Tuesday, 25 September 2018

एक छिद्र उरलेलं...*

*एक छिद्र उरलेलं...*
°°°°°°°°°°°°°°°°°°

महाभारतातील ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का ?

एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला. काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला. परंतु तो पर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली.

तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले,
 'आता सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे मी आता दान देवू शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला निराश करणार नाही.'

तो गरीब म्हातारा नाराज होवून परत फिरला.

या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते. तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले,
'दादा, तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलं आहे. पण एक विचारू !
माणसाला दुस-या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते ?'

धर्मराजाला स्वतःची चूक कळली त्यांनी लगेच त्या गरीब म्हाता-याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं.

भीमानं विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी तो अस्वस्थ करणारा आहे. आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो आयुष्याचं खरं महत्त्व कळतं.

''तो काल मला भेटला होता, आज तो नाहीय',
 'तो मघाशी माझ्याशी फोनवर बोलला होता, आत्ता तो नाहीय.'
असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात.

हा क्षण माझा आहे.
पुढचा क्षण माझा नाही,
हे एकदा का आपण आपल्या मनात रूजवले की संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते सूर ताल, लय, ठेका घेवून आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं !

जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात,
ते गेल्यानंतरही त्यांचे चौकात पुतळे होतात,
जे शास्त्रज्ञ, विचारवंत असतात,
त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात.
जे कलावंत, गायक, खेळाडू असतात,
ते गेल्यानंतरही ते त्यांच्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात.

पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय ? शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण ? कुठल्या रूपात मागे उरतो आपण ?

*माझ्या घरात*
*आज मी आहे,*
*उद्या मी नसेन,*
*माझ्या जागी*
*एक मिणमिणता दिवा* *असेल .*

*दहा दिवसांनी तो दिवा विझेल*
*त्या जागी माझा एक फोटो असेल,*
*लाकडी चौकट*,
*कोरीव नक्षीकाम,*
*हसरा फोटो.*

*काही दिवसांनी*
*माझ्या लटकलेल्या फोटोवर*
*साचलेली धूळ असेल*
*किंवा त्या फोटोची पातळ काच*
*वेडीवाकडी तडकलेली असेल .*

*काही वर्षांनी*
*माझा तो हसरा फोटो*
*भिंतीवरच्या छिद्रातून*
*खिळ्यासकट निखळलेला असेल...*

*आणि मग त्यानंतर*
*पिढ्यान् पिढ्या*
*माझ्याच घरात*
*माझ्या नावाचं*
*फक्त उरलेलं एक छिद्र* *असेल !*

आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'उत्सवात' करायचं का ?

कोणाला ही दुखवू नका,
कोणालाही कमी लेखू नका,
कोणाचाही अपमान करु नका,
कारण, तुम्ही केलेले हे कर्म तुमच्याकडेच येणारे असते .
म्हणूण "जगा आणि जगू द्या ".😊😊💐😘😘

!! साहित्यिकांची टोपणनावे !!

🌎 *!! साहित्यिकांची टोपणनावे !!* 🌎

*technoexam.com/govt/mpsc | MPSC Updates*

*टोपणनाव-------लेखक*
अनंत फंदी-------शाहीर अनंत घोलप
अनंततनय-------दत्तात्रय अनंत आपटे
अनिरुध्द पुनर्वसू-------नारायण गजानन आठवले
अनिल-------आत्माराम रावजी देशपांडे
अमरशेख-------मेहबूब पठाण
अज्ञातवासी-------दिनकर गंगाधर केळकर
आनंद-------वि.ल.बर्वे
आरती प्रभु-------चिंतामण त्र्यंबक खानोलकर
काव्यविहारी-------धोंडो वासुदेव गद्रे
कुंजविहारी-------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
कुमुद-------स.अ.शुक्ल
कुसुमाग्रज-------वि.वा.शिरवाडकर
कृष्णकुमार-------सेतू माधव पगडी
केशवकुमार-------प्र.के. अत्रे
करिश्मा-------न.रा.फाटक
केशवसुत-------कृष्णाजी केशव दामले
गदिमा-------ग.दि.माडगुळकर
गिरीश-------शंकर केशव कानेटकर
ग्रेस-------माणिक शंकर गोडघाटे
गोल्या घुबड-------विष्णुशास्त्री चिपळूणकर
गोविंद-------गोविंद त्र्यंबक दरेकर
गोविंदाग्रज-------राम गणेश गडकरी
चंद्रिका /चंद्रशेखर-------शिवराम महादेव गो-हे
चारुता सागर-------दिनकर दत्तात्रय भोसले
छोटा गंधर्व-------सौदागर नागनाथ गोरे
बालगंधर्व-------नारायणराव राजहंस
जीवन-------संजीवनी मराठे
ठणठणपाल/अलाणे-फलाणे-------जयवंत दळवी
तुकडोजी महाराज-------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट
संत तुकाराम-------तुकाराम बोल्होबा अंबिले
तुकाराम शेंगदाणे-------ज्ञानेश्वर नाडकर्णी
दत्त (कवी)-------दत्तत्रय कोंडदेव घाटे
द्या पवार (कवी)-------दगडू मारुती पवार
जागल्या (कथालेखक)-------दगडू मारुती पवार
दक्षकर्ण-------अशोक रानडे
दादुमिया-------दा.वि.नेने
दासोपंत-------दासोपंत दिगंबर देशपांडे
दिवाकर-------शंकर काशिनाथ गर्गे
दिवाकर कृष्ण-------दिवाकर कृष्ण केळकर
धनुर्धारी-------रा.वि.टिकेकर
धुंडिराज-------मो.ग.रांगणेकर
नागेश-------नागेश गणेश नवरे
नाथमाधव-------व्दारकानाथ माधवराव पितके
निशिगंध-------रा.श्री.जोग
नृसिंहाग्रज-------ल.गो.जोशी
पद्मा-------पद्मा विष्णू गोळे
पराशंर-------लक्ष्मणराव सरदेसाई
पी.सावळाराम-------निवृत्ती रावजी पाटील
पुष्पदंत-------प्र.न.जोशी
प्रफुल्लदत्त-------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर
प्रभाकर (शाहीर)-------प्रभाकर जनार्दन दातार
फडकरी-------पुरूषोत्तम धाक्रस
फरिश्ता-------न. रा. फाटक
बाकीबा-------बाळकृष्ण भगवंत बोरकर
बाबा कदम-------वीरसेन आनंद कदम
बाबुराव अर्नाळकर-------चंद्रकांत सखाराम चव्हाण
बाबुलनाथ-------वि.शा.काळे
बालकवी-------त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळकराम (विनोदासाठी)-------राम गणेश गडकरी
बी-------नारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ-------भगवान रघुनाथ कुलकर्णी
बंधुमाधव-------बंधु माधव मोडक (कांबळे)
भटक्या-------प्रमोद नवलकर
भाऊ पाध्ये-------प्रभाकर नारायण पाध्ये
भानुदास-------कृष्णाजी विनायक पोटे
भानुदास रोहेकर-------लीला भागवत
भालचंद्र नेमाडे-------भागवत वना नेमाडे
मकरंद-------बा.सी.मर्ढेकर
मंगलमूर्ती-------मो.ग.रांगणेकर
मनमोहन-------गोपाळ नरहर नातू
लोककवी श्री मनमोहन-------मीनाक्षी दादरकर
माधव ज्युलियन-------माधव त्र्यंबक पटवर्धन
माधवानुज-------डॉ. काशिनाथ हरि मोडक
मामा वरेरकर-------भार्गव विट्ठल वरेरकर
मधू दारूवाला-------म.पा.भावे
मिलिंद माधव-------कॅ. मा कृ. शिंदे
मुक्ताबाई (संत)-------मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी
मोरोपंत-------मोरेश्वर रामचंद्र पराडकर
मंडणमित्र-------द.पा.खंबिरे
यशवंत-------यशवंत दिनकर पेंढारकर
यशवंत दत्त-------यशवंत दत्ताजी महाडिक
रघुनाथ पंडित-------रघुनाथ चंदावरकर
रमाकांत नागावकर(गंधर्व)-------बळवंत जनार्दन करंदीकर
रसगंगाधर-------गंगाधर कुलकर्णी
राजा ठकार-------नारायण गजानन आठवले
राजा मंगळवेढेकर-------वसंत नारायण मंगळवेढेकर
राधारमण-------कृष्ण पांडुरंग लिमये
रा. म. शास्त्री-------वि.ग कानिटकर
रूप-------प्रल्हाद वडेर
रे. टिळक-------नारायण वामन टिळक
लता जिंतूरकर-------लक्ष्मीकांत तांबोळी
लक्ष्मीनंदन-------देवदत्त टिळक
लोकहितवादी-------गोपाळ हरि देशमुख
वनमाळी-------वा.गो.मायदेव
वसंत बापट-------विश्वनाथ वामन बापट
वसंत सबनीस-------रघुनाथ दामोदर सबनीस
वामन पंडित-------वामन नरहर शेखे
विजय मराठे-------ना.वि.काकतकर
विंदा करंदीकर-------गोविंद विनायक करंदीकर
विनायक-------विनायक जनार्दन करंदीकर
विनोबा-------विनायक नरहर भावे
विभावरी शिरुरकर-------मालतीबाई विश्राम बेडेकर
विष्णुदास-------नरहर सदाशिव जोशी
वशा-------वसंत हजरनीस
विष्णुबुवा ब्रम्हचारी-------विष्णु भिकाजी गोखले

Sunday, 3 June 2018

आर्थर अँश

आर्थर अँश हा इटली मधील अतिशय
नावाजलेला टेनिसपटू होता.
१९८३ मध्ये
त्याच्या हदयावर शस्ञक्रिया करावी लागली.
त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे
त्याला कैन्सरची लागण झाली.
त्यानंतर
त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पञे येत राहिली.
त्यातील एका पञात म्हटले होते...
इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ?
या पञाला उत्तर देताना आर्थर म्हणतो...
५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस
खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक
टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस
सर्किटमध्ये दाखल झाली,
त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम
स्पर्धेसाठी निवडली गेली.
त्यातील फक्त ५० टेनिसपटू
विम्बलडनसाठी
निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे
अंतिम फेरीत पोचले.
त्या दोन
जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक
उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले
नाही की, माझीच निवड
का केलीस ? मग आत्ताच
वेदना होत असताना माझीच निवड का केली,
असे मी देवाला कसे विचारु ?
सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस
बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.

            यशस्वी लोक आपल्या
            निर्णयाने जग बदलतात
             आणि अपयशी लोक
            जगाच्या भीतीने आपले
               निर्णय बदलतात...आरपार

पोराला थोडं रडू द्या

 *पोराला थोडं रडू द्या...!!*

काल पेपर वाचतांना खूप
छोट्याशा अशा एका बातमीनं
माझं लक्ष वेधलं...

बातमी होती हिंगोली मधून...
वडीलांनी १० वीची पुस्तकं
आणण्यास उशीर केला, म्हणून
एका १० वी च्या मुलानं रागाच्या
भरांत गळफास घेऊन आत्महत्या
केली...

छोटीच बातमी पण मनांला
चटका लावणारी...

आपल्या वाचनांत रोज अशा
बातम्या येत असतात, त्या
आपण वाचतो व सोडून देतो...

पण, आपण कोणीही खोलांत
जाऊन विचार करत नाहीत,
की असं कां..?

आपण थोडसं मागं म्हणजे
१९८० च्या आसपास किंवा
त्या दरम्यान... म्हणजे आता
जे लोक वय वर्ष ४५ च्या
आसपास आहेत, ते शाळेमध्ये
जातांना खाकी चड्डी व पांढरा
शर्ट शाळेचा गणवेश असायचा,
तो आपल्याला मिळायचा नाही,
आपल्या मोठ्या भावाचा आणि
मुलींना मोठ्या बहिणीचा
वापरावा लागत होता आणि
त्यालाच नीटनिटके करून
आपल्याला ते वापरावे लागत
होते. तशीच अवस्था आपल्या
पुस्तकांची होती, पुढच्या
वर्गातील मुलांची जुनी पुस्तकं
अर्ध्या किमतीत घ्यायची
आणि ती परत कव्हर लावून
फाटलेली पुस्तकं वर्षभर
काळजीपूर्वक वापरायची
आणि परत विकायची.

आताच्या मुलांना ठिगळ हा
शब्दच आठवत नाही आणि
त्यांना ते कांय असतं, तेही
माहित नाही. ते सरळ
आपल्यालाच विचारतील,
ते कांय असतं. आपल्या वेळेस
घरची परिस्थिती खूपच
हलाखीची असल्यानं वर्गातील
अनेकांच्या चड्डीवर ठिगळं
दिसायची...

साधारण १९९५ नंतर जसं
आर्थिक स्वायत्ततेचं वारं
आणि अनेकांच्या हातात थोडा
फार पैसा यायला लागला, तसे
अनेक प्रश्न निर्माण होत गेले...

