं जगन्मान्य होतं 
शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं 
मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहन नव्हतं.. 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ५ ॥ 


शाळेत गुरुजनांप्रती आदर होता 
घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता, 
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता 
छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं.. 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ६ ॥ 


शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, 
नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता, 
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता 
कलांना "भिकेचे डोहाळे" असंच नाव होतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ७ ॥ 


नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा 
पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,  
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकडूनच मिळायचा 
तिन्हीसांजेला घरी परतणं सक्तीच होतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ८ ||  


वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या 
पोपटांचा थवा झाडावर विसावायचा, 
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा - 
उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्य राज्य होतं.. 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ९ || 


पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे 
घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे, 
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - 
नॉनवेज खाणं हे तर माहितीच नव्हतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १० || 


शाळेत अभ्यासाला खूप महत्व होतं 
नंबरावर बक्षीस/छड्या यांचं प्रमाण ठरत असतं, 
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हतं 
वशिल्याने पास होणं माहितीच नव्हतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ११ || 


गावची जत्रा  हीच एक करमणूक असायची - 
चक्र-पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,  
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची 
विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १२ || 


गावाबाहेरच जग हिरवागार असायचं 
सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचं,  
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं, 
प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १३ || 

   

हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा 
क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या, 
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या 
डे-नाईट, ट्वेंटी- २० चं नावही नव्हतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १४ || 


प्रवास झालाच तर एस्टीनेच व्हायचा 
गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा, 
हॅन्डल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा 
लक्झरी, फर्स्टक्लास एसीचं नावही नव्हतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १५ || 


दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी होती 
चमनचिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती, 
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती 
लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होतं.. 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १६ || 


जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची 
बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची, 
रेडीओ सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची 
ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १७ || 


खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा 
दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा, 
पानात टाकणाऱ्याच्या पाठीत रट्टा बसायचा 
हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १८ || 


मामाच्या गावाला कधी जाणं-येण होतं 
धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होतं, 
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं 
भाऊबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १९ || 


घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे 
बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे, 
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचं 
प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || २० || 


पाव्हणे रावळे इ.चा घरात राबता असायचा 
सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा, 
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा 
पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं, 
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || २१ ||   


आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लॅट आहे 
मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,  
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दणदणाट आहे 
फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे, 
कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ || 


आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत 
दूध, बूस्ट, काॅम्प्लानचा भरपूर मारा आहे, 
क्लास, गाईड, कॅल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे 
कपडे, युनिफोर्म क्रीडासाहित्य हवे तितके आहे, 
बालकांच्या नशिबी मात्र  पाळणाघर आहे || २३ || 


आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे 
सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे, 
एक्स्ट्रा ऐक्टीविटीजना घरात सन्मान आहे 
छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे, 
आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ || 


आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे 
मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे, 
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे 
सध्या बाय वन गेट वनचा जमाना आहे.. 
म्हणून 
पैशांवर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ || 

 ती म्हणते चुकलेच माझे 

 ती म्हणते चुकलेच माझे 
तेव्हा हो म्हणून गेले. 
तो म्हणतो होकार देताना 
डोके शेण खायला गेले 
आता त्यावर इलाज नाही 
तेराला तिनाने भाग जात नाही ||१|| 

तो म्हणतो मूर्ख तिला 
ती त्याला बावळट म्हणते 
संध्याकाळी तो गजरा आणतो 
ती आवडीची भाजी करते 
रात्रीचा झालेला तह 
सकाळपर्यंत टिकत नाही 
तेराला तिनाने भाग जात नाही ||२|| 

त्याची आई खडूस अन 
तिची आई जहांबाज असते 
दोन्ही आजोबा आजींवर 
मुलांचे मात्र प्रेम असते 
संस्कार सुटत नाही, 
नाते देखील तुटत नाही 
तेराला तिनाने भाग जात नाही ||३|| 

कधीतरी कणव येते 
एकमेकांच्या कष्टांची, 
जोडीने लढतात मग 
आलेल्या संकटाशी 
विजयाचे श्रेय कोणाचे 
हा वाद कधी संपत नाही 
तेराला तिनाने भाग जात नाही ||४|| 



 🖊✏📝🖊✏📝🖊✏📝🖊 
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. 
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय 
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय... 