👉​​आई सुद्धा जन्मलेल्या
मुलाला रडल्याशिवाय दूध
पाजत नाही... पण आज
आपण समाजमध्ये पाहतोय,
की बऱ्याच गरज नसलेल्या
गोष्टी मुलांच्या हातात येत
आहेत. लहानपणापासूनच
आपण पालक म्हणून मुलांना
गरज नसतांना सुद्धा उलट्या
होईपर्यंत देतो...

आज लहान मुलांच्या हातात
अनेक गॅजेट्स आले आहेत,
व्हाट्सअप, फेसबुक, इंटरनेट,
केबल टीव्ही आणि इतर अनेक
त्यामुळे त्यावरील बऱ्याच
गोष्टीमुळे मुले जास्त आभासी
दुनियेत वावरतात... पालक
म्हणून आपण त्याला कशालाच
नाही म्हणत नाहीत...

👉​​आज आपल्या देशात लेकरू
पहिलीला आल्या पासून त्याला
आपण अपंग करतोय, असं माझं
वैयक्तिक मत आहे. त्याला पुस्तकं
फुकट, वह्या फुकट, पाटी फुकट,
दुपारी मस्तपैकी पोषण आहार,
दप्तर फुकट आणि शिवाय
त्याला नापास करायचं नाही...

कशाला अभ्यास करतंय ते
मग...त्याला जर सगळंच
विनाकष्टाचे मिळत असेल, तर
पुढं कांय होईल...???

एक ऐत खाऊ पिढी तयार होईल.
आज आपण विध्यार्थ्यांना उलट्या
होईपर्यंत देत आहोत, त्याला
त्याची काहीच गरज नाही..

👉​​शाळेत मिळणाऱ्या फुकट
पुस्तकाची किमतसुद्धा आज
पालकांना माहित नाही, हे खूप
मोठं दुर्दैव म्हणावं लागेल...

आज बऱ्याच शाळांमधून
प्राथमिक स्तरावरील
विध्यार्थ्यांना इंटरनेटचं शिक्षण
दिलं जातं...

वास्तविक पाहता एकदम
चुकीची पद्धत आहे ती...
आणि काय शिकवावं आणि
कुठं शिकवावं हे पैसा जास्त
झाल्यामुळे पालकांना कळत
ठिक नाही...

👉​​आज मुलांना मैदानी खेळ
नको वाटतात, त्यामुळं त्याचा
आपल्या वयोगटातील मुलामध्ये
मिसळण्याची सवयच नाही
राहिली. घरी कोणी वडीलधारी
मंडळी आली, तर कसं वागावं,
याचं सामाजिक भान पण आज
 लोप पावत चाललं आहे...

सगळंच आयतं आणि विनाकष्ट
मिळत असल्यानं आजच्या
पिढीला नाही ऐकायची, सवयच
नाही राहिली, ना परिस्थितीची
जाण ना कशाची भीती...

मुलांच्या तोंडातून एकदा शब्द
बाहेर पडेपर्यंत ती वस्तू त्याच्या
समोर हजर...

आणि ज्या वेळेस ही मूलं वयांत
येतात... त्यावेळी आपल्या
हातातून सर्व परिस्थिती बाहेर
गेलेली असते, एकादी गोष्ट नाही
मिळाली, तर ही मुलं त्यामुळे
खूप टोकाची पावलं उचलतात.
 नाही ऐकण्याची सवय
 नसल्यामुळं ती खूप आक्रमक
झालेली असतात...

👉​​लाड करावेत, पण तेही
नियंत्रणात...आज मुलाच्या
बाबतीत प्रत्येक पालक नको
तितका जागरूक झाला
आहे, पालकांच्या भल्या मोठ्या
अपेक्षा वाढलेल्या आहेत, कांय
करावं आणि कांय नाही, तेही
आज समजण्याच्या पलीकडे
गेलं आहे...

🙏​​कष्टाला दुसरा कोणताही
शॉर्टकट नाही, हे त्या मुलांना
बालपणी पासूनच मनावर
ठिक बिबविण्याची गरज आहे...
तरच ही बालकं टिकतील...
म्हणून  मुलांना थोडं रडू
द्या...थोडं रडू द्या...!!🙏🏻़
[30/05, 6:08 am] Tai: पहाटेच जाग आली कुणीतरी टकटक करीत होते.

दार उघडून बघितले बाहेर तर कुणीच उभे नव्हते..

आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीच्या गजावर दिसला एक पक्षी.



चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता नक्षी.

का रे बाबा? विचारले तर म्हणाला भाड्याने मिळेल का एखादे झाड घरटे बांधण्यासाठी.

एकटा कुठेही कसाही राहिलो असतो पण जागा हवी होणाऱ्या पिल्लांसाठी.



तुमच्या भाऊबंदांनी लुटले आमचे रान केले निर्वासित.

बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी असतो आता फिरस्तित.

वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे अन पाणी.

पण निवाऱ्याचे काय? हे लक्षात घेतच नाही कुणी.

पोटाला हवेच खातो ती भिक अन नेतो थोडे घरी.

खायला तर हवच जरी डोक्यावर छप्पर नसले तरी.

कधीकधी वाटते आत्महत्या करावी बसुन विजेच्या तारेवर.

किंवा द्यावा जीव लोटून उंच उंच त्या मोबाईल टाॅवरवर.



जसे मग आत्महत्या नंतर सरकार काही देते शेतकऱ्यांला.

तसेच मिळेल एखाद झाड माझ्या पिल्लांना तरी आसऱ्याला.

ऐकून मी चक्रावले खरच एवढा विचार मी नव्हता केला.

जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला.

मी हात जोडून म्हटले त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते.

पण आत्महत्या करू नको खरच मनापासुन सांगते.

तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध वनरुम किचन खोपा.

अडचण होईल पण आतातरी एवढाच उपाय आहे सोपा.

तो म्हणाला खुप उपकार होतील पण भाडे कसे देणार.

मी म्हटले रोज सकाळ संध्याकाळ मंजुळ गाणी ऐकव बाकी काही नाही मागणार.

तो म्हणाला मला तुम्ही भेटलात पण बाकी नातलगांच काय

त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी कुठे ठेवतील पाय.

अरे लावताहेत आता झाडे अन जगवतात



आता कुणी कुणी बदलतेय चित्र पण त्यांना सांग आत्महत्या करू नका कुणी

ऐकुन तो पक्षी उडाला काड्या जमवायला घरट्यासाठी.

अन मी पण घरात आले तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी.

त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड.

वाचुन तुम्ही पण लावाल ना कुंडीत वा अंगणात एकतरी झाड.... निदान एक तरी झाड...

द लास्ट बकेट

*'द बकेट लिस्ट'*
2007 चा अमेरिकन चित्रपट. कुठलीही मारधाड़ नाही, स्पेशल इफेक्ट्स नाहीत, अॅनिमेशन नाही, कसलाही मसाला नाही, कुठलाही फॉर्म्युला नाही...
मग  बघायचा तरी कशाला? बघायचा त्यातील अप्रतीम संदेशासाठी आणि जमलंच तर त्या संदेशाची जशी जमेल तशी वैयक्तिक पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी...

तर 'बकेट लिस्ट' म्हणजे नक्की काय?
इंग्लिश भाषेत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसंदर्भात एक बोली वाक्प्रचार आहे - To kick the bucket - त्याचा मराठी समानार्थी उपयोग सांगायचा तर 'त्याने अखेरचे डोळे मिटले' किंवा 'त्याने शेवटचा श्वास घेतला' असा सांगता येईल. मग बकेट लिस्ट म्हणजे काय, तर मरणापूर्वी करायच्या काही महत्वाच्या कामांची यादी. अशी यादी माणूस सहसा करत नाही. काही मोजक्या लोकांना मृत्यूची चाहूल लागते म्हणतात, ते लोक अशी यादी करत असावेत. अन्य काही थोडके लोक मृत्युपत्र करतात. पण बकेट लिस्ट म्हणजे मृत्युपत्र नव्हे. मृत्युपत्रात मरण पावलेल्या माणसाच्या इच्छेनुसार त्याच्या स्थावर जंगम मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी याची जंत्री असते. बकेट लिस्ट मध्ये अद्याप जिवंत असलेल्या पण मृत्यूची चाहूल लागलेल्या माणसाच्या अपूर्ण इच्छांची यादी असते. मग यात काहीही असू शकतं. अगदी ५ किलो आईसक्रीम एकट्याने खावं किंवा अमिताभ बच्चन सोबत चहा घ्यावा किंवा आयफेल टॉवर चढून जावा किंवा आयुष्यभर तोंड न पाहिलेल्या भावाशी पुन्हा जुळवून घेऊन मनसोक्त गप्पा माराव्यात यापैकी किंवा आपण कल्पनाही करू शकत नाही अशा कुठल्याही गोष्टी असू शकतात.

(आपल्याकडे काही वर्षांपूर्वी गाजलेल्या जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातून, असाच काहीसा, या क्षणात जगून घ्या असा संदेश दिला आहे.)

'द बकेट लिस्ट' या चित्रपटात असेच दोन अवलिये दाखवले आहेत. दोन तोडीस तोड पट्टीच्या अभिनेत्यांनी या भूमिका समर्थपणे निभावल्या आहेत. *जॅक निकोलसन* आणि *मॉर्गन फ्रीमन* यांनी!
आयुष्यभर इमाने इतबारे कार मेकॅनीकचे काम केलेला कार्टर चेंबर्स (फ्रीमन) आणि अब्जाधीश असलेला रुग्णालय साखळीचा मालक एडवर्ड कोल (निकोलसन) या दोघांनाही फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याने पुढच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाते आणि ते दोघेही एकाच दोन खाटांच्या खोलीत एकमेकांना उपचारा दरम्यान भेटतात. दोघांनाही एकमेकांविषयी काहीही ममत्व वाटत नसते आणि आता आपण लवकरच मरणार आहोत ही जाणीव छळत असते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच दोघांनाही त्यांचे डॉक्टर स्पष्ट पणे सांगतात की ते आता ६ महिने किंवा फार तर फार १ वर्षाचे सोबती आहेत. रुग्णशय्येवर पडल्या पडल्या कार्टर एक बकेट लिस्ट लिहित असतो. डॉक्टरांनी सहा महिन्याची मुदत जाहीर केल्यानंतर आणि पहिल्या तीन इच्छा लिहिल्यानंतर कार्टरचा त्या बकेट लिस्ट मधला रस जातो आणि त्या कागदाचा बोळा करून तो फेकून देतो. (त्याची १३ इच्छांची यादी खाली दिली आहे.)

१. Witness something truly majestic
२. Help a complete stranger
३. Laugh until I cry
४. Drive a Shelby Mustang
५. Kiss the most beautiful girl in the world
६. Get a tattoo
७. Skydiving
८. Visit Stonehenge
९. Drive a motorcycle on the Great Wall of China
१०. Go on a Safari
११. Visit the Taj Mahal
१२. Sit on the Great Egyptian Pyramids
१३. Find the Joy in your life

तो बोळा नेमका कोलच्या हाती येतो. तो ती यादी वाचतो आणि त्याला ती कल्पना भयंकर आवडते. कोल कार्टर ला त्या यादीविषयी विचारतो, त्यांची एक उत्तेजित भावनापूर्ण चर्चा होते आणि दोघांचे ठरते, की आपण ही बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. कार्टरची बायको या सगळ्याला खूप विरोध करते. पण कार्टर तिला म्हणतो, "मी माझं सगळं आयुष्य कारच्या उघडलेल्या बॉनेट खाली दुरुस्ती करत काढलं. कुटुंबाप्रती सर्व जबाबदाऱ्या प्रेमाने निभावल्या. आता मला माझ्यासाठी म्हणून काही क्षण जगायचे आहेत. मला अडवू नकोस."

मी विचार करत होतो, आपण स्वतःसाठी खरंच किती जगतो? कायम जबाबदाऱ्या, रोजच्या जगण्यातली आव्हानं, मुलांचं मोठं होणं, पालकांचं दुसरं बालपण/ आजारपण, गृहकर्ज चुकवणे या आणि अशा असंख्य व्यवधानात आपलं आयुष्य कसं सरलं हे लक्षातही येत नाही. आपल्या मनातल्या काही इच्छा तरी, मरणाच्या दारात असताना पूर्ण करण्याची तयारी करण्यासाठी मन खंबीर असावं लागतं महाराजा! मला तर म्हणायचं आहे की मरणाच्या दारातच कशाला असं मन खंबीर करावं? एरवी देखील करावं कधी तरी ५ वर्षातून एकदा. आणि दरच वेळी काही महागडी टूर केली पाहिजे असं नाही. काही नाही तर निदान कासच्या पठारावर उमलणारा रानफुलांचा महोत्सव तरी बघावा एकदा डोळे भरून. कुठलेही बुकिंग न करता काशी यात्रा करून यावी. शेतात जाऊन कुणाच्या तरी मस्त मातीत हात घालावेत, भाकऱ्या भाजाव्यात चुलीवर, किंवा थोडा वेळ घालवावा एखाद्या hospice home मध्ये मरणासन्न लोकांचे अखेरचे बोल ऐकण्यात. करतो का आपण असं काही? का नाही करत? हे माझे मला 'बकेट लिस्ट' मुळे पडलेले प्रश्न.

मग निघतात दोघं सफरीला. स्काय डायविंग करतात, ताज महाल, चीनची भिंत, नेपाळ मधून हिमालय, इजिप्तचे पिरॅमीड, टांझानियाचे सिंह अभयारण्य असं आणि बरंच काही. इजिप्त मध्ये त्यांची चर्चा होते 'ममी'विषयी. कार्टर कोल ला विचारतो, की तुला या ममी संस्कृती विषयी काही माहिती आहे का? कार्टर ने या वेळी विचारलेले दोन प्रश्न माझ्या मनात घट्ट रुतून बसले आहेत. अगदी माधामाशीची नांगी त्वचेत रुतून बसते ना, तसे. खाली दिलेत.

Carter Chambers to Edward, (of the two questions asked of the dead by the gods at the entrance to heaven):

1. Have you found joy in your life?
2. Has your life brought joy to others?

एक: तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळाला का?
दोन: तुम्ही आयुष्यात इतरांना आनंद देऊ शकलात का?

खूप खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे. वरकरणी सोप्पे वाटतात. पण अर्थगर्भ आहेत. विचार करायला लावणारे आहेत. मी परवापासून गढलो आहे त्यातच. मी ठरवलं आहे की जेव्हा केव्हा माझी 'बादली लाथाडण्याची' वेळ येईल, तेव्हा मी स्वतःला हे दोन प्रश्न विचारेन. त्यांची उत्तरे ठाम, स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण हो अशी यायची असतील तर आज, आत्ता पासून सुरुवात करायला हवी. त्यासाठी मला माझी बकेट लिस्ट अर्थात मृत्यूपूर्व डोहाळे यादी करायला हवी. आणि नुसती करून उपयोग नाही, ती अंमलात सुद्धा आणायला हवी.

चित्रपटात पुढे बरंच काही घडतं. दोघे मिळून ती लिस्ट पूर्ण करतात.कार्टर चा कर्करोग मेंदूत पसरतो आणि त्याचे निधन होते. पण मृत्युपूर्वी तो कोल च्या मनातली त्याच्या मुलीविषयी असलेली अढी दूर व्हावी या विषयीची बीजे रोवतो. नंतर कोलचे देखील निधन होते. पण मरणापूर्वी त्याचे आणि त्याच्या लेकीचे मनोमीलन होते. तो त्याच्या नातीचा पापा घेतो आणि बकेट लिस्ट मधली Kiss the most beautiful girl in the world ही गोष्ट पूर्ण करतो.

हा चित्रपट बघाच आणि तुमचीही बकेट लिस्ट बनवाच. आणि,  ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा.

*एका तरी माणसाला 'बकेट लिस्ट' करायला उद्युक्त करेन, ही गोष्ट मी माझ्या 'बकेट लिस्ट' मध्ये लिहिली आहे!*

 (forward)
या *वेड्या* माणसाला पाठीमागूनच नमस्कार.....
------------------------------------------------
मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो... तपासुन घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकर्यांची झुंबड ....सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले... बसणं ताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे... बराच वेळ मी तिरक्या नजरेने पहात होतो, हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत.... ! सहज दिसलं, उजव्या घोट्यापासुन पाय नव्हता त्यांना, बाजुलाच कुबडी टेकवुन ठेवली होती....

थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं, कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेत होते... अरे ! माझा अंदाज चुकला तर....उत्सुकता वाढली म्हणुन त्यांच्याजवळ जायला लागलो तर कुणीतरी म्हणालं, डॉक्टर, नका जावु, वेडा आहे तो !

उत्सुकता स्वस्थ बसु देइना म्हणुन गेलो, मला वाटलं ते मला पाहुन हात पुढे करतील....पण त्यांचा हात पुढं आलाच नाही तीथंही अंदाज चुकला माझा....

मीच म्हणालो, बाबा काही त्रास ? कुबडी घेत हळुच उठत ते म्हणाले, Good afternoon doctor...... I think I may have some eye problem in my right eye ....

मी उडालोच इतकं अस्खलीत इंग्लिश ऐकुन...

मी धक्क्यातुन बाहेर येत, डोळा बघितला, पिकलेला मोतीबिंदु होता, मी म्हणालो मोतीबिंदु आहे बाबा, अॉपरेशन करावं लागेल.... तसे म्हणाले, oh, cataract ? I had cataract operation in 1999 for my left eye in Ruby Hospital but....

हा प्रकार काहितरी वेगळा आहे हे आता पक्कं जाणवलं.....

म्हणालो, बाबा, तुम्ही इथं काय करताय ?

मी रोजच इथं येतो दोन तास...

हो पण का? मला तर तुम्ही चांगले शिकलेले वाटता ?

शिकलेले ? या शब्दावर जोर देत ते हसत म्हणाले, *शिकलेले ???*

म्हणालो, बाबा तुम्ही थट्टा करताय का माझी ?

Oh no doc... Why would I ?... Sorry if I hurt you !

हर्ट नाही पण मला काही कळत नाहिये, काय चाललंय बाबा ...

कळुन घेवुन काय करणार आहात डॉक्टर ?

ओके, चला आपण तिकडे बसु, नाहितर लोक तुम्हालाही वेडा म्हणतील.... असं म्हणुन ते हसायला लागले....

आम्ही दोघंही थोडं बाजुला जावुन एका टपरीत बसलो....

Well Doctor, I am Mechanical Engineer.... बाबांनी इंग्लिशमध्येच सुरुवात केली.... मी xxxxx या कंपनीत सिनीअर मशीन अॉपरेटर होतो, एका नविन अॉपरेटरला शिकवत असतांना पाय मशीन मध्ये अडकला, आणि हातात कुबडी आली. कंपनीने सर्व खर्च करुन वर आणखी थोडे पैसे देवुन घरी बसवलं.... लंगड्या बैलाला कोण ठेवेल ?

मग स्वतःचं छोटं वर्कशॉप काढलं, मस्त घर घेतलं, मुलगाही मेकॕनिकल इंजिनियर आहे, वर्कशॉप वाढवुन त्याने छोटी कंपनी टाकली.....

मी चक्रावलो, बाबा पण मग तुम्ही इथं कसे ....?

मी...? नशीबाचे भोग...

मुलाने व्यवसाय वाढवायचा म्हणुन कंपनी आणि घर दोन्ही विकलं... म्हटलं पोराची भरभराट होत्येय.. विकुदे !

विकुन सगळं घेवुन तो गेला जपानला.... आणि आम्ही इथे उरलो जपानी बाहुल्या म्हणुन... ते हसायला लागले.... हसणंही इतकं करुण असु शकतं ...हे मी अनुभवलं .... !

बाबा पण तुमच्याकडे स्किल आहे, लाथ माराल तिथं पाणी काढाल तुम्ही....

तुटलेल्या उजव्या पायाकडे पहात बाबा म्हणाले, लाथ ...? कुठे आणि कशी मारु सांगा...?

मी ओशाळलो, मलाच वाईट वाटलं...

आय मीन बाबा कुणीही नोकरी देईल तुम्हाला अजुनही , कारण या क्षेत्रातला तुमचा अनुभव खुप आहे...

Yes doctor, मी एका वर्कशॉपमध्ये आहेच कामाला.... 7000 मिळतात मला....

माझ्या डोक्यातला तिढा काही सुटत नव्हता....

अहो बाबा तरी मग तुम्ही इथं कसे ?

डॉक्टर, मुलगा गेल्यावर एका चाळीत पत्र्याचं शेड घेतलंय भाड्यानं, तिथं मी आणि माझी बायको राहतो, तीला Paralysis आहे ती जागेवरुन उठु शकत नाही.

मी 10 ते 5 ड्युटी करतो, 5-7 इथं बसतो, आणि घरी जावुन "तिघांचा" स्वयंपाक करतो....

बाबा आत्ताच म्हणालात , घरी तुम्ही आणि बायको असता मग तिघांचा स्वयंपाक ?

डॉक्टर, माझ्या लहानपणी माझी आई वारली, माझ्या जिवलग मित्राच्या आईनेच त्याच्याबरोबर मलाही सांभाळलं, दोन वर्षापूर्वी तो मित्र वारला हार्ट अॕटॕकने, 92 वर्षाच्या त्याच्या आईला मी आणलं मग माझ्याच पत्र्यात.... ती कुठं जाईल आता....?

मी सुन्न झालो.... या बाबाचे स्वतःचे सर्व हाल, बायको अपंग, स्वतःला पाय नाही, घर धड नाही, जे होतं ते मुलानं विकलं ....त्यात मित्राच्या म्हाता-या आईला सांभाळतोय.....

बाबा मुलानं तुम्हाला रस्त्यावर आणलं, तुम्हाला राग नाही येत त्याचा ?

No no डॉक्टर, अहो ते त्याच्यासाठीच कमावलं होतं, घेतलं त्याने, काय चुकलं त्यात ..?

बाबा घेण्याची पद्धत चुकली त्याची , त्यानं ओरबाडुन घेतलं सर्व....

डॉक्टर, अहो आपले पुर्वज माकड होते, शेपुट गेलं तरी ओरबाडायची सवय जाइल का माणसाची ...? असं म्हणुन हसता हसता तोंड फिरवलं .... ते हसणं होतं कि लपवलेले हुंदके ???

बाबा, कळलं मला 7000 मध्ये भागत नाही तिघांचं म्हणुन तुम्ही इथं येता, बरोबर ?

No you are wrong doctor. 7000 मध्ये मी सर्व मॕनेज करतोच सगळं, पण जी म्हातारी आई आहे मित्राची तीला डायबेटीस आणि ब्लड प्रेशर दोन्हीची औषधं चालु आहेत, ती मात्र मॕनेज होत नाहित या सात हजारात....

मी येतो दोन तास इथे, कुणी दिलेलं अन्न मी स्विकारत नाही, पैसे कुणी दिले तर मात्र घेतो.... तीची महिन्याची औषधं ओळखीच्या मेडिकल स्टोअर मधुन आधीच घेतो आणि रोज दोन तासात जे पैसे मिळतील ते पैसे मेडिकल वाल्याला रोजच्या रोज देतो.... !

या बाबाला त्याचा स्वतःचा मुलगा सोडुन गेलाय आणि हा बसलाय दुस-याची आई सांभाळत....

डोळ्यातुन पाणी येवु न देण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही डोळे शेवटी मला दगा देतातच ....

बाबा, दुसऱ्याच्या आईसाठी तुम्ही इथं पैसे मागायला येता ?

दुसऱ्याची ? अहो माझ्या लहानपणी खुप केलंय तीनं माझं.... आता माझी पाळी आहे इतकंच ....!

मी त्या दोघींना सांगितलंय 5-7 आणखी एक काम मिळालंय म्हणुन....

बाबा, आणि त्यांना जर कळलं तुम्ही इथे मागता म्हणुन तर ...?

अहो कसं कळेल ? दोघीपण खाटेवर पडुन....... इकडच्या कुशीवरुन तिकडं होता येत नाही त्यांना मी केल्याशिवाय...येतीलच कश्या त्या ? हा...हा...द्या टाळी !

हुंदका लपवण्याची आता माझी पाळी होती पण बाबांइतका मी सराइत नव्हतो या लपवालपवीत ....

ब-याच वेळानं लक्षात आलं टाळीसाठी दिलेला बाबांचा हात माझ्या हातात तसाच होता, तोच हात दोन्ही हातात घेवुन मी त्यांना विचारलं, बाबा तुमच्या आईला मी डायबेटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या कायम स्वरुपी दिल्या माझ्याकडुन तर तुम्हाला इथं हे असं मागावं लागणार नाही right ?

म्हणाले, no doctor, तुम्ही भिका-यांसाठी काम करता, तीला तुम्ही गोळ्या देणार म्हणजे एका अर्थी ती भिकारीच झाली ना ? मी आहे अजुन समर्थ, तीचा मुलगा म्हणुन... मला कुणी भिकारी म्हणालं तरी चालेल पण तीला नाही....

OK Doctor, जावु मी आता ? घरी जावुन स्वयंपाक करायचा आहे अजुन ....

बाबा भिका-यांचा डॉक्टर म्हणुन नाही, तुमचा मुलगा समजुन घ्या ना आज्जीसाठी औषधं ....

हात सोडवत ते म्हणाले, डॉक्टर, आता या नात्यात मला अडकवु नका please, एक गेलाय सोडुन......

आज मला आशेला लावुन उद्या तुम्ही गेलात तर .... ? सहन करायची ताकत नाही राहिली आता.... !

असं म्हणंत ते कुबड्यांवर निघाले सुद्धा ..... जाताना हळुच डोक्यावर हात ठेवला, म्हणाले, काळजी घे बेटा स्वतःची.....