🖍🖍🖍🖍🖍🖍🖍 
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर 
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय 
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. 
मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन 

🖊🖍🖊🖍🖊🖍🖊 
नळाखाली हात धरून पाणी प्यायचय, 
🖍🖊🖍🖊 
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या 
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय 
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय, 
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. 

🖊🖍🖊🖍🖊🖍🖊 
उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का? 
हा विचार करत रात्री झोपी जायचय, 
🖊✏🖊✏🖊 
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी, 
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. 

✏🖍✏🖍✏🖍✏ 
कितीहि जड असु दे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा 
दप्तराचं ओझ पाठिवर वागवायचय, 
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऑफ़िसपेक्षा 
पन्खे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय, 
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा 
दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय 
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.👌👌🙏

      मी नव्या युगाची सबल नारी || 
मी नव्या युगाची सबल नारी || 
नको कुबड्या सहानभुतीच्या 
मज हवे अधिकार समतेचे 
भेद न कोणता नजरेत माझ्या 
मी हृदय विशाल ममतेचे..!! 
नको बंधन संकुचित चौकटीचे 
मज हवे आकाश मोकळे 
प्रिय मजला माहेर, सासर दोन्ही मी मानते सर्वांस आपले ...!! 
नको नुसते देव्हारे मढवलेले 
मज हवेत प्रकाशित गाभारे 
भिडवीत खांद्यास खांदा तुमच्या 
मी चालते सक्षम स्व: आधोर...!! 
नको केवळ भाट आसपास 
मज हवी बैठक विचारी.. 
कशास पत्करावी तो लाचारी 
मी नव्या युगाची सबल नारी...!! 

एका क्षणाची पत्नी तू, अनंत काळाची आई

एका क्षणाची पत्नी तू, अनंत काळाची आई 
पण चूल आणि मुल यातून बाहेर पद ग बाई 

रिकाम मन म्हणजे, सैतानाच घर 
चिंतेचा डोंगर, डोके काढी वर 
वेळेची किंमत जाण ग बाई 
चूल आणि मुल यातून......... 
घर दार म्हणजे तारेवरची कसरत 
स्वत:ची ओळख, गेली तू विसरत 
स्वत:च्या कर्तुत्वाला न्याय ते माई 
चूल आणि मुल यातून........ 
तू झालीस हुशार तर काळोख होईल पशार 
तेजोमय किरणांचे, बरसतील तुषार 
बंधनाचे पाश आता तोड ग ताई 
चूल आणि मुल यातून...... 
उद्योगाच्या क्षेत्रात संकारते वीणा 
एकमुखान स्त्रीला सबला म्हणा 
कधी आशेची राणी तू, कधी झाली सिंधू ताई 
चूल आणि मुल यातून....... 
टीव्ही समोर बसून आपण श्रीमंत घेतील तारे 
बाहेर पडल तर द्याल उद्योगाचे नारे 
जग चालल पुढे आला कर ग घाई 
चूल आणि मुल यातून..... 
स्त्री काय आहे? 
स्त्री काय आहे? 
मानल तर पत्नी, अर्धांगिनी 
नाहीतर भोगवस्तू 
क्षणिक सुखाची सखी ती 
स्त्री काय आहे? 
सासू-सासऱ्यांची सून ती 
हुकमाचा ताबेदार ती 
कठपुतलीबाहुली ती. 
स्त्री काय आहे? 
वात्सल्यसिंधू आई ती 
अपराध पोटात घालणारी मायती 
वृद्धाश्रमातून आशीर्वाद देणारी ती 
स्त्री काय आहे? 
संसाराच्या सिनेमांची नायिका 
संसाराच्या सिनेमाची दिग्दर्शिका 
पडद्यामागची कलाकारही तीच 
स्त्री काय आहे? 
नात्याचं जाळ विवणारी कलाकार 
संसाराच्या राशीपाटावरची सोंगटी 
संसाराच्या सापशिडीतील शिडी 
सगळ्या आव्हानांना तोंड देऊन, 
संसाराचा ‘गो मस्ट गो ऑन’ 
म्हणून चालवणारी ती स्त्री 
उंबरा असेल तर त्या दरवाज्याला अर्थ आहे|| 
दरवाजाच्या आत ती नसेल तर ते घर सुद्धा व्यर्थ आहे|| 
नुसता शुभेच्छांचा वर्षाव बाई गं ... तू अशी तू तशी पण 
एकही जण असं म्हणत नाही आज तू जाऊनको चुलीपाशी !! 