शब्दातुन त्यांनी मी लावलेलं मुलाचं नातं नाकारलं, पण डोक्यावरल्या हाताच्या गरम स्पर्शातुन जाणवलं, त्यांनी हे नातं मनोमन स्विकारलंय .....

या *वेड्या* माणसाला पाठिमागुनच नमस्कार करण्यासाठी माझे हात आपोआपच जुळले .....

हे क्षण मुद्दाम शेअर केले आहेत, जेणेकरुन आपल्याला कळावं, आपल्यापेक्षा वाइट परिस्थितीत जगणारे लोक आहेत खुप.... निदान यांच्याकडे पाहुन आपल्या दुःखाची झळ कमी होईल, आयुष्याकडे बघण्याचा आपला चष्मा तरी बदलेल.... 🙏

डॉक्टर पारसनिस, सोलापुर.

गाथा यशस्वीतांची

#सातारच्या _"#हणमंतराव_गायकवाड" या #कोट्याधीश व्यावसायिकाची
एक असामान्य यशोगाथा - #BVG_Group

माझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर
शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.
----------------------------------------
संसदेच्या हाऊसकीपिंगचं काम मिळालं आणि त्यानंतर ‘बीव्हीजी’चं नाव पसरतच गेलं.
पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं मिळाली. पुढं पंतप्रधानांचं निवास.
तिथं बागेतला धूळ बसून काळा झालेला रस्ता पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केली.
मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.
आज ‘बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार.
अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत!
विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर,
ओएनजीसी, आयटीसी. कितीतरी. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था आहेत.
कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच.’’

“ माझ्या सभोवताली पैशावर
निजलेले उडय़ा मारणारे
गगनचुंबीत राहणारे
कोटय़धीश-अब्जाधीश
मीही माझ्या ध्रुवावर
सर्वापेक्षा उंचावर
जाण्यासाठी तप करणारा
जेथून कोणीच मला
पैशात तोलू शकणार नाही
भले मी निष्कांचन राहीन
पण ध्रुवावर जरूर जाईन !’’

हो. मी ध्रुवावर जायचं पक्कं केलं होतं. कसं? कधी? माहीत नव्हतं. खिशात पैसा नव्हता, मार्गही माहीत नव्हता, पण जायचं होतं, हे निश्चित! त्यावेळची ही माझी कविता.

मी पुण्यात बिबवेवाडीतल्या व्हीआयटी कॉलेजात होतो. इंजिनीअरींगचे शिक्षण घेत होतो. वसतिगृहात राहायचो. त्याआधी फुगेवाडी ते बिबवेवाडी हे रोजचं अंतर सायकलवरून कापायचो. वेळ खूप जात होता. म्हणून वसतिगृहात राहायचं ठरवलं. पण महिन्याचं ३०० रुपयांचं भाडं देण्याची ऐपत नव्हती. प्राचार्य खाडिलकर सरांना भेटलो. त्यांनी २५ रुपयांमध्ये राहायची परवानगी दिली. माझी इलेक्ट्रिकची शेगडी होती. तिच्यावर भात शिजवायचो. खालून करपायचा, वरून कच्चा. मधला काढून खायचो. इतर पोरं टिंगल करायची. ती कॅन्टीन, स्वीट मार्टमधून खायला आणायची. पाटर्य़ा करायची. मला रोजच्या भाकरीची भ्रांत होती.

दहापैकी दोन पोरं मदत करायची. शनिवार-रविवारी पार्टीला जायची, मग त्यांच्या जागी मला मेसला जेवायची संधी मिळायची. बाकी पोरं मजा पाहायची.. तेव्हा धडा शिकलो- तुमच्याकडं पैसा असेल तर हजारो लोक जवळ येतात, नसेल तर मजा पाहतात. लहानपणी प्रेरणा मिळावं असं वातावरण आजूबाजूला नव्हतं. पण नेहमीच मोठी स्वप्नं पाहायचो. हे कुठून आलं असेल? आता आठवतं, लहानपणी वडील, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं ऐकायला न्यायचे. व्याख्यानांचे विषय असायचे- शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.

माझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर. वडील सातारच्या न्यायालयात क्लार्क. तोकडा पगार. ते सतत आजारी असायचे. आई-वडील, मी, धाकटा भाऊ भाडय़ाच्या खोलीत राहायचो. घरात लाइट नव्हती. चौथीत स्कॉलरशिप मिळाली. वर्गातल्या हुशार-श्रीमंत मुलांना मिळाली नव्हती, मला मिळाली. आत्मविश्वास वाढला. वडिलांनी शिक्षणासाठी पुण्यात आणलं. मुक्काम पोस्ट- फुगेवाडी. रामचंद्र फुगे चाळ. १० बाय १० ची खोली. वडिलांना जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली. आजारपण सुरूच होतं. ते आजारी पडले की तीन-चार महिने बरे व्हायचे नाहीत. ससून, रुबी, बुधराणी, केईएम, िपपरीचं चव्हाण रुग्णालय फिरायचो. दरम्यान, आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली. तरीपण पैशाची चणचण असायचीच. पैशाची गरज पडली की आई कानातला दागिना, मंगळसूत्र सोनाराकडं तारण ठेवून व्याजानं ५००-१००० रुपये घ्यायची.

माझं नूमवि, मॉडर्न हायस्कूलला शिक्षण झालं. मी वर्गात हुशार. गणितात तर पैकीच्या पैकी मार्क पडायचे. मॉडर्नमध्ये गणिताच्या रासकर सरांचा मी आवडता विद्यार्थी. ते कधीच पैकीच्या पैकी मार्क द्यायचे नाहीत, पण माझा एक मार्क कुठं कापायचा, हा त्यांना प्रश्न पडायचा. या गणितानंच मला उभं केलं. कारण आयुष्यात गणितच तुमच्या कामी येतं.

दहावीत चांगले मार्क मिळाले. आईच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी सुचवलं- डिप्लोमाला घाला. मग गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये गेलो. सायकलने जायचो. याच काळात वडील गेले. त्यांचं वय होतं- ४५ वष्रे नि माझं १८.

वडिलांना कपडय़ांची हौस होती. त्यांना थ्री-पीस सूट आवडायचा. त्यांनी जाण्यापूर्वी महिनाभर आधी सूट शिवायला टाकला होता. ते गेल्यावर मी तो घेऊन आलो. त्या प्रसंगानं सांगितलं- ‘माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही.’ काहीशी विरक्ती आली. त्याच वेळी ठरवलं, काहीतरी वेगळं, इतरांसाठी करायचं. ‘भारत विकास प्रतिष्ठान’ (बीव्हीजी) या नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून दानशूरांकडून देणग्या घेऊन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणं सुरू केलं. शिक्षण सुरू असतानाच क्लास घेणं, सॉस-जॅमच्या बाटल्या विकणं, घरं रंगवून देणं अशी कामं घेणं सुरू केलं.

इंजिनीअर बनायचं होतं. त्यासाठी औरंगाबादला प्रवेश मिळत होता, पण आईच्या आग्रहाखातर पुण्यातच राहिलो. व्हीआयटीला प्रवेश मिळाला, पण फीसाठी आईने मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेतून १५ हजारांचं कर्ज काढलं. माझा रोजचा सायकल प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात वडिलांच्या सेवेतील काही रक्कम मिळाली. इतर काही पैसे जुळवून गुरव-िपपळे येथे प्लॉट घेतला. त्यावर घर बांधलं. पैशाची गरज होती. कॉलेजला प्रॅक्टिकलपुरतं जायचो. बाकी कामाच्या मागे लागलो.

तेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमचं काम सुरू होतं. एका एजन्सीकडं सिव्हिलची कामं होती. त्यांच्याकडं गेलो. माझं शिक्षण सुरू होतं इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचं आणि हे काम होतं सिव्हिलचं- काँक्रीटचा रस्ता करण्याचं. तीन लाख रुपयांचं कंत्राट होतं. मलाही घर बांधण्याचा अनुभव होता. एजन्सीला सांगताना ‘नरोवा-कुंजरोवा’ केलं. ‘डिप्लोमा केलाय, इंजिनीअरींग करतोय’ असं सांगितलं. पण कुठल्या विषयाचा हे बोललोच नाही. काम मिळालं, ते सात दिवसांत पूर्ण करायचं होतं. खर्च जाऊन दीडेक लाख रुपये सुटणार होते. मजुरांची जुळवाजुळव केली. आपल्याला पैसे मिळणार म्हणून मजुरांनाही जास्त मजुरी दिली. महिला-पुरुष अशा एका जोडीला दीडशे रुपये मिळायचे. मी अडीचशे रुपये दिले. शिवाय सकाळी चहा-वडापाव आणि रात्री त्यांना लागणारं त्यांचं आवडतं पेय. मजूर मंडळी खूश होती. शंभर जोडय़ा, पन्नास गाढवं मिळून पाच दिवसांतच काम उरकलं.

त्याचदरम्यान लातूरचा भूकंप झाला, पैसे अडकले. मध्ये पाऊस झाला. त्यात आमचा रस्ता वाहून गेला. चूक समजली. लेव्हल केली नव्हती. डोक्याला हात लावला. रस्ता पुन्हा केल्याशिवाय पैसे मिळणार नव्हते. रस्ता करण्यासाठी हाती पैसे नव्हते. मजुरांना हे समजलं. ते मदतीला धावून आले. त्यांनी पैसे न घेता काम केलं. सिमेंट, वाळूसुद्धा त्यांनीच मिळवली. रस्ता उत्तम झाला. पैसे मिळाले. सर्वाचे पैसे भागवून वर फायदाही झाला. आयुष्यात असे प्रसंग येत गेले, तेव्हा निराश न होता स्वत:च स्वत:ला प्रेरणा देत राहतो. विवेकानंदांचे ते शब्द उपयोगी पडले. आजही पडतात..

‘जेव्हा दशदिशा अंधकाराने भरून गेल्या होत्या,
तेव्हा मी म्हणत होतो- झुंजा, झुंजत पुढे चला..
आज आशेच्या प्रकाशानं दशदिशा किंचित उजळल्या असतील, तरीदेखील तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला!’

पुढं इंजिनीअरींगसाठी वसतिगृहात गेलो. एक सत्य समजलं, ‘जग नेहमीच प्रचंड अपमान करतं. ते मनाला लावून घ्यायचं नाही. तुम्ही हिरे असाल, तरी ते तुम्हालाच सिद्ध करावं लागतं..’ १९९४ साली बी.टेक.ची पदवी मिळाली. ‘टेल्को’मध्ये (आताची ‘टाटा मोटर्स’) ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली. पगार- महिना सात हजार रुपये. टेल्को म्हणजे प्रतिष्ठेची नोकरी. तिथं नोकरी करत असतानाही घरं रंगवून देण्याची वगरे कामं सुरूच होती. कंपनीत भंगारमध्ये तांब्याच्या वापरलेल्या तारा होत्या. त्यांचा कंपनीसाठी उपयोग केला आणि कंपनीचे अडीच कोटी रुपये वाचवले. त्यामुळे माझ्यावरचा विश्वासही वाढला.

दरम्यान, माझ्या गावाकडून कामाच्या आशेनं मुलं माझ्याकडे येत होती. मी कर्मचारी असल्याने कंपनीतल्या कामाची कंत्राटं घेऊ शकत नव्हतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच उपाय सुचवला- एखाद्या संस्थेतर्फे कामं घ्या. मग ‘भारत विकास प्रतिष्ठान’द्वारे हाऊसकिपींगचं काम घेतलं. ही गोष्ट १९९७ मधली. इंडिया गाडीचा प्रकल्प उभा राहत होता. तो स्वच्छ ठेवण्याचं काम घेतलं. आठ लोक होते. त्यानंतर मात्र मागं वळून पाहिलंच नाही. वाट्टेल ते काम द्या, नाही म्हणायचं नाही. हे आमचं तत्त्व. तेच कामी आलं.