मी आहे अशीच मैत्री करणारी 

होय अशीच आहे मी ... 
उसळणार या लाटांसारखी 
स्वच्छंद फुलपाखरासारखी 
खळखळत्या पाण्यासारखी 

थोडीशी वेडी थोडीशी हळवी 
म्हटले तर प्रेमळ 
म्हटले तर स्वच्छ मनाची 
स्वत:वर प्रेम करणारी 
नेहमी मैत्री जपणारी 

देवाने निर्माण केलेली अजब 
रसायन आहे मी 
अशीच आहे मी 
अशीच आहे मी 


मी आहे अशीच मैत्री करणारी 

मैत्रीसाठी वाट्टेल ते करणारी 

प्रत्येकमित्र आणि मैत्रिणींचा विश्वास जपणारी 

आयुष्यभर घट्ट मैत्रीची साथ निभावणारी 



मी आहेच अशी सतत बोलणारी 

मित्रमैत्रिणींना नको ते प्रश्न विचारणारी 

प्रश्न विचारून त्यांना सतावणारी 

उत्तरे सांग म्हणून तगादा लावणारी 



मी आहेच अशी मस्त जगणारी 

आपल्यातच आपलेपण जपणारी 

पण इतरांच्या आनंदासाठी स्वत:लाही विसरणारी 



मी आहेच अशी 

मनासारखं जगणारी 

यशाचे शिखर पढताना हात देणारी 

अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारी 



सुखाच्या रस्त्यावरून जाताना आयुष्य सजवणारी 

मी आहेच अशी 

सर्वांचे ऐकणारी 

मित्रमैत्रीणींवर जास्त विश्वास ठेवणारी 

त्यांच्या कोणत्याही निर्णयावर समाधानी असणारी 



मी आहेच अशी 

मनातून मैत्री करणारी केल्यावर आयुष्यभर निभावणारी 





रोजचा महिला दिन 


रोजचा महिला दिन 

आज महिला दिन आहे 

का कानी कपाळी ओरडत आहात? 

कोणता दिवस महिलेवाचून उगवतो? 
कोणता दिवस महिलेस वाचून मावळतो? 
जन्मापासून मरणापर्यंत महिलाच असते सोबतीला 
गर्भात वाढते अंकुर तेव्हा जी नाळ जुळते ती मरणानंतरही कायमच राहते 
आई होऊन ती ममतेचा वर्षाव करते 
बहिण होऊन ती माया करते 
मावशी तर आईचेच दुसरे रूप 
प्रेयसी असते सुखाची सावली 
मैत्रिणी जपतात मित्राचे नाते 
वाहिनी आपली दु;खातली साथी 
पत्नी तर अर्धांगिनी असते 
सुख दु:खात सोडत नाही साथ 
धरणी माता अखेर पोटात घेत 
जन्मापासून मृत्यूपर्यंत जी सोडत नाही कधीच साथ 
तिच्यासाठी एकच दिवस कसा खास??

" माकड म्हणलं जीवनाचा कंटाळा आला " ---------------------------------------------- 

माकड म्हणलं जीवनाचा 
कंटाळा आला 
पृथ्वीवर काहीतरी 
घोटाळा झाला 

माकडाचा दोस्त म्हणला 
येड्यावणी करू नको 
माणसाचे रोग 
आपल्यात आणू नको 

आपल्यात कुठं जीवनाचा 
कंटाळा येत असतो का ? 
आपण कधी एकेठिकाणी 
मुकाट्यानं बसतो का ? 

पहिल्या सारखे माणसं आता 
का हासत नसतील 
पारावर , वट्यावर 
निवांत कधी बसतील ? 

दुसरं माकड म्हणलं येड्या 
माणूस झाला प्रगत 
पहिल्या सारखं हसून खेळून 
आता नसतेत जगत 

काय राव याला कुठं 
विकास झाला म्हणतेत का ? 
मार्क कमी पडले म्हणून 
लेकराला हाणतेत का ? 

माकड म्हणलं लहानपणी 
पोट्टे माघ लागायचे 
शाळागीळा सगळं सोडून 
आपल्या बरोबर हिंडायचे 

माकडाचा दोस्त म्हणला 
आता तसं नसतं 
आय टी आय होणाऱ्याला 
आय आय टी व्हायचं असतं 

चित्रकला , संगीत , नाट्य 
सगळं आलं पाहिजे 
एवढं करून ते पुन्हा 
मेडिकलला गेलं पाहिजे 

अरे बाबा माणसां मध्ये 
शिक्षण पाहिजे असतं 
त्यांना म्हणे सगळ्यात जास्त 
संस्कारित व्हायचं असतं 

कुणाला व्हायचंय श्रीमंत 
कुणाला बांधाचाय बंगला 
ताच्यामुळं आजकाल माणूस 
बघ नं कसा खंगला 

गाय म्हैस कुत्रं गाढव 
काहीच बदललं नाही 
माणसां मधे पहिल्या सारखं 
काहीच राहिलं नाही 

प्रगती झाली म्हणावं तर 
फाशी कामुन घेतेत 
आपल्या सारखंच दातं इचकून 
अंगावर धावून जातेत 

माकडाचा दोस्त म्हणला 
आपल्याला काय करायचं 
आपण आपलं मस्त पैकी 
उड्या मारीत फिरायचं 

दोन्हीही माकडांनी 
गळा भेट घेतली 
दोघांनीही एकमेकाला 
सारखीच शप्पथ घातली 

दोस्ता पुन्हा जीवनाला 
कंटाळायचं नाही 
सारखं सारखं माणसां मधे 
मिसळायचं नाही 

सोपस्कार 
आयुष्यभर दुषणं दिली जयांनी 
ते सजवित होते मज फुलांनी 
ज्याने कधी आधार नाही दिला 
तो खांदे देण्यास सरसावला ! 

अहो ज्यांना कधी फुटला नाही पाझर 
ते टाहो फोडत होते 
निष्प्राण मुखात पाणी ढकलत होते 
हार फुलं अन् चादरींचा ढिग पडले होते !! 

कधी देणार अग्नी ? उशीर होतो आहे 
उगाच एक रजा वाया घालवा कशाला 
भ्रष्ट भिजलेली ती लाकडंही पेटेना 
लाच मागती ते शवही पेटवायला !! 

अग्नीने वेढले जसे त्या प्रेताला 
जो तो लगबगीने लागला सटकायला 
श्रद्धांजलीचा सोपस्कार उरकला 
10 व्या 13 व्याला भेटू जो तो म्हणाला !! 

कलेवर जळले की नाही नव्हती सवड कोणाला 
आंघोळीच्या पाण्याची होती चिंता ज्याला त्याला 
झाली एकदा सुटका त्याची अन माझी 
नको कोणी दोष आता द्यायला !! 

अंत्य यात्रेसही का वेळ नाही मिळाला !! 



 पैसा बोलतो पैसा चालतो  

पैसा बोलतो पैसा चालतो 
पैसा हसतो माणसावर 

माणसाचे जीवन आहे पैसा 
अन्न वस्त्र निवारा गरजा शरीराची 
ते मिळवन्या साठी च 
पैसा गरज जीवनाची 

पैसा वीना जगात नाहीत 
कुठलीही नाती... 
पैसा पैसा पैसा 
आसा कसा पैसा 

माणसा पेक्षा श्रेष्ट बने पैसा 
पैसा हिनवितो माणसाला 
माणूस हिणवतो पैशाला 
हाताचा मळ म्हणतात पैसा 

जगतात माणसे ... 
पैसा हसतो माणसावर 
 म्हणे माझ्या विन आहे का 
तुमचा काही फायदा 
 माझ्या वीण मोठा ना जगात 
नाही कायदा ... 

कागद असुन मी तुमच्या 
जगण्याचा श्वास आहे.. 
जगतो जीवनात माणुस 
श्वास आहे पैसा 

पैसा खरंच मोठा 
माणुस आहे खोटा 
पैशाच्या पुढे , 

..........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद 


कर्जमाफीचे गुऱ्हाळ 

दोन - चार वर्षातच 
खेळाडू होतो करोडपती 
आयुष्यभर काबाडकष्ट 
शेतकरी मात्र रोडपती 


कर्जमाफिचे गुऱ्हाळ 
आजकाल जोरात आहे 
लोडशेडींगच्या विजेने 
शेतकरी घोरात आहे 

दिवसा जाते रात्री येते 
तिचा काही नेम नाही 
इंडिया आणि भारत 
या देशात सेम नाही 

ऐरंडाचे गुऱ्हाळ नको 
हमीभावाची कास धरा 
जय जवान जय किसान 
पोकळ घोषणा बंद करा 


✍ कृष्णा शिंदे 
अक्कलकोट जि सोलापूर 
९४२१८६१५२८

1 comment:

  1. एवढं कोन वाचत बसेल. थोडस लिहा पण असं लिहा की वाचणाऱ्याला पण वाचण्यात रुची तयार झाली पाहिजे.

    ReplyDelete