गावचा मित्र उमेश माने हा माझ्यावर विश्वास टाकणारा पहिला माणूस. त्यांनी प्रतिष्ठानच्या कामासाठी नोकरी सोडली. कंत्राटं मिळवणं, पैशाची जुळणी करणं हे माझं काम आणि काम करून घेणं ही उमेश माने यांची जबाबदारी. पहिल्या वर्षीची उलाढाल होती आठ लाख रुपये. पुढच्या वर्षी ती झाली ५६ लाख रुपये. गुणवत्ता, प्रामाणिकपणा, विश्वास आणि वेळेच्या आधी पूर्ण होणारं काम यामुळे आम्हाला काम देणारे लोकच आमची प्रसिद्धी करत होते. आपोआप कामं मिळत होती. १९९९ मध्ये लग्न झालं. पत्नी वैशालीने घरची जबाबदारी उचलली. मग नोकरी सोडून हे काम पूर्णवेळ करायला लागलो. पुढे जनरल इलेक्ट्रिकल्सच्या (जीई) प्लँटचं स्वच्छतेचं काम मिळालं. बंगळुरूला जावं लागणार होतं. विलंब न करता मी, उमेश आणि आठ कामगार तिथं धडकलो. आमचे प्रेरणास्रोत शिवाजी महाराज. त्यांनी दक्षिणेवर स्वारी केली होती. आम्हीसुद्धा त्यांच्याच मातीतले ना! कंपनीचं दोन दिवसांनी ओपनिंग होणार होतं. त्याआधी प्लँट चकाचक केला. कामाची गुणवत्ता पाहून लोक समाधानी होते. मग चेन्नई, हैदराबाद अशी इतर शहरांमधली कामं मिळाली. कामाला नाही म्हणत नव्हतोच. रेल्वे स्थानकं, विमानतळ, रुग्णालये यांच्या स्वच्छतेचं काम घेतलं.. विस्तार वाढत असताना कर्मचाऱ्यांबाबत एक सूत्र कायम ठेवलं. कामावर देखरेख करणारा सुपरवायझर गावातला, विश्वासाचा माणूस, ३० टक्के कर्मचारी पुण्याहून-गावाहून पाठवलेले आणि ७० टक्के स्थानिक कर्मचारी. त्यामुळे कुठंही कामात अडथळा आला नाही.. अजून सारं सुरळीत सुरू आहे.

आणि म्हणूनच असेल कदाचित, मी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झालीच. कधी तीन दिवसांतच, तर कधी १०-१५ वर्षांनी. १९९७ मध्ये पहिलं कंत्राट मिळालं तेव्हाच स्वप्न पाहिलं- आपल्याला संसदेच्या हाऊसकिपींगचं काम मिळालं तर.? तेव्हा माहीतही नव्हतं, तिथं काय पद्धत असते. पण २००३ साली हे स्वप्न पूर्ण झालं. ‘बीव्हीजी’चं नाव वाढत होतं. ते आता दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. संसदेच्या ग्रंथालयाचं कंत्राट मिळालं. देखभालीचं काम. तिथं श्रीनिवासन नावाचा शिस्तबद्ध आणि प्रामाणिक मुख्य अभियंता होता. त्याला भेटून विश्वास दिल्यावर काम मिळालं, पण ते सहा महिन्यांपुरतंच. चांगलं केलं तर पुढं सुरू ठेवणार, नाहीतर हाकलून देणार. त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यासाठी ४० लाख रुपयांची दर्जेदार यंत्रणा विकत घ्यायला लागणार होती. काम सुरू राहिलं नाही तर ही यंत्रणा पांढरा हत्ती ठरणार होती. पण स्वत:वर विश्वास होताच. काम सुरू केलं. ते सुरूच राहिलं. श्रीनिवासन खूश झाले. त्यांनी पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं दिली. पण सुरक्षेच्या कारणास्तव आत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ‘बीव्हीजी’चे कर्मचारी बाहेरचीच स्वच्छता पाहत होते. बाहेरचा परिसर इतका स्वच्छ पाहून खासदारांनीच याबाबत विचारणा केली. मग थेट लोकसभेच्या सभापतींनी परवानगी दिली, तेव्हा ‘बीव्हीजी’चा लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश झाला. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेत चालण्यासाठी लाल दगडांचा मार्ग होता. तो धूळ बसून काळा झाला होता. तो पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केल्यासारखं अनेकांचा विश्वास बसत गेला. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.. दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या वास्तूला ‘बीव्हीजी’ची सेवा मिळू लागली. आज एकटय़ा दिल्लीत ‘बीव्हीजी’चे नऊ हजार लोक काम करतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी.. कितीतरी ग्राहक आहेत. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था, आस्थापना ग्राहक आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच. आता विविध क्षेत्रांमध्ये उतरलोय.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस रुग्णवाहिकेचे (डायल १०८) कंत्राट ‘बीव्हीजी’कडं आहे. त्यासाठी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका राज्यभर धावत आहेत. याशिवाय लँडस्केप-गार्डनिंग, टेक्निकल सर्व्हिसेस, सुरक्षा सेवा, औद्योगिक सेवा, सोलार पार्क, एलईडी लायटिंग, सोलार पंप, प्लास्टिकपासून इंधन, फूड पार्क अशा अनेक क्षेत्रांत जम बसवतो आहे. ‘नॅशनल इन्नोव्हेशन फाउंडेशन’शी भागीदारी केली आहे. त्याद्वारे विविध व्याधींवरील चहा, आरोग्यदायी उत्पादने, शेळीचे दूध, उंटणीचे दूध, जैविक खते, जैविक कीटकनाशके अशा अनेक उत्पादनांमध्ये प्रवेश केला आहे.

मी इतके सारे उद्योग कसे करू शकतो? कारण माझ्या वाटचालीत विविध टप्प्यांवर भेटलेले असंख्य लोक आज माझ्यासोबत ‘बीव्हीजी’मध्ये आहेत. मी कार्यक्षम माणसं शोधतो आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो. बस्स.. हा संच वाढतो आहे, उत्तरोत्तर अधिकच वाढत जाईल. ‘बीव्हीजी’चं ब्रीदवाक्यच आहे- ‘ह्य़ुमॅनिटी अहेड!’

२०२० पर्यंतचे उद्दिष्ट आहे दोन लाख कर्मचारी आणि कंपनीची १० हजार कोटींची उलाढाल! हे सर्व करताना माझ्या कर्मचाऱ्यांचा, सामान्य माणसांचा विचार असतो. कर्मचाऱ्याला इतर कंपन्यांपेक्षा दोन पैसे जास्तच मिळतात. त्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून इतर क्षेत्रांत प्रवेश करतोय. शासनाच्या विविध योजनांतून माझ्या ६०० कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात घरे देऊ शकलो. जे.आर.डी.टाटा हे उद्योगातील आदर्श आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकलो- सामाजिक बांधीलकी, कामाची पद्धत, एकजीनसीपणा. त्यामुळेच ‘बीव्हीजी’च्या मुख्यालयाला (चिंचवड, पुणे) नाव दिलंय- ‘बीव्हीजी हाऊस’! टाटांच्या ‘बॉम्बे हाऊस’चा हा प्रभाव!

लोकांचा विचार करत गेलो की आपोआप पैसा मिळतो. मी हेच करत आलो. त्यामुळे मीसुद्धा मोठा झालो. कधी गैर काम करत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, कोणाला फॉलो करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, संधी मिळाली तरी अनैसर्गीक नफ्याच्या मागे लागत नाही. त्यामुळे कधीही डोळे मिटले तरी शांत झोप लागते.

सर्व थरांत लहानमोठय़ा लोकांमध्ये वावरतो. राजकीय व्यक्ती, आध्यात्मिक गुरू, प्रशासकीय अधिकारी सर्वाशी मैत्री आहे. त्यामुळे अनेकांचे गरसमज होतात, पण कोण काय म्हणतं याकडं लक्ष न देता पुढं जात राहतो. त्याच वेळी कामगाराशी खांद्यावर हात टाकून बोलतो. त्यात काही वेगळं- विशेष वाटत नाही. आता इतकी पत कमावली आहे की, शेकडो कोटींचं कर्ज द्यायला बँका तयार आहेत. पण पूर्वी आईसाठी फ्रीज, वाॅशिंग मशीन घ्यायला कोणी कर्ज देत नव्हतं, ही परिस्थितीही विसरलेलो नाही. म्हणून जमिनीवरूनच चालतो.

खरंतर आता थांबलो तरी वैयक्तिक काही बिघडणार नाही. पण लोकांना जोडणं हे माझं व्यसन आहे. शिवाय आजच्या जगातही सरळ मार्गाने मोठं होता येतं, इतरांनाही मोठं करता येतं, हे दाखवून द्यायचंय. त्यासाठी मला कार्यरत राहावंच लागेल. कारण माझा आजही तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला 

Monday, 19 March 2018

जागतिक चिमणी दिवस

भारतात सर्वात जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून चिमणीपरिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.
चिमणी
House sparrowIII.jpg
शास्त्रीय नावसिकोनिया सिकोनिया
(Passer domesticus)
कुळ
(Passeridae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिशहाऊस स्पॅरो
(House Sparrow)
संस्कृतचटक, वार्तिका, गृहनीड, पोतकी
हिंदीचिडिया, गौरय्या

हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत, तसेच भारतभरसर्वत्र आढळतो तसेच बांगलादेशपाकिस्तानश्रीलंकाम्यानमारसह इतरही देशात आढळतो. भारतात काश्मिरी आणि उत्तर-पश्चिमी अशा याच्या किमान दोन उपजातीही आढळतात.
माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढर्‍या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशके जगली.[१]त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी २३ वर्षे जगली.[२]
चिमण्यांच्या बाबतीत अशी एक वदंता आहे की, एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले, तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामधे घेत नाहीत व चोचीने मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात; प्रसंगी,जीव देखील घेतात.संदर्भ हवा ]
अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विषेशत: शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युतचुंबकीय उत्सर्जन,[३] आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.[४][५]
२० मार्च हा दिवस दरवर्षी "जागतिक चिमणी" दिवस म्हणून पाळला जातो.
चिमण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे तरी आपण पर्यावरण वाचवुया आणि चिमण्या वाढवुय



चिऊताई, चिऊताई दार उघड !-मंगेश पाडगावकर

चिऊताई, चिऊताई दार उघड !
 
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार उघड , दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील ?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो,
तसे फाटे असतात !

गाणा~या मैना असतात ;
पांढरे शुभ्र बगळे असतात ;
कधी कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात !

कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील !
तरी सुध्दा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं ?
आपलं सुध्दा आपल्याला
होत असतं पारखं !

मोर धुन्द नाचतो म्हणुन
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकीळ सुंदर गातो म्हणुन
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फुल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मुल असतं !

फुलणा~या या फुलासाठी,
खेळणा~या या मुलासाठी

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळी मधे
काहीसुध्दा घडत नाही !
आपलं दार बंद म्हणुन
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करु लागतो !
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो !

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं !
चिऊताई ,चिऊताई,
तुला काहीच कळलं नाही !
तुझं घर बंद होतं,
डोळे असुन अंध होतं !

बंद घरात बसुन कसं चालेल?
जगावरती रुसुन कसं चालेल?

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड !

-मंगेश पाडगावकर

Monday, 26 February 2018

मराठी दिन विशेष

आज 27 फेब्रुवारी.. *मराठी भाषा दिन*..


स्वतःची *सही* सुद्धा मराठीत नसणाऱ्या, पण मराठीची उगीच तळमळ बाळगणाऱ्या तमाम मराठी बांधवांस *थोर थोर* शुभेच्छा..

A B C D सहज म्हणू शकणाऱ्या, पण मराठी शाळेत शिकूनसुद्धा अजूनही क ख ग घ पूर्ण म्हणता न येणाऱ्या मायमराठीच्या अडाणी लेकरांना *कोपरापासून* शुभेच्छा..

मॉलमध्ये गेल्यावर 'ये कितने का है ?' किंवा 'हाऊ मच इट कॉस्टस ?' असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या *बळेच* शुभेच्छा ...

आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही *कोरडया* शुभेच्छा..

व्हाट्सऍप वर लिहिताना केवळ 'कंटाळा येतो म्हणून' विचित्र मिंग्लिश भाषा वापरणाऱ्या नेटकऱ्यांना *धन्य धन्य* शुभेच्छा..

फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणा-या किंवा टीसी ('काळजी घे' चे सूक्ष्म रूप), जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणा-या लोकांनाही *ओढूनताणून* शुभेच्छा...

टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्या अंगावर झुरळ पालींचा वर्षाव होईल असं समजणा-या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय?..त्यांनाही आज *यथेच्छ* शुभेच्छा..

सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचे-यात, बँकेत किंवा ईतर स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना, 'मराठीचा किमान एका संधीसाठीही' वापर न करणा-या मराठी माणसासही *आभाळभर* शुभेच्छा...

वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणा-या, कधीही मराठी नाटक - चित्रपट न पाहणा-या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणा-या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणा-या, मराठी नियतकालिकाशी संबंध नसणाऱ्या, तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या *अवघड* शुभेच्छा..

मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणा-या, पण इंग्रजी स्पेलिंग तोंडपाठ करणाऱ्या बाळबोध जनतेस मराठी दिनाच्या *शुष्क* शुभेच्छा..

फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणा-या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या *जरतारी* शुभेच्छा...

मराठी दिनाचे ढोंग न करता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणा-या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र मराठी दिनाच्या *मनःपूर्वक* शुभेच्छा...

*आपण मराठीभाषेचा सिंहनाद करणार आहोत की पिपाणी वाजवणार आहोत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मराठी भाषिक आणि मराठी प्रेमी या नात्याने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मी केवळ शुभेच्छा देतोय..*

*मराठी भाषा ही केवळ वाचण्या बोलण्यापुरती नसून ती जगण्याची आसक्ती आहे ज्या दिवशी कळेल तो सुदिनच म्हणावा लागेल..*

मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !!

🙏🏻
[2/27, 7:18 AM] ‪+91 90756 34824‬: *दिव्य मराठी*

मराठमोळे बोल बोलतो
माय शारदा मनात भजतो

साहित्याच्या प्रांगणात मी
संतांकडचे ज्ञान मागतो

जनमानसही ओळखणारे
भाव मराठी  नित्य रुजवतो

दिव्य मराठी साहित्यातून
शब्द प्रवाही अर्थ वाहतो

ग्रंथ  जाहले  मित्र जगाचे
कुणी तयाना देव मानतो

परंपरांच्या संस्कारानी
मने मराठी  घट्ट बांधतो

महाराष्ट्र  मज माझा प्यारा
गीत मराठी  गात चालतो

भाषा माझी माय मराठी
बोट पकडुनी तिचे धावतो

तुकाराम पाटील
पिंपरी पुणे १७
[2/27, 7:52 AM] ‪+91 89569 64552‬: *२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस, मराठी गौरव दिवस*

मराठी मातृभाषेने आपल्याला बोलायला शिकविले, लिहायला शिकवले, आपले विचार व्यक्त करायला शिकवले त्या मातृप्रति आपला असलेला आदर, निष्ठा व्यक्त करण्याचा आजचा दिवस. मराठी भाषा ज्यांच्या लेखणीमुळे इतकी समृद्ध झाली ते म्हणजे *विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज* यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो.

*कुसुमाग्रंजाचा अल्प परिचय* :

जन्म : २७ फेब्रुवारी १९१२, (आजपासून १०६ वर्षांपूर्वी) पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू : 10 मार्च १९९९ (वयाच्या ८७ व्या वर्षी), नाशिक, महाराष्ट्र.
राष्ट्रीयत्व : भारत
कार्यक्षेत्र : साहित्यकार, नाटककार, कादंबरीकार, पटकथालेखक, समीक्षक, कवी.
कुसुमाग्रजांनी आपले प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथून व माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूल जे आता जे.एस. रुंगठा माध्यमिक शाळा म्हणून ओळखली जाते येथून पूर्ण केले. मुंबई विद्यापीठातून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.

*करियर* :

कुसुमाग्रज एच. पी. टी महाविद्यालयात असताना त्यांच्या कविता ‘रत्नाकर’ नावाच्या मासिकातून प्रकाशित व्हायच्या. त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी अस्पृशांच्या काळाराम मंदिरच्या प्रवेशाबाबतच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. १९३३ साली कुसुमाग्रजांनी ‘ध्रुव मंडळ’ स्थापन केले आणि ‘नवा मनु’ या वृत्तपत्रासाठी लेखन सुरु केले. याचा वर्षी त्यांचा पहिला कवितासंग्रह *‘जीवन लहरी’* प्रकाशित झाला. १९३४ साली कुसुमाग्रजांनी इंग्रजी आणि मराठी या विषयांमधुन कला शाखेची पदवी संपादन केली.

१९३६ साली कुसुमाग्रजांनी ‘सती सुलोचना’ या चित्रपटासाठी पटकथा लिहून या चित्रपटात एक भूमिकादेखील केली होती. ‘साप्ताहिक प्रभा’, दैनिक प्रभात’, ‘सारथी’, ‘धनुर्धारी’, ‘नवयुग’ यांसारख्या वृत्पात्रांसाठी, साप्ताहिकांसाठी कुसुमाग्रज लिहित होते. १९४२ हे वर्ष कुसुमाग्रज यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरले, कारण यावर्षी मराठी साहित्यातील जनक म्हणून ओळखले जाणारे वी. स. खांडेकर यांनी कुसुमाग्रज यांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला व त्याबद्दल पुढील उद्गार काढले, “त्याचे शब्द सामाजिक असंतोष निर्माण करतात, पण जुन्या जगाला नवीन मार्ग दाखविण्याचा विश्वास निर्माण करतात”. १९४६ साली कुसुमाग्रज यांनी आपली पहिली कादंबरी ‘वैष्णव’ व पहिले नाटक ‘दूरचे दिवे’ लिहिले.

*कुसुमाग्रजांचे लिखित साहित्य* :

अ) *कवितासंग्रह* : १.विशाखा(१९४२) २.हिमरेषा(१९६४) ३.छंदोमयी(१९८२) ४.जीवनलहरी(१९३३) ५.जाईचा कुंज(१९३६) ६.समिधा(१९४७) ७.कणा(१९५२) ८.किनारा(१९५२) ९.मराठी माती(१९६०) १०.वादळवेल(१९६९) ११.रसयात्रा(१९६९) १२.मुक्तायन(१९८४) १३.श्रावण(१९८५) १४.प्रवासी पक्षी(१९८९) १५.पाथेय(१९८९) १६.मेघदूत(१९५६) १७.स्वागत(१९६२) १८.बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज(१९८९) १९. काव्यवाहिनी २०.साहित्यसुवर्णा २१.फुलराणी २२.पिंपळपान २३.चंदनवेल

ब)*कथासंग्रह* : फुलवाली, छोटे आणि मोठे, सतारीचे बोल आणि इतर कथा, काही वृद्ध काही तरुण, प्रेम आणि मंजर, आहे आणि नाही, विरामचिन्हे, प्रतिसाद, एकाकी तारा, वाटेवरल्या सावल्या, शेक्सपिअरच्या शोधात, रूपरेषा, कुसुनाग्रंजाच्या बारा कथा, जादूची होडी.

क) *नाटके* : ययाती आणि देवयानी, वीज म्हणली धरतीला, नटसम्राट, दूरचे दिवे, दुसरा पेशवा, वैजयंती, कौंतेय, राजमुकुट, आमचे नाव बाबुराव, विदुषक, एक होती वाघीण, आनंद, मुख्यमंत्री, चंद्र जिथे उगवत नाही, महंत, कैकेयी

ड)*एकांकिका* : दिवाणी दावा, देवाचे घर, प्रकाशी दारे, संघर्ष, बेट, नाटक बसत आहे आणि इतर एकांकिका

इ)*कादंबऱ्या* : वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर.

*पुरस्कार आणि सन्मान* :

१. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष (१९६०)
२. ‘मराठी माती’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६०)
३. ‘स्वागत’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६२)
४. ‘हिमरेषा’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६४)
५. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, गोवा अध्यक्ष (१९६५)
६. राम गणेश गडकरी पुरस्कार (१९६५)
७. ‘ययाती आणि देवयानी’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६६)
८. ‘वीज म्हणाली धरतीला’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६७)
९. मराठी नाट्य संमेलन, कोल्हापूर चे अध्यक्ष (१९७०)
१०. ‘नटसम्राट’ साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९७१)
११. ‘नटसम्राट, साठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९७४)
१२. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’ (१९८५)
१३. पुणे विद्यापीठातर्फे D.Litt ही पदवी प्रदान (१९८६)
१४. ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७)
१५. संगीत नाट्य लेखन पुरस्कार (१९८८)
१६. जागतिक मराठी परिषद, मुंबईचे अध्यक्ष (१९८९)
१७. ‘पद्मभूषण’ पुरस्कार (१९९१)
१८. एका ताऱ्याला ’कुसुमाग्रज’ हे नाव दिले. (१९९६ )
सलाम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सुप्रभात.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानमतो मराठी

दंगते मराठी, रंगते मराठी,
स्पंदते मराठी, गर्जते मराठी
गुंजते मराठी, गर्जते मराठी.
       
     कवीवर्य सुरेश भट.

Thursday, 22 February 2018

*गाडगे महाराज

*गाडगे महाराज*

*वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक*

*जन्मदिन : फेब्रुवारी २३, १८७६*

गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

क्वश्चनमार्क..

"क्वश्चनमार्क..."

'चेहरा ओळखण्यापलीकडे गेलाय.
अर्धा किलोमीटर तरी ,ट्रकबरोबर घासत गेलीय बाॅडी.
भोसले , काही आयडेंटीटीफिकेशन होतंय का, बघा.
अन् बाॅडी  ससूनलाला पाठवून द्या.
अजून श्वास चालूय.
वाचेल कदाचित.'
पी. एस. आय. जमादार, पटाटा अॅक्शन घेत होते.
'साहेब , पँटमधल्या वाॅलेटच्या चिंध्या झाल्या आहेत.
शर्टच्या खिशातल्या मोबाईलच्या ठिकर्या.
आॅफिसबॅगमधे एक बिल सापडलंय.
मोबाईल परचेजचं.
त्यावर नाव आणि अॅड्रेस आहे.
ए. ए. कुलकर्णी नाव आहे.
1763 , सदाशिव , पुणे 30 पत्ताय.'
' ताबडतोब त्या पत्त्यावर माणूस पाठवा.
नातेवाईकांना बोलावून घ्या.
मी चौकीवर जातोय.
आज खरं तर लवकर जायचं होतं.
लेकीचा वाढदिवस होता.
आता जमायचं नाही बहुतेक.
तुम्ही ससूनलाच थांबा.
मला तसा रिपोर्ट करा.'
जमादार टोकटोक बूट वाजवत, चौकीवर निघून गेले.
1763 ,सदाशिव , पुणे 30.
घराचं नाव सौभाग्य सदन.
आता कुठलं ऊरलंय सौभाग्य ?
सौभाग्य वाचव रे देवा , या घरचं.
तरी बरं , घराला काय घडलंय, याची खबरच नाहीये.
अरविंद आत्माराम कुलकर्णी.
वय वर्ष 63.
अक्षर प्रिंटींग प्रेसचे मालक.
गेली चाळीस वर्ष प्रिंटींगच्या धंद्यात आहेत.
या धंद्यातली ही आता चौथी पिढी.
खरं तर पहिल्यांदा वाड्यातच प्रेस होता.
आता जागा कमी पडायला लागली.
पाच वर्षापूर्वी प्रेस धायरीला हलवलाय.
सकाळी नऊ ते रात्री नऊ.
अरविंदराव मु. पो. धायरी.
दिवसभर प्रेस नाहीतर...
क्लायेंटकडे चकरा.
अॅक्टिव्हा वापरायचे.
पुढे गठ्ठे ठेवायला सोयीची.
दिवसभर दोघांचंही भरपूर रनिंग व्हायचं.
नुकताच अनुजही जाॅईन झालाय.
अनुज अरविंद कुलकर्णी.
बी. ई. ( प्रींटींग टेक्नाॅलाॅजी )
धंद्याला लागलेलं नवं ईन्जीन.
डबल ईन्जीन , डबल टर्नओव्हर.
धंदा जोरात चाललाय.
अनुजही अॅक्टिव्हाच वापरायचा.
कुलकर्णी फॅमिली, अॅक्टिव्हाचे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर होणार.
घरी गडबड.
अनुजची बायको आणि आई.
किचनमधे आॅन ड्यूटी.
पुर्या तळणं चाललेलं.
अनुज आणि आरतीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस.
त्यात आरती दोन महिन्याची पोटुशी.
आनंदघन बरसायची वाट बघतायेत.
आज तरी..
नक्की.
अनुज आणि अरविंद, आज नक्की लवकर घरी येणार.
घर दरवाजाकडे डोळे लावून, दोघांची वाट बघतंय.
फोनच आला.
' मी धायरी पुलीस स्टेशनमधून, काॅस्न्टेबल भोसले बोलतोय.
एका अॅक्टिव्हाला डंपरनं ऊडवलंय.
ए. ए. कुलकर्णी नावाची चिठ्ठी सापडलीय.
ताबडतोब ससूनला या.
कंडीशन सिरीयस आहे.'
अनुजच्या आईनं फोन घेतलेला.
कानापर्यंत पोचलेले शब्द.
मेंदूत शिरायला तयारच नव्हते.
अनुजची आई मटकन् खाली बसली.
' अॅक्सीडेन्ट झालाय.'
ती एवढचं बोलली.
आरतीचं चॅनल म्यूट.
ती फ्रीजींग पाॅईंटला पोचलेली.
संवेदना बधीर झालेल्या.
ती कोसळलीच.
अनुजची आई धीराची.
शेजारी हाक मारली.
शेजारचा रवी.
त्याला बोलावला.
तो लगोलग ससूनला पळाला.
अनुजची आई , आरतीच्या ऊशाशी.
घरचा गणपती पाण्यात.
'कोण असेल नक्की ?
अनुज का अरविंद. ?'
मेंदूचा भुगा.
'पोरीचं सौभाग्य सांभाळ रे देवा.
मग माझं सौभाग्य दावणीला...
स्वार्थ की त्याग ?
प्रत्येक माणूस आपलंच.
डावं ऊजवं काय करणार ?
कुणी का असेना.
सिद्धीविनायका , सांभाळ रे बाबा '
तेवढ्यात दारातून अरविंदराव घरात शिरले.
सहज.
काहीच माहिती नसल्यासारखे.
' म्हणजे , अनुजला..'
आता मात्र अनुजच्या आईचा धीर सुटला.
तीनं हंबरडा फोडला.
' अरे , नक्की काय झालंय ?
सांगेल का कुणी ?"
भिजलेल्या अश्रूंनी ,दर्दभरी दास्तान ऐकवली.
अरविंदरावांना बघितलं अन् ..
आरतीची ऊरलीसुरली शुद्ध हरपली.
अरविंदरावांच्या हातापायातलं त्राण गेलेलं.
थांबून चालणारच नव्हतं.
' तू पोरीला सांभाळ.
मी ससूनला जातोय.
धीर सोडू नकोस."
अरविंदराव दरवाजातच थबकले.
हाशहुश्श करत ,अनुज घरात शिरत होतं.
त्सुनामीच आली होती घरावर.
त्यातून वाचलेलं ते चार जीव.
आई , बाबा ..
टाकलेले निश्वास.
परमेश्वराचे आभार मानणारे डोळे.
डोळ्यातून धुवाधार नायगारा.
' आरती , डोळे ऊघड.
अनुज आलाय.'
काळझोपेतून जागं व्हावं, तशी आरती एकदम जागी.
डोळ्यांना दिसणारा अनुज.
डोळ्यात अवघं विश्व सामावलेलं.
अनुज..
तेहतीस कोटी देवांना,
कोटी कोटी थँक्स म्हणणारे ते डोळे.
धडपडत ती अनुजच्या मिठीत शिरली.
अनुजच्या चेहर्यावरचा क्वश्चनमार्क तसाच.
काहीच कळेना.
बाबांनी सगळी स्टोरी रीपीट टेलीकास्ट केली.
" म्हणजे बनसोडचा अॅक्सीडेन्ट झालाय.
आरती , तुझ्यासाठी नवीन सेलफोन घ्यायचा होता.
मग घरी यायला ऊशीर झाला असता.
बनसोड म्हणाला , साहेब तुम्ही घरी जा.
मी घेवून येतो.
म्हणलं गाडी घेवून जा.
मी रिक्षाने जातो.
बावीस वर्षाचा कोवळा पोर.
वर्षभरच झालंय कामाला लागून.
त्याच्या आईबापाला काय तोंड दाखवू मी ?"
आता अनुज हडबडला.
पुन्हा फोन किणकीणला.
" काका , रवी बोलतोय.
हा आपला अनुज नाहीये.
दुसराच कुणीतरी.
गाडी मात्र आपलीच आहे.
पण काळजी नको.
ही ईज आऊट आॅफ डेंजर.
अनुज पोचला का घरी ?"
' हो..
आम्ही येतोच आहोत तिकडे "
मणभर वजनाचा क्वश्चनमार्क.
सगळ्यांच्या डोळ्यांना खुपणारा.
पुसला गेला एकदाचा.
परमेश्वरा ,
ज्याचं ऊत्तर माहीत नाही,
असा प्रश्न नको टाकूस रे बाबा , आयुष्याच्या पेपरात.
अशीच कृपा राहू दे रे देवा....

..... कौस्तुभ केळकर नगरवाला.

* माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.

आपली राज्य आणि संत तुलसीदास

काय आश्चर्य पहा ना......   भारतातील 29 राज्यांची नावे... *श्री. संत तुलसीदास* यांच्या एका दोह्या मध्ये तंतोतंत सापडते....

*राम नाम जपते अत्रि मत गुसिआउ।*
*पंक में उगोहमि अहि के छबि झाउ।।*

----------------------!------------------   
रा - राजस्थान      ! पं- पंजाब
म - महाराष्ट्र         ! क- कर्नाटक
ना - नागालैंड       ! मे- मेघालय
म - मणिपुर         ! उ- उत्तराखंड
ज - जम्मू कश्मीर  ! गो- गोवा
प - पश्चिम बंगाल   ! ह- हरियाणा
ते - तेलंगाना         ! मि- मिजोरम
अ - असम   !   अ- अरुणाचल प्रदेश
त्रि - त्रिपुरा     ! हि- हिमाचल प्रदेश
म - मध्य प्रदेश     ! के- केरल
त - तमिलनाडु     ! छ- छत्तीसगढ़
गु - गुजरात         ! बि- बिहार 
सि - सिक्किम     ! झा- झारखंड
आ- आंध्र प्रदेश   ! उ- उड़ीसा
उ - उत्तर प्रदेश    !


कृतीयुक्त गीते

🌹🖊🕉🇮🇳: कृतीयुक्त गीते--

*१)एक फुगा अहा एक फुगा*

गंम्पू ने आणले साबणाचे फुगे - 2
छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे - 2
एक फुगा अहा एक फुगा - 2

एक फुगा बाबाच्या चष्म्यावर बसला
गंम्पूला तो डोळाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले ......

एक फुगा आजीच्या गालावर बसला
गंम्पूला तो लाडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले .....

एक फुगा ताईच्या वेणीवर बसला
गंम्पूला तो चेंडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले .....

*संकलन : नासा येवतीकर, धर्माबाद*
[🌹🖊🕉🇮🇳:

२)शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरुजी
गुरुजी छडी नका मारुजी
लागतंय हातावर

औंदाच ग वरीस बाई मी सहाव गाठलं ग
शिक्षण घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकील ग
रडू येतंय मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
        गुरुजी छडी नका

शब्द वाचता वाचता माझी मॅन दुखू लागली ग
अंक लिहता लिहता माझी बोट दुखू लागली ग
उलटे अक्षर काढले जरी
आरसा त्याला उलटे करी
     गुरुजी छडी नका मारुजी


संकलक:तोटावाड एस
🌹🖊🕉🇮🇳:

३)उरात होतय धडधड
पाटी पूस्तक हातात आलि
अंगात भरलय वार
शाळेची घंटा झाली
अता अधिर झालोया
मग तयार झालोया
पाटि दप्तर घेवून शाळेत आलोया
वाचतय बूंगाट लिहतय झिंगाट
रंगात आलोया
वाचलय

झिंगझिंग झिंग झिंगाट

झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग

समद्या शाळेला झालि
माझ्या वाचनाचि घाई |२
कधि येणार हो बाई
माला आ ,म्हणजे आई
अता खेळून आलोया
लई वाचून आलोया
दूरून माळा वरून
तूमच्या शाळेत आलोया
ढिंच्याक जोरात
डिजिटल वर्गात
वाचाया आलोया
वाचलय
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग


अता उताविळ झालो
चित्र पाहून रंगलो
श्बद वाचून दंगलो
पट्य्या वाचून हसलो

अता तयार झालोया
तूमच्या वर्गात आलोया

लई खेळून वाचून या वर्गात आलूया

समद्या पोरात म्या लई जोरात वाचून आलोया

वाचल झिंग झिंग झिंगाट ......
...........,झिंग झिंग झिंग।।

🌹🖊🕉🇮🇳: *👩‍⚖👩

४)‍⚖सुंदरा👩‍⚖👩‍⚖*
➖➖➖➖➖➖➖
सुंदरा शाळेला येशील काय

मला शर्ट पण नाही
 मला स्कर्ट पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll 1ll

मला पुस्तक पण नाही
मला दप्तर पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll2ll

मला पेन पण नाही
मला पेंसिल पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll 3ll

तुला शर्ट पण देईल
तुला स्कर्ट पण देईल
तुला पुस्तक पण देईल
तुला दप्तरपण देईल
तुला पेन पण देईल
तुला पेंसिल पण देईल

तु येणार का शाळेला
सुंदरा शाळेला येशील का

मी येणार शाळेला ॥



🌹🖊🕉🇮🇳:
" मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण" घेऊन उत्तम 'सुलभक' म्हणून तयार झालेल्या गुरुजींनी मुलांना शिकवल्यानंतर मुलांमध्ये आत्मविश्‍वास आला आणि...

*"वाचणार रे वाचणार 100% वाचणार"*

हे मुलाच्या बाबतीत साध्य झाल्यामुळे आत्मविश्वास आलेला मुलगा गुरुजींना म्हणतो
*"द्या हो गुरुजी पुस्तक,वाचून दाखवतो खडखडा"* .
 हा आत्मविश्वास मुलाच्या मनात निर्माण झालेला आहे आणि तो या '

 *प्रेरणा गीतातून*  गुरुजींना मुलगा सांगत आहे.

       ५) *प्रेरणा गीत*

*द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून*
*दाखवतो खडखडा*

कागद फाडून चेंडू केले,
वास,रंग,चव ओळखू आले
ध्वनी डबीतील चुकलो नाही
वर्णन, गप्पा, संवाद झाले
अशा 'गुरु'ची वाट झाडतो
हाती घेऊन फडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥१॥

पूर्वी वाचन चुकत होतो,
काना मात्रा हुकत होतो
गुरुजींच्याही 'शाब्बास'किला
नेहमी नेहमी मुकत होतो
कृती करुनी हुशार झालो
भरलाय ज्ञानाचा घडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥2॥

गप्पा,गोष्टी,गाणी,कोडी
साम्य-भेद चित्रांची गाडी
बसल्या बसल्या जोडू शकतो
समान अक्षरांची जोडी
'व' चे शब्द सांगू का मी?
लिहा फळ्यावर 'वडा'
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥३॥

'वाचन पाठ' मी वाचू शकतो
गाणी म्हणत नाचू शकतो
वाचन धेयापर्यंत आता,
न थांबता मी पोहचू शकतो
येऊ द्या साहेब,घेऊ द्या पुस्तक,
देऊ द्या कुठलाही धडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥४॥

🌹🖊🕉🇮🇳:
६)*शरीराची ओळख*

ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
कोपरे दाखवा
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
कोपरे दाखवा
मान वाकडी करा
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
कोपरे दाखवा
मान वाकडी करा
गुडघ्यात वाका
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

*संकलन : नासा येवतीकर, धर्माबाद*
🌹🖊🕉🇮🇳:

७) वाचनगीत

एकच ध्यास वाचन विकास
की शंभर टक्के आता वाचणार ।।

 कागद तूम्ही फाडा नि जिबल्याही खेळा
कोलांटी उठल्या नि टायरही खेळा
तूम्हा कूणी नाही रोखणार
की शंभर टक्के आता वाचणार।।


उशीरा सुचली पण बाई छान युक्ती
नेहमीसारखी अभ्यासाची नाही हो सक्ती
आता रोज आम्ही शाळेत येणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

घरी जे खेळ तेच शाळेतही
 आले
गुपचूप बसणारे मुलंही बोलके झाले
चित्रावरून गोष्ट सांगणार।।
की शंभर टक्के आता वाचणार

अंकांची गाडी नि शब्दांचा डोंगर
चित्रगप्पा ,नाटुकली मज्जा कित्ती येणार
त्यातुनच आता शिकणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

शाळा आणि घर आता सारखेच वाटे
बाई गुरुजींशी वाटे बदललेत नाते
आत्मविश्वास आता वाढणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

शाळा आता पुर्वीसारखी अजिबात नाही
माझ्यासाठी तिथे आता आहे खूप काही
प्रेम आणि माझा सन्मान ।।
की शंभर टक्के आता वाचणार

आजवर जे आमच्यासाठी होतं मोठं कोडं
वाचन विकास कार्यक्रम ने
सारं केलं  सोप्पं ।।
वाटे किती मानावे आभार।।
की शंभर टक्के आता वाचणार

एकच ध्यास वाचन विकास
की शंभर टक्के आता वाचणार.


कवयित्री-विद्या बनाफर /बैस
जि प शाळा शिवणी
अकोला,विदर्भ
🌹🖊🕉🇮🇳: *🌴

    ८)शब्द वाढविण्याचे गाणे🌴*

*🌴🌴एक होता डोंगर...🌴🌴*

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...हिरवळ बाजूलाच होती,हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.....*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...खोप्यात अंडं...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...खोप्यात अंडंं...अंड्यात पिल्लू...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंड...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...हिरवळ बाजूलाच होती,हिरवळ बाजूला......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंडं...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...चोचित दाणा...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंडं...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...चोचित दाणा...दाणा झाला चूर्रर्र...चिमणी उडाली भूर्रर्र....हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला..........*

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

🌹🖊🕉🇮🇳:

९)शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरुजी
गुरुजी छडी नका मारुजी
लागतंय हातावर

औंदाच ग वरीस बाई मी सहाव गाठलं ग
शिक्षण घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकील ग
रडू येतंय मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
        गुरुजी छडी नका

शब्द वाचता वाचता माझी मॅन दुखू लागली ग
अंक लिहता लिहता माझी बोट दुखू लागली ग
उलटे अक्षर काढले जरी
आरसा त्याला उलटे करी
  गुरुजी छडी नका मारुजी...

🌹🖊🕉🇮🇳:

१०)*अंगनात माझ्या मोरियो आला..*

अंगनात माझ्या मोरियो आला-२
मोर म्हणून बोलावितो..2
मोरियो घुंगरू वजवितो...2
हातातले कंगन दे मला आई
कंगन म्हणून बोलावितो
मोरियो....।।1।।
नाकातली नथनी दे मला आई
नथनी म्हणून बोलावितो
मोरियो...।।2।।
पायातली पैंजन दे मला आई
पैंजन म्हणून बोलावितो
मोरियो...।।3।।
कानातली बुगड़ी दे मला आई
बुगड़ी म्हणून बोलावितो
मोरियो...।।4।।
मोरियो घुंगरू वजवितो.....


११)पोर तुनी शाळा मा*

पोर तुनी शाळा मा धाड़ रे दादा
पोर तुनी शाळा मा धाड़...2
भाषा विषय ना तास भी शे ना..2
क ख ग घ शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी....।।1।।
गणित विषय ना तास भी शे ना-२
एक दोन तीन चार शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी...।।2।
इंग्लिश विषय ना तास भी शे ना-
A B C D शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी...।।3।।
कला विषय ना तास भी शे ना-२
गाना नि गोष्टी शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी ...।।4।।


 १२)गंपुने केले साबनाचे फुगे*

गंपुने केले साबनाचे फुगे
छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे
एक फुगा अहा एक फुगा -2
एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला
गंपुला तो डोळाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।1।।
एक फुगा आजीच्या हातावर बसला
गंपुला तो लाडुच वाटला
एक फुगा अहा एक फुगा  -।।2।।
एक फुगा ताईच्या वेणीवर बसला
गंपुला तो मोतीच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।3।।
एक फुगा आईच्या गालावर बसला
गंपुला तो पापाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।4।।


[१३)गुरूजी छड़ी नका मारु*

गुरूजी छड़ी नका मारु जी नि   लगाते हातावारी-२
शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरूजी
गुरूजी छड़ी....।।1।।
आवंदाच ग वारिस बाई मी
सहाव गाठलं ग
शिकन्यासाठी पहिलं पाऊल
शाळेत मी टाकलं ग
येतंय रडू मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
गुरूजी छड़ी.....।।2।।
शब्द वाचता वाचता माझी
मान दुखू लागलीं ग
अंक लिहिता लिहिता माझी
बोटं दुखू लागलीं ग
उलटे अक्षर काढले जरी
अरसा त्याला सुलटे करी    गुरूजी छड़ी....।।3।।



१४)*झिंगाट reading song*

उरात होतय धड़धड़
पाटी पुस्तक हातात आली
अंगात भरलय वारं
अन शाळेची घंटा झाली
आता अधीर झालोया
 मग तायार झालोया
पाटी दप्तर घेऊन तुमच्या
शाळेत आलोय
वाचतंय गूँगाट लिहितय झिंगाट
रंगात आलोया झालंय
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
संद्या शाळेला झालिय
माझ्या वाचनाची घाई
कधी येणार हो बाईं मला
आई चा अ आ ई
आता खेळुन आलोया
लई वाचून आलोया
ढिंगच्याक जोरात डिजिटल वर्गात
शिकायला आलोया झालं
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
बाई उताविळ झालो
चित्र पाहुन दंगलो
शब्द वाचून दंगलों
पट्टया वाचून हसलो
आता तयार झालोया
तुमच्या वर्गात आलोया
लई खेळून वाचून वर्गामध्ये
पहिला आलोया
संद्या पोरात म्या लई जोरात
रंगात आलोया झाल
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट

*१५)शाळा मा चाल मना नातुबा*

शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
तू पाटी नि पुस्तक भर
धर दप्तर खांदावर
चाल शाळा ना रस्ता धर
तुनी शाळा शे रस्त्यावर ।।1।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
तू वाचन शिकी ले रं
थोडं लेखन शिकी ले रं
तू गणित शिकना जर
पुढे जाईन आपलं घर ।।2।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
थोड़ सोताना करता कर
थोड़ समाज ना करता कर
जो शिक्षण लेस खरं
त्यानं जीवन शे सुंदर ।।3।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
             


१६)नको ताई रुसू, कोपर्‍यात बसू,
येउ दे ग गालात खुदकन हसू |

इवल्याशा नाकावर मोठा मोठा राग,
देऊ काय तुला हवे ते ग माग,
नवरा हवा का लठ्ठ हवी सासू ?

बाहुलीच्या लग्‍नाचा खेळ गडे खेळू,
लग्‍नात बुंदीचे लाडू आता वळू,
नवीन कपड्यात छान छान दिसू |

चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट,
केशरीभात केला आहे मोठा थाट,
ओठात आले बाई लडिवाळ हसू |



१७)किलबिल किलबिल पक्षी बोलती,
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती |
पानोपानीं फुलें बहरती,
फूलपाखरें वर भिरभिरती |
स्वप्‍नीं आले काही,
एक मी गाव पाहिला बाई |

त्या गावाची गंमत न्यारी,
तिथे नांदती मुलेच सारी |
कुणी न मोठे, कुणी धाकटे,
कुणी न बसते तिथे एकटे |
सारे हसती, गाती नाचती,
कोणी रडके नाही |

नाही पुस्तक, नाही शाळा,
हवे तेवढे खुशाल खेळा |
उडो बागडो, पडो, धडपडो,
लागत कोणा नाही |

तिथल्या वेली गाणी गाती,
पर्‍या हासर्‍या येती जाती |
झाडांवरती चेंडु लटकती,
शेतांमधुनी बॅटी |
म्हणाल ते ते सारे होते,
उणे न कोठे काही


१८)सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?


१९)रुसु बाई रुसु कोपर्‍यात बसु
आमच्यासंगे बोला आता ढिश्यू ढिश्यू ढिश्यू
हाहा..... ही ही....... हो हो

आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं तोंडाला सुटेल पाणी

आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला ?
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला ?

गाल गोबरे गोरे गोरे लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्र मुखाचा उदास का दिसला ?
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

बावन पत्ते बांधु वाडा शर्यत खेळू घोडा घोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

चिमणी खाई मोती-दाणे गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला ?
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

२०)चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?

निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी.

आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?

आता तरी परतुनी जाशील का?
दूध न्‌ शेवया खाशील का?

आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल.

असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?

चांदोबा चांदोबा कुठे रे गेला?
दिसता दिसता गडप झाला.

हाकेला 'ओ' माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?

२१) ल ल्ला लला ललला ल ल्ला लला ललला

पप्पा सांगा कुणाचे ?  पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची ?  मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्याइवल्या घरट्यात चिमणाचिमणी राहातात
चिमणा चिमणी अन्‌ भवती चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ पेलते पंखांवरी पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीनें घास द्यावा पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे हासते छ्प्पर भिंती दारे !


२२)अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ.

थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार.

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम.

वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी.

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार.

डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव.


२३)नाच रे मोरा अंब्याच्या वनांत
नाच रे मोरा नाच !

ढगांशी वारा झुंजला रे
काळाकाळा कापुस पिंजला रे
आतां तुझी पाळी वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरलीं रे
पावसांत न्हाऊं काहीतरी गाऊं
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यांत नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझीमाझी जोडी जमली रे
आभाळांत छान छान सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !


२४)येरे येरे पावसा
तुला देतो पैसा.

पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा.

ये ग ये ग सरी
माझे मडके भरी.

सर आली धावून
मडके गेले वाहून.

२५)ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटुलुटु पाही ससा

हिरवीहिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
'निजला तो संपला' सांगे ससा.

२६)अ आ आई म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ थ थ थवा
बाळ जरि खट्याळ तरि मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई

२७) गाडी आली गाडी आली - झुक्‌ झुक्‌ झुक्‌
शीटी कशी वाजे बघा - कुक्‌ कुक्‌ कुक्‌

इंजिनाचा धूर निघे - भक्‌ भक्‌ भक्‌
चाके पाहू तपासून - ठक्‌ ठक्‌ ठक्‌

जायचे का दूर कोठे - भूर्‌ भूर्‌ भूर्‌
कोठेहि जा नेऊ तेथे - दूर्‌ दूर्‌ दूर्‌

तिकिटाचे पैसे काढा - छ्न्‌ छ्न्‌ छ्न्‌
गाडीची ही घंट वाजे - घण्‌ घण्‌ घण्‌

गाडीमधे बसा चला - पट्‌ पट्‌ पट्‌
सामानाहि ठेवा सारे - चट्‌ चट्‌ चट्‌

नका बघू डोकावून - शुक्‌ शुक्‌ शुक्‌
गाडी आता निघालीच - झुक्‌ झुक्‌ झुक्‌

२८)ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे.

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे.

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे.

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप खोकला शिंका सर्दी वाट्टेल्‌ ते होऊ दे

२९)राजा राणीची नको काऊ माऊची नको
गोष्ट मला सांग आई रामाची
वेळ आता झाली माझी झोपेची

राम हसायचा कसा राम रडायचा कसा
आकाशीचा चांदोमामा मागायचा कसा
समजूत कोणी घातली त्या वेड्याची ?

राम काळा का गोरा दिसत होता का बरा
मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा
आवड होती का ग त्याला खेळाची ?

राम गेला का वनी त्याला धाडीला कुणी
भीती नाही त्याच्या कशी आली ग मनी
सोबत तिथे त्याला होती का कोणाची


३०)छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छमछम विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम्‌ छम्‌ छम्‌

तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
'मोर्‍या मूर्खा !' 'गोप्या गद्ध्या !' देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌

तोंडे फिरवा पुसती गिरवा बघु नका कोणी
हसू नका रडू नका बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम ओ नमा सिद्धम्‌
छम्‌ छम्‌ छम्‌


३१)गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोर्‍यागोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण !

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान !

३२) झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया



३३)असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार.

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
'हॅलो हॅलो !' करायला छोटासा फोन.

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल.

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो.

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला.

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.


३४)ससेभाऊ ससेभाऊ
चार उडया मारा पाहू
कश्या  कश्या कश्या?
अश्या अश्या अश्या

अहो  अहो हत्ती
डुलडुलता  किती

कसे कसे कसे?
असे असे असे!

अहो अहो गाढवदादा
जरा तुमचा सुर काढा
कसा कसा कसा
असा असा असा


होँ... हो... होँ


३५)लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरविते
टूक टूक ही बघते 

नकटे नाक उडविते
गुबरे गाल फुगविते
दात कधी घाशिना
अंग कधी धुविना

इवले घरकुल मांडते
मांडता मांडता सांडविते
पोळ्या केल्या करपून गेल्या 
भात केला कच्चा झाला
वरण केल पात्तळ झाल
तूप सगळ सांडून गेल

केळ्याच शिकरण करायला गेली 
पडली खुर्चीतच
आडाच पाणी काढायला गेली
धपकन पडली आत



३६)फिरायला गेला बोकड
धावत आले माकड

दोघे गेले हॉटेलात
बसून खाला मटारभात

मालक म्हणतो द्या पैसे
दोघांनी मिळून दिले ठोसे

माकडाने मारली उडी
पटकन पळवली सुपारीची पुडी

दोघे गेले सुपारी खात
मालक बसला चोळत हात.


३७)काव काव काव काव कावळा म्हणाला
सोनुच्या घरी आला
चिव चिव चिव चिव चिमणी म्हणाली
सोनुच्या घरी आली
भू भू भू भू कुत्रा म्हणाला
सोनुच्या घरी आला
म्याव म्याव म्याव म्याव मांजर म्हणाली
सोनुच्या घरी आली
मिठू मिठू मिठू मिठू पोपट म्हणाला
सोनुच्या घरी आला
कुहू कुहू कुहू कुहू कोकिला म्हणाली
सोनुच्या घरी आली
डराव डराव डराव डराव बेडूक म्हणाला
सोनुच्या घरी आला
कुँक्क कुँक्क कुँक्क कुँक्क बदक म्हणाले
सोनुच्या घरी आले


३८)सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तर्‍हेतर्‍हेचे खाऊ येती बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई, थंडी-वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता पण रे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणूस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावुनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊन जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्‍नाला !
आवडती रे वडिल मला !

👉    📱📕✏📚
*सुंदरा या गीताचे बोलीभाषा
(पावरी) अनुवादंन*
●●●●●●●●●●●●●●●●●●●●

३९) बबली शाळा मा चाल तू ..!2!

तह पाटी आप ,तह पुस्तक आप
तह पेन आप ,तह वही आप...
तू शाळा मा काह नि आवतली...
बबली शाळा मा चाल तू....!!2!!

तह फरक आप ,तह डगल आप
तह दफतर आप,तह पैयहा आप
तू शाळा मा काह नि आवतली..
बबली शाळा मा चाल तू.....!!2!!

तह कुदरी आप ,तह बिस्कीट आप
तह सहलीक लिजाम, तह किल्ला देखाड
तू शाळा मा काह नि आवतली ...
बबली शाळा मा चाल तू..!!2!!

मास्तर मी शाळा मा आविही ...
मेहेक पाटी बी आप,मेहेक पुस्तक बी आप
मेहेक पेन बी आप,मेहेक पेन्सिल बी आप
मेहेक फरक बी आप, मेहेक डगल बी आप
मेहक दफतर बी आप,मेहेक पैसा बी आप
मेहक कुदरी बी आप, मेहक बिस्कीट बी आप
मास्तर मी शाळा मा आविही..!!2!